Agripedia

चिया सीड्स याला विदेशी बाजारात सुपरफूड म्हणुन ओळखले जाते जे आरोग्यासाठी खुपच फायदेशीर आहे. अमेरिका आणि चीन नंतर आता भारतात देखील याची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. चिया सीड लागवडीसाठी खर्च असतो कमी! जर शेतकऱ्यांनी वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला तर चिया सीडच्या लागवडीला खुपच कमी खर्च येतो आणि उत्पन्न देखील जास्त मिळवता येते.

Updated on 03 September, 2021 10:54 AM IST

चिया सीड्स याला विदेशी बाजारात सुपरफूड म्हणुन ओळखले जाते जे आरोग्यासाठी खुपच फायदेशीर आहे. अमेरिका आणि चीन नंतर आता भारतात देखील याची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे.

 

 

 

 

 

चिया सीड लागवडीसाठी खर्च असतो कमी!

जर शेतकऱ्यांनी वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला तर चिया सीडच्या लागवडीला खुपच कमी खर्च येतो आणि  उत्पन्न देखील जास्त मिळवता येते.

भारतात चिया लागवडीचे क्षेत्र वाढत आहे, बाराबंकी व्यतिरिक्त, आता यूपीच्या अनेक जिल्ह्यांमध्ये त्याची लागवड केली जात आहे, कारण ती त्याच्या खर्चापेक्षा जास्त नफा कमवू शकते. आता मंदसौर आणि नीमच आणि भारतातील काही जिल्ह्यांमध्ये चिया बियाण्याची लागवड सुरू झाली आहे, हे पीक रब्बी दरम्यान ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात लावले जाते.

चिया सीड्स खाण्याचे फायदे

चिया सीड्समध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असते, याशिवाय कॅल्शियम, फायबर, प्रथिने आणि इतर खनिजे त्यात आढळतात.  चिया सीड्सचे सेवन केल्याने हृदय तंदुरुस्त राहते आणि शरीरात रोग प्रतिकारक क्षमता वाढते, त्यामुळे आपल्या आहारात त्याचा समावेश नक्की करा. हे दूध किंवा पाण्यात घेतले जाऊ शकते. यात अनेक प्रकारच्या रोगांसाठी फायदेशीर ठरत आहे.

 

 

 

 

चिया सीड्सची लागवड कशी करावी बरं?

 

  • कृषी शास्त्रज्ञ म्हणतात की याची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये सहज करता येते.

 

  • हलकि-चिकण माती असलेल्या जमिनीत याचे पीक चांगले येते.

 

  • याला जास्त कीटकनाशकांची गरज नसते आणि शेणखतचा वापर चीया सीड्सचे उत्पादन वाढवण्यास खूप प्रभावी आहे.

 

  • एका एकरासाठी सुमारे 4-5 किलो बियाणे लागते आणि एकरी 7 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.

 

  • ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात पेरणी केल्यास चीया सीड्सचे चांगले उत्पादन मिळते.

 

  • तणांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, शेतात पहिल्या 2 वेळा हातांच्या मदतीने निंदनी किंवा खुरपणी करा.

 

  • लागवडीच्या 10-15 दिवसांच्या आत शेतातील रिकाम्या जागेत वृक्षारोपण कार्य देखील केले पाहिजे.

 

  • याची लागवड केल्यानंतर पिक तयार होण्यासाठी 90-120 दिवस लागतात. लागवड केल्यापासून 40-50 दिवसात पिकामध्ये फुले यायला सुरवात होते आणि त्यांनंतर सुमारे 25-30 दिवसांच्या दरम्यान ते तयार आहेत.

 

  • जेव्हा पीक तयार होते, तेव्हा रोप आणि फुल पिवळे होऊ लागतात.

 

  • कापणी आणि मळणीनंतर धान्य स्वच्छ करून वाळवले जाते आणि बाजारात विकले जाते.

 

  • चिया सीडचे पीक प्रति एकर 600-700 किलो उत्पादन देते.

 

  • लागवडीमध्ये प्रति एकर 30,000 रुपयांपर्यंत खर्च येतो.

 

  • जर 6 क्विंटल जरी उत्पादन आले तरी ते सुमारे 90 हजार रुपयांना विकली जाते. अशा स्थितीत शेतकरी एका एकरात 60 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवतो.

 

 

  • चिया सीड्स पिकवून शेतकरी अधिक नफा कमवू शकतात, यासाठी त्यांनी जागरूकता आणि तत्परता ठेवणे आणि कृषी विभागाशी संपर्क ठेवणे आवश्यक आहे. आणि कृषी तज्ञांच्या सल्ल्याने खते आणि बियाणे वापरावे.
English Summary: cultivation process of chiya seeds
Published on: 03 September 2021, 10:54 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)