कृषीतज्ञांच्या मते झेंडूच्या फुलांची (Marigold Farming) लागवड हंगामानुसार/सीजननुसार केली जाते. उन्हाळी हंगामात, झेंडूच्याफुलांची लागवड जानेवारी महिन्यात केली जाते. ज्याचा वापर नवरात्रीच्या दिवसांमध्ये पुजेमध्ये खूप केला जातो आणि बाजारात चांगला भावही मिळतो. यानंतर, हिवाळा सुरू होण्यापूर्वी एप्रिल-मे आणि पुन्हा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये फुलांची लागवड केली जाते.
झेंडूचे फूल हे देशभरात धार्मिक कार्यासाठी महत्वाचे फूल मानले जाते. ही फुले मोठ्या प्रमाणावर हार बनवण्यासाठी तसेच सजावटीसाठी वापरली जातात. झेंडूचे फुलाचे झाड रस्त्याच्या कडेच्या बागांमध्ये तसेच कुंड्यांमध्ये लावले जाते, तसेच लोक आपल्या परसबागेत देखील झेंडु लावतात त्यामुळे आपला परसबाग, किंवा घराचे गार्डन अजूनच सुंदर भासते. झेंडूची तीनही हंगामात आपल्या राज्यात लागवड केली जाते आणि त्याला जास्त मागणी असते.
हेही वाचा - शेतकरी मित्रांनो आगात कोथिंबीर लागवड करून आपण घेऊ शकता अनलिमिटेड उत्पादन…
झेंडु लागवडीसाठी हवामान (Climate For Marigold)
झेंडू हे प्रामुख्याने थंड हवामानाचे पीक आहे. थंड हंगामात झेंडूची झाडे चांगली वाढतात आणि झेंडूच्या फुलांची गुणवत्ता चांगली राहते.
त्यामुळे थंड हवामाणात झेंडूची लागवड करण्याची शिफारस केली जाते. तसं बघायला गेलं तर झेंडु लागवड ही पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा या तीनही ऋतूंमध्ये केली जाते. म्हणुन झेंडु हे पिक बहुहंगामी असल्याचे आपण म्हणू शकतो.
झेंडु लागवड नेमकी कधी (Marigold Cultivation)
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यापूर्वी आफ्रिकन झेंडूची लागवड केल्यास उत्पादन चांगले येते आणि झेडुंच्या फुलांची गुणवत्ता देखील खुपच चांगली राहते. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून ते त्यापासून 15 दिवसांच्या आत लागवड केल्यास ऑक्टोबर ते एप्रिलपर्यंत झेंडूचे उत्पादन मिळायला सुरवात होते आणि उत्पादन देखील चांगले येते. परंतु सप्टेंबरमध्ये लागवड केलेल्या झेंडूपासून सर्वाधिक उत्पन्न मिळते असे सांगितले जाते.
हेही वाचा - केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष : 'ह्या' रोगावर सापडला उपचार
झेंडु लागवडीसाठी जमीन (Farm For Marigold Cultivation)
झेंडू चे पिक हे विविध प्रकारच्या जमिनीत पिकवता येते, सुपीक, पाणी धारण करणारी तसेच पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन झेडूसाठी चांगली असते. शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा की, झेंडू पिकाला भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते. झेंडूची झाडे सावलीत चांगली वाढतात पण फुलत नाहीत. त्यामुळे झेडूंची लागवड ही मोकळ्या वावरात जिथे सूर्यप्रकाश चांगला पडतो अशा ठिकाणी करावी असं सांगितले जाते.
झेंडूसाठी पाणी व्यवस्थापन (Water Management)
जर झेंडू पावसाळ्यात लावायचा असेल तर पावसाचा ताण जाणवल्यास 10 ते 15 दिवसांच्या अंतराने 1-2 वेळा पाणी द्यावे. हिवाळ्याच्या हंगामात 8 ते 10 दिवसांच्या अंतराने आणि उन्हाळी हंगामात 5 ते 7 दिवसांच्या अंतराने पाणी द्या. झाडाला फुले लागल्यापासून ते फुल तयार होईपर्यंत पाण्याची कमतरता भासू नये ह्याची विशेष काळजी घ्यावी.
Source Tv9 Bharatvarsh Hindi
Published on: 06 October 2021, 09:56 IST