Agripedia

भारतात सुपारीला केवळ आपल्या खाण्यातच नव्हे तर पुजा / उपासनेतही विशेष महत्त्व आहे, सुपारी खाण्याचे तोटे आपण जाणतो, पण फार कमी लोकांना सुपारीचे फायदे माहीत आहेत. सुपारी खाण्याचे फायदे:- सुपारीमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातून विषारी घटक बाहेर काढतात. मधुमेहासारखे आजार, ज्यात वारंवार कोरडे तोंड पडत असते, त्यात सुपारी चघळल्याणे ती समस्या दुर होण्यास मदत होते.

Updated on 14 September, 2021 2:24 PM IST

भारतात सुपारीला केवळ आपल्या खाण्यातच नव्हे तर पुजा / उपासनेतही विशेष महत्त्व आहे, सुपारी खाण्याचे तोटे आपण जाणतो, पण फार कमी लोकांना सुपारीचे फायदे माहीत आहेत.

 सुपारी खाण्याचे फायदे:-

सुपारीमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातून विषारी घटक बाहेर काढतात.

मधुमेहासारखे आजार, ज्यात वारंवार कोरडे तोंड पडत असते, त्यात सुपारी चघळल्याणे

ती समस्या दुर होण्यास मदत होते.

भारतात सुपारीची लागवड कोठे आहे

देशात सुपारीची लागवड प्रामुख्याने कर्नाटक, तामिळनाडू, मेघालय, केरळ, आसाम आणि कर्नाटक पश्चिम बंगालमध्ये केली जाते.

 सुपारीच्या सुधारित जाती:-

सुपारीच्या सर्वात प्रगत जातींबद्दल जाणुन घेऊयात - सुमंगला, मंगला, मोहितनगर, व्हीटीएलएएच 1, 2 आहेत, ज्यामध्ये सर्वात जास्त व्यापारी तत्त्वावर श्रीमंगला वाणीची लागवड ही भारतात मुख्यतः केली जाते.

 सुपारी लागवडीसाठी जमीन आणि हवामान:-

चांगल्या निचरा असलेल्या सर्व प्रकारच्या सुपीक जमिनीत सुपारीची लागवड करता येते, अशा ठिकाणी जिथे तापमान 10 ते 38 अंश सेल्सिअस असते असे हवामान सुपारी पिकास मानवते.

सुपारीची लागवड कधी करावी:-

सुपारीची लागवड, उन्हाळी हंगाम वगळता, सर्व हंगामात लागवड करता येते. जून ते डिसेंबर या काळात सुपारीची लागवड करणे चांगले मानले जाते.

 शेताची तयारी आणि पेरणी -

जमीन दोन ते तीन वेळा माती कुजून जाईपर्यंत नागरणे गरजेचे असते, आणि शेत तणमुक्त ठेवा. या पिकाच्या पेरणीसाठी सप्टेंबर ते ऑक्टोबर आणि मे ते जून या महिन्यांची शिफारस केली जाते. 2.7 x 2.7 मीटर अंतर सुपारी पेरणीसाठी योग्य आहे.  90 x 90 x 90 सेमी  आकाराचे खड्डे खोदले जातात व सुपारीची ची लागवड बियांद्वारे केली जाते.

रोप लागवड पूर्वी प्रक्रिया

मुळांच्या चांगल्या विकासासाठी, खड्ड्यांमध्ये रोप लावण्यापूर्वी, नवीन झाडांना IBA@1000ppm आणि क्लोरपायरीफॉस 5 मि.ली.  प्रति लिटर पाण्यात दोन ते पाच मिनिटे बुडवून घ्या.

 

पिकात घेतले जाऊ शकतात अशी आंतरपीके-

मिरपूड, कॉफी, व्हॅनिला, वेलची, लवंग आणि लिंबूवर्गीय पिके आंतरपीक म्हणून घेता येतात.

 सुपारी पिकासाठी खत व्यवस्थापन

10 ते 20 किलो चांगले कुजलेले शेणखत 5 किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या झाडांना द्यावे.  नायट्रोजन 100 ग्रॅम, फॉस्फरस 40 ग्रॅम, पोटॅश 140 ग्रॅम प्रति झाड लावावे. 5 वर्षापेक्षा कमी वयाची झाडांना, वरील खतांपैकी निम्मी खाद्य लागेलं. ही खते जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात लावावीत.

 

 तण नियंत्रण आणि पाणी व्यवस्थापन :

खुरपणी वर्षातून दोन ते तीन वेळा केली जाते.  जिथे जमीन उताराची आहे, त्या मातीची धूप टाळण्यासाठी पायऱ्यांसारखे बनवले जाते.  नोव्हेंबर-फेब्रुवारी आणि मार्च-मे महिन्यात आठवड्यातून एकदा पाणी द्यावे.

 पिक काढणी / उत्पादन : पेरणीनंतर 5 वर्षांनी फळ देण्यास सुरवात होते.  जेव्हा सुपारी फळ तीन-चतुर्थांश पिकतात तेव्हा त्याची काढणी केली जाते.

 

English Summary: cultivation of bittel crop and technology
Published on: 14 September 2021, 02:24 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)