Agripedia

तिळीच्या लागवडीत (Sesame Farming) राजस्थान हे शीर्षस्थानी विराजमान आहे असं असलं तरी महाराष्ट्र पण काही कमी नाही. खरीपचा हंगाम हा तीळ लागवडीसाठी सर्वात योग्य असल्याचे मानले जाते.तिळीच्या पिकासाठी जास्त पाण्याची आवश्यकता नसते. तिळीची लागवड ही पडीत जमिनीतही केली जाऊ शकते.

Updated on 23 September, 2021 5:32 PM IST

तिळीच्या लागवडीत (Sesame Farming) राजस्थान हे शीर्षस्थानी विराजमान आहे असं असलं तरी महाराष्ट्र पण काही कमी नाही. खरीपचा हंगाम हा तीळ लागवडीसाठी सर्वात योग्य असल्याचे मानले जाते.तिळीच्या पिकासाठी जास्त पाण्याची आवश्यकता नसते. तिळीची लागवड ही पडीत जमिनीतही केली जाऊ शकते.

. तीळ मध्ये मोनो-सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असतात जे शरीरातून कोलेस्टेरॉल कमी करतात. त्यामुळे तीळची मागणी ही चांगलीच जोर पकडत आहे. गतवर्षी महाराष्ट्रात खरीप हंगामात तीळ पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र हे जवळपास 52,600 हेक्टर होते, ह्या एकूण क्षेत्रातून जवळपास 18,900 टन तिळीचे उत्पादन मिळाले होते. उत्पादकता ही हेक्टरी 360 किलो एवढी होती. जर रब्बी हंगामाचा विचार केला तर तीळ पीक 2900 हेक्टर क्षेत्रात घेतले गेले होते आणि 800 टन उत्पादन मिळाले होते आणि उत्पादकता बघितली तर ती 285 किलो प्रति हेक्टर एवढी होती.

कृषी शास्त्रज्ञ म्हणतात की तीळ पीक दुहेरी पीक पद्धतीसाठी योग्य आहे कारण ते 85-90 दिवसात म्हणजेच कमी कालावधीत येणारे पिक आहे. सहसा पडीत जमिनीत शेतकरी तिळाची लागवड करतात. हलकी रेताड, चिकण माती असलेली जमीन तीळ उत्पादनासाठी योग्य आहे असे वैज्ञानिक सांगतात. तिळीची लागवड ही एकटे किंवा तूर, मका आणि ज्वारीसह सह-पीक किंवा आंतर्पिक म्हणून करता येते. शेतकरी बांधव तिळीच्या लागवडीतून चांगले उत्पन्न मिळवू शकतात.

 कशी हवी तीळ लागवडीसाठी जमीन? Sesame Cultivation

चांगल्या निचरा होणाऱ्या मध्यम ते भारी असलेल्या जमिनीत तीळ लागवड केली पाहिजे असा मोलाचा सल्ला कृषी वैज्ञानिक देतात.  पेरणी करण्यापूर्वी 2 ते 3 वेळा वावर चांगले नांगरले पाहिजे जेणेकरून तीळ पिकाचे अंकुरण चांगले प्रकारे होईल आणि त्याची वाढही चांगली होईल, उत्पन्न चांगलं मिळेल.

पेरणीचा हंगाम नेमका कोणता बरं?

शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात तीळची पेरणी करणे फायदेशीर ठरते असे तीळ लागवड करणारे शेतकरी सांगतात. रेताड आणि चिकण माती असलेल्या जमिनीत पुरेसा ओलावा जर असला तर तिळीचे पीक खुप चांगले येते.  तेलबिया पिकांच्या लागवडीमध्ये पाण्याची खूपच कमी गरज असते, आणि पाणी कमी पिणारे हे पिक जनावरांना चांगला चाराही पुरवते. म्हणूनच शेतकऱ्यांना तीळची लागवड फायदेशीर ठरत आहे.

 तीळची कापणी नेमकी कधी करावी? Sesame Harvesting

जेव्हा तिळची 75% पाने आणि देठ पिवळे होतात, तेव्हा ते काढणीसाठी योग्य समजले जाते. म्हणजे जवळपास पेरणीपासून सुमारे 80 ते 95 दिवसांनी तिळ हे पिक पूर्ण विकसित होते आणि काढणीला तयार बनते. 

जर समजा तुम्ही लवकर काढणी केली तर तीळच्या बिया ह्या बारीक राहतात आणि साहजिकच बारीक बियामुळे उत्पादन खूपच कमी होईल त्यामुळे तिळीची कापणी ही अगदी वेळेवर करायची. तिळी पिकापासून साधारणपणे हेक्टरी 6 ते 7 क्विंटल उत्पादन मिळते.

English Summary: cultivation process of sesame crop and techniqe
Published on: 23 September 2021, 05:32 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)