Agripedia

सध्या शेती करण्याची परंपरागत पद्धत आणि घेण्यात येत असलेली परंपरागत पिके जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. केवळ उदर्निर्वाहपुरती शेती ही कल्पना आता मागे पडत असून आता शेतीला व्यावसायिक स्वरूप येत आहे.

Updated on 23 April, 2022 11:33 AM IST

सध्या शेती करण्याची परंपरागत पद्धत आणि घेण्यात येत असलेली परंपरागत पिके जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. केवळ उदर्निर्वाहपुरती शेती ही कल्पना आता मागे पडत असून आता शेतीला व्यावसायिक स्वरूप येत आहे.

शेतीची पद्धत देखील बदलली असून  त्यामध्ये तंत्रज्ञानाने प्रवेश केला आहे. त्या अनुषंगाने पीक पद्धती देखील बदल झाला असून शेतकरी अनेक वेगवेगळ्या प्रकारची पिके शेती मध्ये घेत आहेत. अनेक प्रकारचे विदेशी भाजीपाला, ड्रॅगन फ्रुट, स्ट्रॉबेरी सारख्या  फळबागांचा प्रयोग एवढेच काय महाराष्ट्रातील काही भागांमध्ये शेतकरी सफरचंदाचा प्रयोग देखील करीत आहेत. त्यातल्या त्यात औषधी वनस्पतींची लागवडीकडे शेतकऱ्यांचा ट्रेंड आता वाढत चाललेला आहे. त्यामध्ये शतावरी, अश्वगंधा  इत्यादी  औषधी वनस्पतींची लागवड शेतकरी करू लागले आहेत. आज आपण या लेखामध्ये अशा एका औषधी वनस्पतीची माहिती घेणार आहोत. तिच्या लागवडीच्या माध्यमातून  शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवता येऊ शकतो. या औषधी वनस्पतीचे नाव आहे ब्राम्ही होय. या औषधी वनस्पतीची याबद्दल आपण या लेखात माहिती घेऊ.

नक्की वाचा:फक्त पाच गुंठे जमिनीत फळबाग लागवड केली आहे का? दादांनो! तरी आता मिळणार अनुदान, अनुदानाच्या निकषांमध्ये बदल

ब्राम्ही एक उपयोगी औषधी वनस्पती

एक औषधी वनस्पती असून आयुर्वेदामध्ये या वनस्पतीला खूप महत्त्व आहे.ब्राम्ही औषधी वनस्पती ला ब्रेन बूस्टर देखील म्हणतात. या वनस्पतीची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

कारण एक आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीच्या लागवडीचा विचार केला तर  भारतातच नव्हे तरविदेशात देखील या वनस्पतीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.यामध्ये युरोप,ऑस्ट्रेलिया,उत्तर व दक्षिण अमेरिका,आफ्रिका आणि आशियातील अनेक देशांमध्ये याऔषधी वनस्पतींची लागवड केली जाते. या वनस्पतीच्या लागवडीसाठी उष्णकटिबंधीय हवामान चांगले असते. कालवे किंवा नद्या यासारख्या विविध पाण्याच्या साठ्यात जवळ ब्राम्ही अगदी सहजपणे वाढते. भारतामध्ये जवळजवळ सर्वच राज्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात ब्राम्हीची लागवड केली जाते. आयुर्वेदात मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे ब्राम्ही शेती शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा मोठा स्त्रोत ठरू शकते. मागणीच्या  मानाने सरकार देखील शेतकऱ्यांना याबाबत प्रोत्साहन देत आहे.

नक्की वाचा:Corona Mask; देशात कोरोना वाढतोय! 'या' राज्यांमध्ये पुन्हा मास्क केला बंधनकारक..

 थोडे लागवड पद्धती विषय

 या औषधी वनस्पतीची लागवड करण्यासाठी अगोदर रोपवाटिका तयार केली जातेनंतर तयार रोपांची पुनर्लागवड केली जाते. साधारणपणे बंद करून ब्राम्ही ची लागवड केली जाते यासाठी क्लोजर ते क्लोजरचे  चे अंतर 25 ते 30 सेंटीमीटर व दोन रोपांमधील अंतर अर्धा फूट ठेवले जाते त्यामुळे याचे उत्पादन चांगले मिळते.

लागवड केल्यानंतर आंतरमशागत म्हणजेच खुरपणी करून पीक तणमुक्त ठेवणे गरजेचे असते तसेच योग्य वेळी पाण्याचा पुरवठा करणे देखील महत्त्वाचे असते. लागवडीपासून पहिले पीक चार महिन्यात काढण्यासाठी तयार होते. ब्राम्हीची लागवड एकदा केल्यानंतर शेतकऱ्यांना तीन ते चार वेळाया माध्यमातून उत्पन्न मिळते. या वनस्पतीची मुळे आणि पाने विकून अधिक पैसे मिळतात.

English Summary: cultivation of medicinal plant bramhi is profitable for farmer
Published on: 23 April 2022, 11:33 IST