आपल्या देशामध्ये भाजीपाल्यासाठी योग्य हवामान, जमिनीची विविधता, भरपूर सूर्यप्रकाश तसेच पाणी व इतर सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे अनेक प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन वर्षभर घेता येणे शक्य आहे.
अल्पभूधारक शेतकरी अतिशय कमी भांडवलामध्ये कमी वेळेत जास्त उत्पादन यातून मिळवू शकतात. पाऊस मान अनियमित असल्याने उपलब्ध पाणी साठा कमी होत आहे त्यामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पीकसंरक्षण साठीच्या खर्चात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत खरीप हंगामातील पोषक वातावरणामध्ये भाजीपाल्याचे उत्पादन घेणे फायद्याचे ठरू शकते.
भाजीपाल्यासाठी या गोष्टींची घ्या काळजी
- जमीनवहवामान- प्रतीक भाजीपाला पिकास विशिष्ट जमिनीची आणि हवामानाची आवश्यकता असते परंतु सर्वसाधारणपणे पाण्याचा चांगला निचरा होणारी,मध्यम प्रतीची,गाळाची किंवा पोयट्याची जमीन निवडावी. जमिनीचा सामू साडेसहा ते साडेसात असावा. अशा जमिनीमध्ये भाजीपाला पिकांची वाढ चांगली होते व त्यांना अन्नद्रव्य उपलब्ध होतात.
- भाजीपालाच्या जाती- भाजीपाल्याच्या सुधारित व संकरित जातींचा वापर करावा. सुधारित जाती या अधिक उत्पादनासोबत लवकर पक्वता येणाऱ्या असतात.काहीच काही जाती रोग व किडीस प्रतिकारक असतात तसेच काही जातींमध्ये विविध गुणवत्ता असते. त्याचा व बाजारातील मागणीचा योग्य विचार करून शुद्ध व जातिवंत बी वापरावे.
भाजीपाला लागवड पूर्वी काळजी
- बीजप्रक्रिया- भाजीपाला पिके उदा. कारली, दोडका, दुधी भोपळा,भेंडी यांची लागवड बियांपासून केली जाते. लागवडीपूर्वी बियाण्यास थायरम किंवा कॅप्टन किंवा कार्बेन्डाझिम तीन ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.मिरची, वांगे यांची रोपे चार ते सहा आठवड्यात तर टोमॅटो रोपे तीन ते चार आठवड्यात लागवडीसाठी तयार होतात परंतु कांदा पिकांची रोपे लागवडीसाठी योग्य होण्यास सहा ते आठ आठवड्यांचा कालावधी लागतो. या पिकांच्या रोपे पुनर्लागवड करण्या अगोदर कीटकनाशक आणि बुरशीनाशकाच्या पुढील द्रावणात बुडवून लावावीत.
प्रमाण- प्रति 10 लिटर पाणी – इमिडाक्लोप्रीड दहा मिली + कार्बन्डेझिम10 ग्रॅम किंवा मॅन्कोझेब 25 ग्रॅम लागवडीनंतर हलकेसे पाणी द्यावे.
रोपवाटिका व्यवस्थापन
भाजीपाला ची रोपे तयार करण्यासाठी तीन बाय दोन मीटर आकाराचे गादी वाफे तयार करावेत. त्यामध्ये तीन ते चार किलो चांगले कुजलेले शेणखत,15:15:15 हे मिश्र खत 200 ग्रॅम व शिफारशीत दाणेदार कीटकनाशक चांगले मिसळून द्यावे. भाजीपाल्याचे बियाणे तीन ते चार सेंटीमीटर खोलीवर पेरून मातीने झाकावे. त्यानंतर हलके पाणी द्यावे. रोपांची उगवण झाल्यानंतर त्यामधील तण काढून रोपवाटिका स्वच्छ ठेवावे.
Published on: 13 February 2022, 06:53 IST