Agripedia

तुती लागवडीसाठी सपाट, काळी,कसदार व तांबडीतसेच वालुकामय तांबड्या प्रकारातील जमीन निवडावी. जमीन हे पाण्याची योग्य निचरा होणारी, ओलावा टिकवून ठेवणारी तसेच भुसभुशीत असावी. तसेच तुटीचे लागवड पट्टा पद्धतीने करावी. आंतरमशागत याचा खर्च यामुळे कमी होतो. या प्रकारचे बरेच फायदे पट्टा पद्धतीचे आहेत. या लेखात आपण तुतीची पट्टा पद्धतीने लागवड कशी करतात याबाबत माहितीघेऊ.

Updated on 21 October, 2021 9:10 PM IST

तुती लागवडीसाठी सपाट, काळी,कसदार व तांबडीतसेच वालुकामय तांबड्या प्रकारातील जमीन निवडावी. जमीन हे पाण्याची योग्य निचरा होणारी, ओलावा टिकवून ठेवणारी तसेच भुसभुशीत असावी. तसेच तुटीचे लागवड पट्टा पद्धतीने करावी. आंतरमशागत याचा खर्च यामुळे कमी होतो. या प्रकारचे बरेच फायदे पट्टा पद्धतीचे आहेत. या लेखात आपण तुतीची पट्टा पद्धतीने लागवड कशी करतात  याबाबत माहितीघेऊ.

तुतीची पट्टा पद्धतीने लागवड

  • लागवड 5×2×1,5×3×2,6×2×1,4×2×1फूट अशा विविध पट्टा पद्धतीने केली जाते. या पद्धतीचा फायदा म्हणजे खते, पाणी फार कमी लागते तसेच आंतरमशागतीचा खर्च कमी होतो. तुती पानांचा दर्जा व उत्पादन वाढते. तुतीची फांदी सरळ दिशेने वाढून जाडी ही कमी होते.
  • या पद्धतीने लागवड करण्यासाठी व्ही1 या तुती जातीची निवड करावी.
  • तुतीची लागवड करताना जात निवडताना सात ते आठ महिन्यांच्या जुन्या बागेतील उ निवडावे.बेण्याची उंची आठ फूट असावी. आकार बोटा एवढा असावा.बेण्यापासून कलमे तयार करताना प्रत्येक कलमावर कमीत कमी तीन जिवंत डोळे व कलमाची लांबी सहा ते आठ इंच असावी. कोवळी, बारीक, हिरवी शेंड्याकडील कोवळी किंवा बुडखयाकडील जाड तुतीची काडी निवडू नये.
  • कलमे तयार करतांना धारदार कोयत्याने एकाच घावात तोडावीत. कलमाचे साल निघणार नाही, दुभंगणार नाही तसेच डोळ्यावर तुकडा पडणार नाही याची काळजी घ्यावी.
  • तयार केलेली कलमे सुकू नये यासाठी सावलीत बसून कलमे तयार करावी. कलमावर पाणी मारावे किंवा ओले गोणपाट ठेवून झाकावे. लागवडीपूर्वी कलमे एक टक्का कार्बेन्डाझिम च्या द्रावणात अर्धा तास बुडवून ठेवावेत. या प्रक्रियेनंतर कलमे लगोलग जमिनीत लावून घ्यावीत. दोन डोळे जमिनीत जातील व एक डोळा जमिनीत जाईल याची काळजी घ्यावी. कलमा भोवतीची माती हाताने दाबून घ्यावी. कल मे उल्टी लागणार नाही किंवा कलमाची जमिनी कडील भागाचे साल निघणार नाही त्याची तंतोतंत काळजी घ्यावी.
  • लागवडीवेळी जर पाऊस नसेल तर लागवडीपूर्वी दोन दिवस अगोदर जमीन भिजवून घ्यावी. कलमे समोरासमोर लागणार नाही याची काळजी घ्या.
  • तुतीची लागवड पूर्ण केल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याने मोकळ्या पट्ट्यात किमान 1000 ते 1500 कलमांची रोपवाटिका करावी. या तयार रोपवाटिका चा उपयोग तूटाळ भरून काढण्यासाठी होतो. तुती लागवड कलम ऐवजी  तयार तुती रोपा द्वारे केल्यास बागेतील शंभर टक्के तुतीझाडे जिवंत राहण्यास मदत होते.
  • तुती लागवडीनंतर भारी जमिनीकरिता महिन्यातून दोनदा,मध्यम जमिनीसाठी बारा ते चौदा दिवसांनी तर हलक्‍या जमिनीसाठी आठ ते दहा दिवसांनी पाण्याची पाळी द्यावी.
  • ठिबक सिंचन पद्धतीचा वापर तूतीसाठी अतिशय फायदेशीर आहे.तुती बागेस खारवट,शार युक्त पाणी कधीही देऊ नये याचा अनिष्ट परिणाम होतात.
  • तुतीची वाढ योग्य होऊन पोषक, भरगोस व दर्जेदार पाला निर्मितीसाठी खत व्यवस्थापन गरजेचे आहे. वर्षभरात ठराविक अंतराने पाच ते सात वेळा बॅचेस घेतो त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होऊन उत्पादकता कमी होते. जमिनीची कमी झालेली सुपीकता टिकून ठेवणे,वाढविणे या करिता सेंद्रिय खते,जैविक खते,हिरवळीची खते, गांडूळ खते त्याचबरोबर  योग्य प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांच्या माध्यमातून जमिनीची सुपीकता वाढविता येते.
  • तुती लागवडीनंतर दोन ते अडीच महिन्यात तुती कलमांना मुळे फुटतात. त्या वेळी एकरी 24 किलो नत्र आणि दुसरी मात्रा तीन ते चार महिन्यांनी 24 किलो पालाश द्यावे. दुसऱ्या वर्षापासून एकरी नत्र 120 किलो,स्फुरद48 किलो आणि पालाश आणि पालाश 48 किलो ही खतमात्रापाच मात्रेमध्ये विभागून द्यावे.
English Summary: cultivation technique to mulberry tree and management
Published on: 21 October 2021, 09:10 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)