Agripedia

भारतात भाजीपाला लागवड करून शेतकरी आपले उत्पन्न दुपटीने वाढवू शकतो, कारण भारतात भाजीपालाची मागणी ही वर्षभर बनलेली असते. भाजीपालाची लागवड जर शास्त्रीय पद्धतीने केली तर शेतकरी ह्यातून चांगले उत्पादन प्राप्त करू शकतो. आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत अशाच एका भाजीपाला लागवडिविषयी संपुर्ण माहिती. चला तर मग जाणुन घेऊया गवार लागवडिविषयी

Updated on 13 October, 2021 11:19 AM IST

भारतात भाजीपाला लागवड करून शेतकरी आपले उत्पन्न दुपटीने वाढवू शकतो, कारण भारतात भाजीपालाची मागणी ही वर्षभर बनलेली असते. भाजीपालाची लागवड जर शास्त्रीय पद्धतीने केली तर शेतकरी ह्यातून चांगले उत्पादन प्राप्त करू शकतो. आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत अशाच एका भाजीपाला लागवडिविषयी संपुर्ण माहिती. चला तर मग जाणुन घेऊया गवार लागवडिविषयी

भारत हा एक कृषिप्रधान देश आहे आणि भाजीपाला लागवडीत आपले मोलाचे स्थान राखतो, भारतात गवार लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते आणि ह्यामुळेच जगातील सर्वात मोठा गवार उत्पादक देश म्हणुन भारताने आपले स्थान मजबूत केल आहे. भारतात गवाराचे 80 टक्के उत्पादन होते.  गवारला क्लस्टर बीन म्हणूनही ओळखले जाते. ह्याची लागवड प्रामुख्याने शुष्क आणि अर्ध-शुष्क प्रदेशात केली जाते, आणि भारतात गवार लागवडीसाठी उपयुक्त हवामान आहे. गवार एक उष्ण हंगामातील पीक आहे, गवार हे नेहमी बाजरीसमवेत पेरले जाते. गवारची शेंग ही हिरवा भाजीपाला म्हणून भारतात खाल्ले जाते. तर काही ठिकाणी तो चारा म्हणूनही वापरला जातो. त्याला चांगली किंमत मिळते.  यामुळे शेतकरी गवार लागवडीतून वार्षिक लाखो रुपये देखील कमवू शकतात. राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागात याची लागवड केली जाते. फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्रात 8910 हेक्टर क्षेत्रात गवारची लागवड केली जाते.

गवार पशुआहार म्हणुनही उपयोगी आहे

अनेक पशुपालन करणारे शेतकरी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी सांगतात की, गवारचा पाला किंवा शेंगा जनावरांना खाऊ घातल्यास त्यांना चांगली ताकत मिळते, दुध देणारे पशुना हा चारा खाऊ घातला तर त्यांच्या दुध देण्याच्या क्षमतेत वाढ होते. गवार पासुन गोंदची निर्मिती केली जाते. गवारच्या शेंगाची भाजी ही खुप स्वादिष्ट असते आणि आरोग्यासाठी पण खुप चांगली असते. गवारच्या शेंगा ह्या दाळ बनवण्यासाठी तसेच वेगवेगळे सूप बनवण्यासाठी वापरतात. ग्रामीण भागात गवारचा आहरात जास्त वापर केला जातो. ह्या सर्व गुणांमुळे गवारची मागणी ही खुप असते आणि ह्याची लागवड शेतकऱ्यांसाठी एक अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत ठरू शकते.

 गवार लागवडीसाठी हवामान जमीन कशी निवडावी

गवार हे उष्णकटिबंधीय पीक आहे जे सरासरी 18 ते 30 डिग्री सेल्सियस तापमानात तयार होते. ह्याची लागवड खरीप हंगामात केल्यास उत्पादन अधिक होते कारण की, खरिपातील उष्ण व दमट हवामानामुळे गवारच्या पिकांची वाढ चांगली होते आणि उत्पादण चांगले मिळते. अनेक गवार उत्पादक शेतकरी व कृषी वैज्ञानिक हिवाळ्यात गवार या पिकांची लागवड फायदेशीर ठरत नाही असं सांगतात आणि आमचाही सल्ला आपणांस हाच आहे की ह्याची लागवड हिवाळयात करणे टाळावी.

गवार हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेतले जाऊ शकते त्यामुळे तुमची जमीन कशीही असली तरी ह्याची लागवड आपल्याला करता येऊ शकते. पण असे असले तरी गवारचे झाड हे चांगला निचरा होणाऱ्या मध्यम ते चांगल्या दनगट जमिनीत चांगले वाढते असे कृषी वैज्ञानिक सांगतात.

गवार लागवडीचा नेमका हंगाम कोणता

गवारची लागवड ही खरीप म्हणजेच पावसाळी आणि उन्हाळी हंगामात केली जाऊ शकते.  सामान्यपणे उन्हाळी हंगामात गवारची लागवड जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये केली जाते.  गवार लागवडीसाठी हेक्टरी सुमारे 14 ते 24 किलो बियाणे लागते. गवारच्या पेरणीपुर्वी बिजप्रक्रिया करावी असा सल्ला दिला जातो बिजप्रक्रिया करण्यासाठी 250 ग्रॅम रायझोबियम पेरणीपूर्वी 10 ते 15 किलो बियाण्यास चोळून लावावे.

 गवारच्या सुधारित जाती नेमक्या कोणत्या बरं?

» पुसा सदाहरित वाण - ही एक सरळ आणि उंच वाढणारी वाण आहे. जर आपणांस उन्हाळ्यात किंवा खरीप म्हणजे पावसाळी हंगामात गवार लागवड करायची असल्यास तुम्ही ह्या जातीची लागवड करू शकता.

ह्या हंगामासाठी याची शिफारस अनेक शेतकरी करतात.

»पुसा नवबहार- ही गवारची एक सुधारित वाण आहे ह्या वाणीची लागवड उन्हाळी हंगामात किंवा खरीप अशा दोन्ही हंगामात केली जाऊ शकते आणि ह्यातून चांगले उत्पादन मिळते.  ह्या वाणीच्या गवारच्या शेंगा 15 सेमी लांब आणि हिरव्या रंगाच्या असतात.

»पुसा हंगामी - इतर सर्व्या जातींपेक्षा ही उच्च उत्पन्न देणारी वाण आहे. ही वाण खरीप हंगामासाठी चांगली असल्याचा दावा केला जातो. या जातीच्या गवारच्या शेंगा 10 ते 12 सेंमी लांब वाढतात आणि गवारचे हे वाण 75 ते 80 दिवसात काढणीसाठी तयार होतात.

English Summary: cultivation process of hayseed crop that is important technology
Published on: 13 October 2021, 11:19 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)