Agripedia

मित्रानो जसं कि आपणास ठाऊकच आहे रब्बी पिकांची पेरणी सप्टेंबर महिन्यापासून सुरू होते, तसेच हा महिना भाजीपाला लागवडीसाठीही उत्तम आहे. जर तुम्ही भाजीपाला लावण्याचा विचार करत असाल तर बंपर उत्पादनासाठी तुम्ही सप्टेंबर महिन्यात आम्ही सांगितलेल्या या भाज्यांची लागवड करू शकता. या भाज्या हंगामी असल्याने आरोग्यासाठीही चांगल्या मानल्या जातात.

Updated on 03 September, 2021 10:47 AM IST

मित्रानो जसं कि आपणास ठाऊकच आहे रब्बी पिकांची पेरणी सप्टेंबर महिन्यापासून सुरू होते, तसेच हा महिना भाजीपाला लागवडीसाठीही उत्तम आहे. जर तुम्ही भाजीपाला लावण्याचा विचार करत असाल तर बंपर उत्पादनासाठी तुम्ही सप्टेंबर महिन्यात आम्ही सांगितलेल्या या भाज्यांची लागवड करू शकता. या भाज्या हंगामी असल्याने आरोग्यासाठीही चांगल्या मानल्या जातात.

 

भाजीपाला सप्टेंबरमध्ये लागवड केले कि हिवाळ्याच्या हंगामापर्यंत तयार होतात. आज आम्ही तुम्हाला हिवाळ्याच्या हंगामात पिकवल्या जाणाऱ्या हिरव्या भाज्यांविषयी सांगणार आहोत, ज्याच्या लागवडीची तयारी तुम्ही आतापासून सुरू केली पाहिजे.

 

 

 

हिरवी मिरची

कदाचित अशी एखादी भाजी असेल जी मिरचीशिवाय केली जाते. अशा परिस्थितीत हे एक असे पिक आहे ज्याची मागणी नेहमीच बाजारात राहते. मिरचीची पेरणी सप्टेंबरमध्ये सुरू होते लागवड करताना शेतात पाणी  मुरणार नाही याची काळजी घ्या आणि विशेषतः रोग प्रतिरोधक बियाणे निवडा.

 

पपई

पपई लागवडीत नुकसानीचा धोका कमी असतो. शेतकरी ती कच्ची भाजी म्हणून विकू शकतात आणि पिकल्यावर फळ म्हणून विकु शकतात. जर पिकांवर व्हायरस दिसला तर ते कडुलिंबाच्या तेलाद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते. वाफे पद्धतीने लागवड केल्यास उत्पन्न जास्त मिळेल आणि नफाही चांगला मिळेल.

 

 

 

ब्रोकोली

ब्रॉकोली ही विदेशी भाजी आहे पण सध्या भारतीयांच्या स्वयंपाकघराची शान बनली आहे. कोबीसारखी दिसणाऱ्या ब्रोकोलीची मागणी हळूहळू बाजारात वाढत आहे, ब्रॉकोलीला हृदयाचा डॉक्टर असे म्हणतात. आणि एवढंच नाही तर भाजीपाला पिकात, ब्रॉकोलीची किंमत देखील जास्त आहे. ही बाजारात सुमारे 50 ते 100 रुपये प्रति किलोने विकले जात आहे. यांची लागवड सप्टेंबरमध्ये सुरू होते आणि लागवड करण्यासाठी आधी रोपवाटिका तयार करावी आणि नंतर लागवड सुरू करा.  पिक लागवडीसाठी तयार होण्यास 4 ते 5 आठवडे लागतात ब्रोकोली पीक 60 ते 90 दिवसात तयार होते.

 

 

 

 

वांगे

सप्टेंबरमध्ये लागवड केल्या जाऊ शकणाऱ्या भाज्यांमध्ये वांगी देखील सामाविष्ट आहे.  सहज पिकणारी ही भाजी या हंगामात चांगला नफा देते. जर सेंद्रिय पद्धतीने याची लागवड केली तर रोगांची लागण कमी प्रमाणात होते.

 

 

 

 

शिमला मिर्ची

शिमला मिर्च ही एक भाजी आहे ज्याची मागणी नेहमीच बाजारात राहते. सप्टेंबर पर्यंत त्याची रोपवाटिका तयार होते आणि आता ती लावण्याची वेळ आली आहे, त्यातून अधिक नफा मिळवण्यासाठी, सप्टेंबर पर्यंत लागवड करावी, बियाणे खरेदी करताना, हे लक्षात ठेवा की ते रोग प्रतिरोधक असले पाहिजे.

 

 

 

 

गाजर

गाजर कंदमुळाच्या प्रकारातील एक स्वादिष्ट आणि पौष्टिक भाजी आहे. देशभरात याची लागवड केली जाते. गाजर हा भाजी,, सॅलड, लोणचे, मुरंबा आणि पुडिंग इत्यादी मध्ये वापरली जातात. कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए गाजरमध्ये आढळतात, जे मानवी शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत.

 

 

 

 

 

फुलकोबी

फुलकोबी एक लोकप्रिय भाजी आहे. सध्या याचे पिक सर्व ठिकाणी घेतले जाते. मेच्या अखेरीस ते जूनच्या सुरुवातीपर्यंत पेरणी करण्याची शिफारस केली जाते. उशिरा येणाऱ्या जातींसाठी ऑगस्ट ते सप्टेंबरच्या मध्यभागी आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबरचा पहिला आठवडा लागवडीसाठी चांगला काळ आहे.

 

 

 

 

पालक

हिरव्या भाज्या पिकांमध्ये पालक लागवडीला विशेष स्थान आहे. रब्बी, खरीप आणि उन्हाळी या तीनही हंगामात देशाच्या जवळजवळ सर्व भागांमध्ये याची लागवड केली जाते. ही अशीच एक भाजी आहे आणि जगभरात त्याची लागवड केली जाते. यांच्यात लोह, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्सचा उच्च स्त्रोत आहे.  याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत.

English Summary: cultivation of vegetable crop in september
Published on: 03 September 2021, 10:47 IST