Agripedia

भेंडी ही एक जीवनसत्वे, विविध प्रकारची खनिजे व कर्बोदकांचे एक स्त्रोत आहे.हे निरोगी राहण्यासाठी महत्त्वाचे आहेत. तुम्ही जी भेंडी खातात त्या माध्यमातून जर तुम्हाला जास्तीचे पोषक घटक मिळाली तर तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. भेंडीचा एक प्रकार म्हणजे लाल भेंडी आरोग्यासाठी महत्त्वाचा भेंडीचा प्रकार आहे.

Updated on 18 February, 2022 6:20 PM IST

भेंडी ही एक जीवनसत्वे, विविध प्रकारची खनिजे व कर्बोदकांचे एक स्त्रोत आहे.हे निरोगी राहण्यासाठी महत्त्वाचे आहेत. तुम्ही जी भेंडी खातात त्या माध्यमातून जर तुम्हाला जास्तीचे पोषक घटक मिळाली तर तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. भेंडीचा एक प्रकार म्हणजे लाल भेंडी आरोग्यासाठी महत्त्वाचा भेंडीचा प्रकार आहे.

लाल भेंडी मधून अँथोसायनिन नावाचे अँन्टिऑक्सिडंट मिळते. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. लाल भेंडी जातीची लागवड खरीप मध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाळ्यामध्ये जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात करावी. लाल भेंडी ही जात प्रतिकूल तापमानास सहन करू शकते. तिचा कालावधी 120 ते 130 दिवसांचा असून काढणी सुरू व्हायला 40 ते 50 दिवस लागतात. या भेंडीच्या फळांचा रंग लालसर असून लांबी सात ते आठ इंच व उत्पन्न एक ते दीड किलो प्रति झाड आहे. प्रामुख्याने या जातीची लागवड जम्मू आणि काश्मीर वगळता संपूर्ण भारतात केली जाऊ शकते. या जातीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ही पौष्टिक व शिजवल्यानंतर कमी चिकट असल्याने बाजारात तिला जास्त मागणी आहे.

लाल भेंडी लागवड विषयी महत्त्वपूर्ण माहिती

  • लाल भेंडीचे संशोधन केलेली संस्था- भारतीय भाजीपाला अनुसंधान संस्था, वाराणसी उत्तर प्रदेश या संस्थेने संशोधन केलेले आहे.
  • जमीन व हवामान- उष्ण व समशीतोष्ण वातावरण पोषक व पोटाच्या जमीन उत्तम असते.
  • लागवड- खरीप हंगामामध्ये लागवड करायची असेल तर 15 जून ते 15 जुलै हा काळयोग्य असतो. उन्हाळी हंगामामध्ये लागवड करायची असेल तर जानेवारीचा तिसरा आठवडा म्हणजेच 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी हा काळ योग्य असतो.
  • लागवडीसाठी बियाण्याचे प्रमाण- 12 ते 15 किलो हेक्टरी बियाणे पुरेसे होते.
  • लागवडीआधी बीजप्रक्रिया- लागवड करण्याआधी एक ते दोन ग्रॅम कार्बेन्डाझिम व दोन ग्रॅम थायरम किंवा पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा अधिक 25 ग्रॅम अझोस्पिरिलम ब्रासीलेन्सीप्रति किलो बियाण्यास चोळावे.
  • लागवडीचे अंतर- लागवड करताना 30 बाय 15 सेंटिमीटर अंतरावर करावी.
  • खते देण्याची वेळ- सेंद्रिय खते  द्यायचे असतील तर पेरणीपूर्वी 15 दिवस अगोदर द्यावी तसेच रासायनिक खते दहा किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश प्रति हेक्‍टरी द्यावे. अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व उर्वरित 50 किलो नत्र तीन समान हप्त्यांमध्ये विभागून 30,40 तो 60 दिवसांनी द्यावे. माती परीक्षणानुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असणाऱ्या जमिनीत फेरस सल्फेट, झिंक सल्फेट प्रत्येकी 20 किलो प्रति हेक्‍टर अधिक बोरॅक्‍स पाच किलो प्रति हेक्‍टर पेरणीच्या वेळी जमिनीतून किंवा फेरस सल्फेट अधिक झिंक सल्फेट 0.5 टक्के बोरिक एसिड 0.2 टक्के पेरणीनंतर व 30 ते 45 दिवसांनी फवारावे.
  • पाणी व्यवस्थापन- खरीप हंगामामध्ये लागवड असल्याकारणाने पाण्याची गरज जास्त भासते नाही. परंतु आवश्‍यकतेनुसार आणि पिकाची परिस्थितीनुसार पाण्याच्या पाळ्या द्यायला हव्यात.
  • लाल भेंडीची काढणी- पेरणीनंतर 35 ते 45 दिवसात फुले येतात व त्यानंतर पाच ते सहा दिवसात फळे तोडणे योग्य होतात. कोवळ्या फळाची काढणे थोडा सुरू झाल्यास दोन-तीन दिवसाच्या अंतराने करावी. तोडणी करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या भेंडी हार्वेस्टचा वापर करावा.
  • भेंडी निर्यात करायची असेल तर पाच ते सात सेंटिमीटर लांब कोवळ्या एकसारख्या फळांची तोडणी करावी.काढणी करताना सकाळी लवकर करावी. काढणीनंतर शून्य ऊर्जा शीतकक्षामध्ये भेंडीचे पूर्वशीतकरण करावे.
  • लाल भेंडी पासून मिळणारे उत्पन्न, असलेली मागणी आणि नफा- 15 ते 20 टनपर्यंत प्रति हेक्‍टर उत्पादन मिळते. मी चिकट आणि या बरोबर पिकांच्या नोंदणीमुळे राज्यात तसेच राष्ट्रीय पातळीवर बाजारात जास्त मागणी आहे व शेतकऱ्यांना चांगला भाव देखील मिळतो.
English Summary: cultivation method of red okra crop and management process
Published on: 18 February 2022, 06:20 IST