Agripedia

सोयाबीन सोयाबीनला गोल्डन बीन देखील म्हटले जाते, या पोस्टमध्ये आपण जाणून घेऊया की,सोयाबीनची लागवड कशी करावी, सोयाबीणच्या कोणत्या सुधारित वाणी/जाती आहेत आणि भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त लागवड केली जाते. सोयाबीन हे भारतात पिकवल्या जाणाऱ्या लोकप्रिय पिकांपैकी एक आहे. सोयाबीन तेलबिया्नाचे पीक आहे आणि भारतात तेलाच्या एकूण पुरवठापैकी 18% पुरवठा सोयाबीन करते. खरीप हंगामात सोयाबीन लागवड केली तर हे फायद्याचे पीक ठरते व चांगले उत्पन्न देते. तेलाव्यतिरिक्त सोयाबीन सोया दूध, सोया पीठ आणि जैवइंधन तसेच,पशुआहारासाठी वापरतात. सोयाबीनची शेती : Cultivation Of Soyabean हवामान व जमीन सोयाबीन एक गरम हवामानातं येणारे पीक आहे, भारतात खरीप हंगामात याची लागवड होते. हे वालुकामय आणि हलकी जमीन वगळता सर्व प्रकारच्या जमिनीत वाढते परंतु चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत किंवा चिकणमातीत चांगले उत्पादन मिळते. सोयाबीन पिकासाठी माती आणि तापमानाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्देः ● मातीचे पीएच (सामू )मूल्य 6.0 ते 6.8 दरम्यान असावे. ● तापमान 18 डिग्री सेल्सियस ते 38 डिग्री सेल्सियस दरम्यान असले पाहिजे. ● सोयाबीन पिकासाठी जलयुक्त, खारट माती आणि क्षारीय माती असलेली जमीन योग्य नाही. ● कमी तापमानाचादेखील या पिकाच्या वाढीवर गंभीर परिणाम होतो.

Updated on 06 July, 2021 1:35 PM IST

सोयाबीन

सोयाबीनला गोल्डन बीन देखील म्हटले जाते, या पोस्टमध्ये आपण जाणून घेऊया की,सोयाबीनची लागवड कशी करावी, सोयाबीणच्या कोणत्या सुधारित वाणी/जाती आहेत आणि भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त लागवड केली जाते.

सोयाबीन हे भारतात पिकवल्या जाणाऱ्या लोकप्रिय पिकांपैकी एक आहे. सोयाबीन तेलबिया्नाचे पीक आहे आणि भारतात तेलाच्या एकूण पुरवठापैकी 18% पुरवठा सोयाबीन करते.

 खरीप हंगामात सोयाबीन लागवड केली तर हे फायद्याचे पीक ठरते व चांगले उत्पन्न देते.  तेलाव्यतिरिक्त सोयाबीन सोया दूध, सोया पीठ आणि जैवइंधन तसेच,पशुआहारासाठी वापरतात.

 

 

 

 

सोयाबीनची शेती : Cultivation Of Soyabean

 

हवामान व जमीन

सोयाबीन एक गरम हवामानातं येणारे पीक आहे, भारतात खरीप हंगामात याची लागवड होते. हे वालुकामय आणि हलकी जमीन वगळता सर्व प्रकारच्या जमिनीत वाढते परंतु चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत  किंवा चिकणमातीत चांगले उत्पादन मिळते.

 

 

सोयाबीन पिकासाठी माती आणि तापमानाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्देः

  • मातीचे पीएच (सामू )मूल्य 6.0 ते 6.8 दरम्यान असावे.
  • तापमान 18 डिग्री सेल्सियस ते 38 डिग्री सेल्सियस दरम्यान असले पाहिजे.
  • सोयाबीन पिकासाठी जलयुक्त, खारट माती आणि क्षारीय माती असलेली जमीन योग्य नाही.
  • कमी तापमानाचादेखील या पिकाच्या वाढीवर गंभीर परिणाम होतो.

 

 

 

 

सोयाबीणच्या पिकासाठी जमिनीची मशागत कशी करणार बर?

भारतात सोयाबीन लागवडीसाठी जमीन तयार करणे उन्हाळ्यापासूनच सुरु केले पाहिजे. जमीन तयार करण्यासाठी प्रथम नांगरणी करावी, नंतर कल्टिव्हेटरचा मारावे व शेवटी रोटावेटर चालवावा.

 

 

 

 

 

 

बीयाणे कोणते बर निवडणार?

चांगल्या उत्पादनासाठी बियाण्याची निवड फार महत्वाची आहे. भौगोलिक स्थानानुसार सोयाबीनचे सुधारित वाण-

 

उत्तरी डोंगराळ प्रदेशासाठी सोयाबीनचे सुधारित वाण

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसाठी -

 

 व्ही एल सोया - 2, व्ही एल सोया - 47, पुसा - 16, हारा सोया, पालम सोया, पंजाब - 1, पीएस - 1241, पीएस - 1092, पीएस - 1347, शिलाजित, व्हीएलएस - 59 आणि व्ही एलएस 63 इ.

 

 

 

 

उत्तरी मैदानी जातींचे सुधारित वाण

पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी -

पुसा - 16, पीएस - 564, एसएल - 295, एसएल - 525, पीबी - 1, पीएस - 1042, डीएस - 9712, पीएस - 1024, डीएस - 9814, पीएस - 1024, पीके - 416, पीएस - 1241, आणि पीएस 1347 इ.

 

 

 

मध्य भारत प्रदेशातील सुधारित वाण -

 मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातसाठी -

 

 एनआरसी -7, एनआरसी- 37, जेएस- 93 -05,जेएस-95-60, जेएस-335, जेएस-80-21, समृद्धि आणि एम ए यू एस 81 इ.

 

 

 

 

दक्षिणेकडील प्रदेशातील सुधारित वाण -

 दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशसाठी -

 

 एमएसीएस- 24, पूजा, पीएस- 1029, सीओ -1, सीओ -2, केएचएसबी -2, एलएसबी -1, प्रतीकार, फुले कल्याणी, आणि प्रसाद इ.

 

 

 

 

 

पूर्वोत्तर प्रदेशातील सुधारित वाण -

 बंगाल, छत्तीसगड, उत्तराखंड, ओरिसा, आसाम आणि मेघालय -

 

 एम ए यू एस- 71, बिरसा सोयाबीन -1, इंदिरा सोया- 9, प्रताप सोया -9, आणि जेएस- 80-21 इ.

 

 

 

 

 

 

सोयाबीन ची पेरणी

सोयाबीन हे भारतातील खरीप पीक आहे, पावसाळा होताच त्याची पेरणी सुरू होते.  सोयाबीनच्या पेरणीसाठी खालील बाबी महत्वाच्या आहेत.

  • पेरणीची वेळः सोयाबीनची पेरणी जून व जुलैच्या पहिल्या आठवड्यात करावी.
  • पेरणीची पध्दत: सोयाबीनची पेरणी सीडड्रिलने करावी आणि एकरी 25 ते 30 किलो बियाने पेरणीसाठी असावे.
  • पिकातील अंतर: दोन ओळींमधील अंतर 45 ते 50 सेंमी आणि बीचे अंतर 4 ते 7 सेमी दरम्यान असले पाहिजे.
  • पेरणीची खोली: बियाणे 2.5 सेमी ते 5 सेमी खोल पेरावे.
  • बियाण्यावरील उपचारः सोयाबीन बियाण्यावर कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यू.पी किंवा कोणत्याही चांगल्या बुरशीनाशकाचा वापर केला पाहिजे.

 

 

 

 

 

खत व्यवस्थापन

  • शेणखत: उन्हाळ्यात शेतात शेणखत घालावे, शेणखत सोयाबीनसाठी खूप फायदेशीर आहे.
  • नायट्रोजनः सोयाबीन वातावरणातून नायट्रोजन घेत असले तरी ते पुरेसे नाही, म्हणून दर एकरी 10 ते 15kg किलो नायट्रोजन खाद्य घाला.
  • फॉस्फरस: सोयाबीन लागवडीसाठी 32 किलो फॉस्फरस पुरेसे आहे.
  • पोटॅश: जमिनीत पोटॅशची कमतरता असल्यासच पोटॅश खाद्य वापरा.

 

 

 

 

 

 

पाणी व्यवस्थापन

सोयाबीन एक खरीप पीक आहे, म्हणून पावसाचे पाणीच सोयाबीन पिकासाठी पुरेसे आहे, जर आपण उन्हाळ्यामध्ये लागवड केली तर 12 ते 15 दिवसांच्या अंतराने 5-6 वेळा पाणी द्यावे.

 

 

 

 

 

 

 

तण नियंत्रण

सोयाबीनचे उत्पादन कमी होण्याचेह तण हे एक प्रमुख कारण आहे, यामुळे त्याची वाढ थांबते, ज्यामुळे उत्पादन घटते.

 

  • सोयाबीणच्या पिकातील तण नियंत्रणासाठी पिकाची बैलांच्या साहाय्याने कोळपनी करावी. कोळपनी ही पीक 15 ते 20 दिवसाचे झाल्यावर करावी.
  • सोयाबीणच्या पिकातील तण नियंत्रणासाठी निंदनी देखील करावी. पहिली निंदनी पीक 15 ते 20 दिवसांचे झाल्यावर करावी. दुसऱ्यांदा निंदनी 35 ते 40 दिवसात करावी.
  • सोयाबीनच्या पिकावर तण नियंत्रणासाठी फवारणी करावी. काही तननियंत्रक औषधे खालीलप्रमाणे: परस्युट (Pursuit ),वीडब्लॉक (Weedblock),पेट्रीयॉट (Patriot),गार्ड (Guard), लगाम, सॅट्रिक्स,फ़्यूजीफ्लैक्स, टरगा सुपर,आईरीस, व्हीप सुपर, पटेला इत्यादी.

 

 

 

 

 

 

 

सोयाबीन पिकावरील रोग व उपचार

  • लीफ स्पॉट रोग:-

 सोयाबीनच्या पानांमध्ये फिकट लाल, तपकिरी रंगाचे डाग दिसतात आणि काहीवेळा ते देठावर देखील दिसतात, त्याच्या प्रादुर्भावामुळे पाने अकाली पडतात.

उपचार - प्रतिबंध:

पेरणीच्या 30 -35 दिवसांनी कार्बेंडाझिम किंवा थायोफिनेट मिथिईलच्या 0.05% द्रावणासह पिकावर फवारणी करावी व दुसरा हात 15 दिवसांनी मारावा.

 

 

  • पिवळा मोजेक रोग:

 पिवळा मोझॅक किंवा यलो मोझॅक हा व्हायरस-जनित रोग आहे जो मुख्यत: पांढर्‍या माशीच्या संपर्कात आल्यामुळे होतो.  ही माशी झाडाच्या फांद्यावर अंडी घालते, ज्यामुळे स्टेममध्ये एक सुरवंट तयार होतो, जो स्टेमच्या आतील ज्येलिम नष्ट करतो, ज्यामुळे वनस्पती कोणत्याही शेंगाशिवाय पिवळसर व कोरडे होऊ लागते आणि हळूहळू संपते.

उपचार /प्रतिबंध :-

सर्वप्रथम, रोगाची सुरुवातीची लक्षणे दिसताच, संक्रमित झाडे उपटून टाका आणि एक खड्डा खणून घ्या आणि त्यास दडपून टाका.

 इमिडाक्लोप्रिड, लॅम्बडा सिहॅलोथ्रीन आणि थियॅमेथॉक्सम यांच्या मिश्रनाची फवारणी करा.

 

 

 

 

 

 

 

सोयाबीन पिकावरील कीड व त्याचे नियंत्रण

 कीटक सोयाबीनमध्ये वारंवार दिसतात.  सोयाबीनच्या लागवडीवर कोणत्या कीटकांचा परिणाम होतो आणि त्यापासून बचाव कसा करावा हे जाणून घेऊया.

  • व्हाइट फ्लाय:

 पांढर्‍या माशीवर नियंत्रण ठेवण्यासाठी थायमेथॉक्सम 40 ग्रॅम किंवा ट्रायझोफॉस 300 मिली / एकर फवारणी करा.  आवश्यक असल्यास पहिल्या फवारणीच्या 10 दिवसानंतर दुसरी फवारणी करा.

 

 

  • हेअर केटरपिलर:

 केसाळ सुरवंटचा हल्ला जास्त असल्यास क्विनॉलफॉस 300 मि.ली.  किंवा डिक्लोरस 200 मी. ली.एकर /  स्प्रे घ्या.

 

 

  • तंबाखू सुरवंट:

 जर या किडीचा प्रादुर्भाव दिसून आला तर एकरी एसीफेट 57 एसपी 800 ग्रॅम किंवा क्लोरपायरीफॉस  20 इ.सी. 1.1 लिटर पाण्यात फवारणी करावी.

 

 

  • फोड बीटल:

 काळ्या बीटलपासून बचाव करण्यासाठी, इंडोक्सकार्ब 14.5 एससी 200 मि.ली.  किंवा एसीफेट 75 एससी 800 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी.

 

 

 

 

सोयाबीणच्या पिकासाठी कीटकनाशक औषधे:

 

बाजारात सोयाबीन पिकासाठी सामान्य कीटकनाशके बाजारात उपलब्ध आहेत.

 

 ट्रायझोफॉस - ट्रायझोफॉस 40% ईसी

 प्रोफेनोफॉस - प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% ई.सी.

 मोनोक्रोटोफॉस- मोनोक्रोटोफॉस 36% एसएल

 क्विनाल्फॉस- क्विनाल्फॉस 25% ईसी

 

 

 

 

 

 

 

सोयाबीनची कापणी

सर्व वाण सुमारे 90 ते 120 दिवसात येतात, जेव्हा सोयाबीनची पाने कोरडी पडतात आणि गळतात तसेच सोयाबीनच्या शेंगापण सुकतात तेव्हा सोयाबीनची कापणी करण्याची वेळ आलेली असते .

 मजुरांनी काढलेली सोयाबीन एका ठिकाणी जमा करून घ्यावे आणि नंतर सोयाबीनला उन दाखवावे आणि मग मळणी करावी.

 

 

 

 

English Summary: cultivation of soyabeon
Published on: 06 July 2021, 01:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)