Agripedia

ब्रॉकोली ही वास्तविक परदेशातून आली पण भारतीयांच्या किचन मध्ये घर करून गेली. खरंच मित्रांनो! ब्रोकोली ही जरी विदेशी पिक असले तरी त्याची शेती भारतीयांसाठी एक वरदान ठरू शकते. कारण भारतीयांच्या आहारात आता ब्रॉकोलीचा वापर वाढतच चाल्लाय आणि हो बरका ह्याच प्रमुख कारण म्हणजे ब्रॉकोलीमध्ये असणारे जीवनसत्वे, हो ही विदेशी भाजी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असल्याचे सांगितले जातं आहे. चला तर मग जाणुन घेऊया ब्रॉकोलीच्या लागवडिविषयी.

Updated on 28 August, 2021 4:14 PM IST

ब्रॉकोली ही वास्तविक परदेशातून आली पण भारतीयांच्या किचन मध्ये घर करून गेली. खरंच मित्रांनो! ब्रोकोली ही जरी विदेशी पिक असले तरी त्याची शेती भारतीयांसाठी एक वरदान ठरू शकते. कारण भारतीयांच्या आहारात आता ब्रॉकोलीचा वापर वाढतच चाल्लाय आणि हो बरका ह्याच प्रमुख कारण म्हणजे ब्रॉकोलीमध्ये असणारे जीवनसत्वे, हो ही विदेशी भाजी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असल्याचे सांगितले जातं आहे. चला तर मग जाणुन घेऊया ब्रॉकोलीच्या लागवडिविषयी.

 

ब्रोकोली विषयी अल्पशी माहिती ( Information about brocoli in marathi )

 

ब्रोकोली ही स्वादिष्ट भाजीपाल्यांपैकी एक आहे. जे कोबीवर्गीय पिकांशी संबंधित आहे.ब्रोकोलीचा वापर भारतीयांच्या आहारात फ्लॉवर प्रमाणेच केला जातो. ब्रॉकोलीच्या गड्ड्याची फ्लॉवरप्रमाणे भाजी बनवली जाते.

ब्रोकोलीमध्ये प्रथिने, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, लोह, व्हिटॅमिन ए, सी आणि इतर अनेक पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. यात असलेले पोटॅशियम कोलेस्टेरॉलची पातळी वाढू देत नाही. व्हिटॅमिन सी पुरेशा प्रमाणात आढळते आणि व्हिटॅमिन सी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि कोरोनासारख्या आजारात देखील संसर्ग रोखण्यास मदत करते असे सांगितले जाते. गरोदर महिलांनी गरोदरपणात याचे सेवन करावे असा सल्ला देखील दिला जातो.ब्रोकोलीमध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम आणि झिंक देखील भरपूर प्रमाणात आहेत, ब्रोकोली शरीराला पुरेसे प्रमाणात मिळाल्यास हाडे मजबूत होतात. ब्रोकोली हे सलाद मध्ये कच्चे खाल्ले जाते. ब्रॉकोलीची शेती ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी संजीवनीच काम करू शकते. कारण की, ग्रामीण भागात ब्रॉकोलीची लागवड अजुनही फारशी प्रचलित नाही.

 

ब्रोकोलीची लागवड (brocoli cultivation )

हरितगृह, पॉली हाऊस तसेच शेड नेट खाली ह्याचे पिक घेता येते. सध्या, ब्रोकोली हायड्रोपोनिक पद्धतीने वाढवण्याची पद्धत चांगली मानले जाते, ज्यामुळे लागवडीचा खर्च देखील कमी होईल आणि उत्पादन देखील चांगले होईल. ब्रोकोलीच्या भाजीपाल्याच्या उत्पादनाबद्दल बोलायचे झाले तर चीननंतर भारत या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

 

 

 

 

शेतकरी मित्रांनो ब्रोकोली शेती करण्याच्या विचारात आहात काय मग जाणुन घ्या ब्रॉकॉलीला लागणाऱ्या हवामानाविषयी?

ब्रोकोलीला थंड आणि दमट हवामानाची आवश्यकता असते. दिवस तुलनेने कमी असतील म्हणजेच हिवाळ्याच्या दिवसात ब्रॉकोलीच्या फुलांची वाढ जास्त होते. फुल निघण्याच्या वेळी उच्च तापमानामुळे फुले खवलेदार, पानेदार आणि पिवळी होतात.

 

 

 

 

बरं ब्रोकोली पिकासाठी लागणारी जमीन कशी असावी? माहितीय नाही अहो! मग जाणुन घ्या.

ब्रोकोलीचे पिक हे कोणत्याही जमिनीत घेतले जाऊ शकते. हे हलक्या जमिनीतही येऊ शकते मात्र त्यात पुरेशा प्रमाणात शेण खत किंवा इतर सेंद्रिय खताचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु शेतीविशेषज्ञ ब्रॉकोलीची शेती करण्यासाठी वाळूयुक्त चिकनमाती असलेली जमीन उपयुक्त असल्याच नमूद करतात.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

मित्रांनो लागवडीचा हंगाम नेमका कोणता हे जाणुन घेऊ.

उत्तर भारतात खासकरून मैदानी प्रदेशात हिवाळ्याच्या दिवसात ब्रोकोली लागवडीचा सल्ला दिला जातो. ह्याच्या व्यवस्थित वाढीसाठी व गड्ड्याच चांगल्या पोषणासाठी तापमान 21-26 डिग्री सेल्शिअस दरम्यान असावे अशे मार्गदर्शन कृषी वैज्ञानिक वारंवार शेतकऱ्यांना करत असतात. ब्रोकोलीची फ्लॉवर प्रमाणे रोपवाटिका तयार करावी लागते आणि ब्रॉकोलीची रोपवाटिका तयार करण्याची योग्य वेळ ही ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात असते. पर्वतीय प्रदेशात ब्रोकोलीची ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात रोपवाटिका तयार करावी

 

 

 

 

 

 

English Summary: cultivation of brocoli
Published on: 24 August 2021, 04:34 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)