Agripedia

Business Idea: भारतातील शेतकरी बांधव आता काळाच्या ओघात मोठा बदल करत आहेत. काळाच्या ओघात शेतीत केलेला बदल शेतकऱ्यांसाठी विशेष फायद्याचा ठरत आहे. शेतकरी बांधव सध्या पीकपद्धतीत मोठा बदल करत असल्याचे बघायला मिळत आहे. शेतकरी बांधव पीक पद्धतीत बदल करून त्याला आधुनिकतेची जोड देत शेतीतून लाख रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधत आहेत.

Updated on 29 June, 2022 10:50 PM IST

Business Idea: भारतातील शेतकरी बांधव आता काळाच्या ओघात मोठा बदल करत आहेत. काळाच्या ओघात शेतीत केलेला बदल शेतकऱ्यांसाठी विशेष फायद्याचा ठरत आहे. शेतकरी बांधव सध्या पीकपद्धतीत मोठा बदल करत असल्याचे बघायला मिळत आहे. शेतकरी बांधव पीक पद्धतीत बदल करून त्याला आधुनिकतेची जोड देत शेतीतून लाख रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधत आहेत.

आजकाल अनेक शेतकरी बांधव पारंपरिक शेती सोडून नगदी पिकाकडे वळत आहेत. अशा पिकांमध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न अनेक पटींनी वाढते. तुम्ही नगदी पीक घेण्याचाही विचार करू शकता. आज आपण औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतीबद्दल बोलत आहोत, ज्याची मुळं, देठ, पाने आणि बिया सर्वच बाजारात विकल्या जातात. आम्ही बोलत आहोत गुलखैरा शेतीबद्दल. या पिकातून शेतकरी समृद्ध होत आहेत. गुलखेरा वनस्पतीची खास गोष्ट म्हणजे कोणत्याही पिकाच्या दरम्यान लागवड करून तुम्ही नफा मिळवू शकता.गुलखेरा हे औषधांमध्ये सर्वाधिक वापरले जाते.

त्यामुळे गुलखेरा फुलांची लागवड करून शेतकरी सहजपणे बंपर कमवू शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुलखेरा 10,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकला जातो. एका बिघामध्ये ५ क्विंटल गुलखेरा निघतो.त्यामुळे एका बिघामध्ये 50,000-60,000 रुपये सहज मिळू शकतात. गुलखेरा पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा पेरणी केल्यानंतर दुसऱ्यांदा बाजारातून बियाणे विकत घ्यावे लागत नाही. या पिकांचे बियाणे पुन्हा पेरता येते. गुलखेराची पेरणी नोव्हेंबर महिन्यात केली जाते.

एप्रिल-मे महिन्यात पीक तयार होते. पीक तयार झाल्यानंतर एप्रिल-मे महिन्यात झाडांची पाने व देठ सुकून शेतातच पडतात. जे नंतर गोळा केले जाते. या फुलाचा उपयोग मर्दानी शक्तीच्या औषधांमध्येही होतो. याशिवाय या फुलापासून बनवलेले औषध ताप, खोकला आणि इतर अनेक आजारांवर खूप फायदेशीर ठरते.

सर्वाधिक लागवड कुठे आहे:- पाकिस्तान आणि अफगाणिस्तानसारख्या देशांमध्ये या वनस्पतीची सर्वाधिक लागवड केली जाते. हळूहळू भारतातही लोक या वनस्पतीची लागवड करत आहेत. उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांतील शेतकरी त्याची लागवड करत आहेत. कन्नौज, हरदोई, उन्नाव या जिल्ह्यांतील शेतकरी त्याची लागवड करून दरवर्षी मोठी कमाई करत आहेत. निश्चितच या औषधी वनस्पतीची शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे आणि शेतकरी बांधव अल्प कालावधीतच या शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न सहज प्राप्त करू शकणार आहेत.

English Summary: Cultivate this crop which is being sold at the rate of Rs. 10,000 per quintal, earning lakhs soon
Published on: 29 June 2022, 10:50 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)