जगात शेतीच्या क्षेत्रात अमूलाग्र बदल पाहावयास मिळत आहे. भारतात देखील शेती व्यवसायात खुप मोठा बदल झाला आहे, शेतकरी बांधव आता परंपरागत पिक पद्धतीला फाटा देत आहेत आणि नकदी पिकांच्या लागवडिकडे वळत आहेत आणि यातून मोठी कमाई देखील करत आहेत. या नकदी पिकांमध्ये अनेक औषधी पिकांचा समावेश होतो. औषधी पिकांची लागवड करून शेतकरी बांधव चांगले उत्पन्न कमवीत आहेत.
या औषधी वनस्पतीपैकी काही अशाही वनस्पती आहेत ज्याची मागणी हि विदेशी बाजारपेठात मोठ्या प्रमाणात आहे, आणि भारतातून मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. अशाच औषधी वनस्पतीपैकी एक आहे इसबगोल. इसबगोल हि एक महत्वपूर्ण औषधी वनस्पती आहे आणि याची सर्व्यात जास्त लागवड हि आपल्या भारत देशात केली जाते.
इसबगोल विषयी माहिती
भारतातून अनेक औषधी वनस्पतीची निर्यात हि केली जाते. या औषधी वनस्पतीपैकी सर्वात जास्त निर्यात हि इसबगोल या वनस्पतीची केली जाते. आपल्या देशातून जवळपास सव्वाशे करोड रुपयाची इसबगोल वनस्पतीची निर्यात हि केली जाते. इसबगोल वनस्पतीची लागवड हि इराण, इराक, अरब अमिरात, भारत आणि फिलिपाइन्स या देशात मोठ्या प्रमाणात केली जाते आणि येथील शेतकरी यातून चांगली कमाई देखील करत आहेत. आपल्या भारतातील गुजरात, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश हे इसबगोलचे प्रमुख उत्पादक राज्य आहेत. येथील शेतकरी इसबगोलची लागवड करून चांगली तगडी कमाई करत आहेत.
दहा हजार रुपये क्विंटल आहे भाव
भारतात शेती हि प्रामुख्याने तीन हंगामात केली जाते, खरीप, रब्बी आणि उन्हाळी. इसबगोल या औषधी वनस्पतीची लागवड हि रब्बी हंगामात केली जाते. रब्बी हंगामच्या सुरवातीला म्हणजे ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यात या वनस्पतिची लागवड हि केली जाते. इसबगोल हे पिक चार महिन्यात उत्पादन देण्यास तयार होते. म्हणजे रब्बी हंगामात लागवड केली की हे पिक मार्च महिन्यात काढणीसाठी तयार होते. असे सांगितलं जात की, या पिकाची झाडे हळूहळू वाढतात. कृषी वैज्ञानिक या पिकात वाढणारे तण हाताने बाजूला काढण्याचा सल्ला देतात म्हणजे खुरपणी हि हाताने करण्याचा सल्ला देतात. एक बिघा इसबगोलच्या क्षेत्रातून जवळपास 4 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते. बाजारात सध्या एक क्विंटल इसबगोलचा दर हा दहा हजार रुपये आहे, वेगवेगळ्या प्रदेशानुसार भावात कमी जास्त होऊ शकते. पण साधारणपणे दहा हजार पर्यंत भाव हा मिळतो.
शेतकरी मित्रांनो एक हेक्टरमध्ये इसबगोळ या पिकापासून सुमारे 15 क्विंटल इसबगोलच्या बिया मिळतात. हिवाळ्यात इसबगोळचे भाव हे चांगलेच वाढतात, त्यामुळे हिवाळ्यात उत्पन्न नेहमी पेक्षा अधिक मिळते. इसबगोळच्या बियांवर प्रक्रिया केल्यास अजूनच जास्त फायदा मिळतो. जर समजा इसबगोलच्या बियावर प्रक्रिया केली तर, इसबगोलच्या बियामधून सुमारे 30 टक्के भुसा आपल्याला मिळतो आणि हा इसबगोलचा भुसा हा बिया पेक्षा अधिक महाग विकला जातो. इसबगोलच्या लागवडीतून भुसा काढून टाकल्यानंतर केक आणि गोळ्यांसारखी इतर उत्पादने शिल्लक राहतात. ती देखील चांगल्या किंमतीत विकली जातात.
Published on: 17 November 2021, 09:55 IST