देशात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची मागणी बघायला मिळते. यामुळे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात भाजीपाला वर्गीय पिकांची शेती करत असतात. आज आपण अशाच एका भाजीपाला वर्गीय पिकाच्या शेती विषयी जाणून घेणार आहोत. मित्रांनो आपण भेंडीच्या शेती विषयी आज थोडीशी माहिती घेणार आहोत.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, भेंडीची भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. असे सांगितले जाते की, भेंडीचे सेवन केल्यामुळे कर्करोगासारखे महाभयंकर आजार दूर राहतात. याशिवाय हृदयाशी संबंधित आजार दूर करतात. मधुमेहाच्या रुग्णांनीही भेंडी खावी असा सल्ला दिला जातो. याशिवाय अशक्तपणाच्या आजारात भेंडी खूप फायदेशीर आहे.
भेंडीची शेती यशस्वी करण्यासाठी पूर्वमशागत आवश्यक असते. या पिकाची पेरणी करण्यापूर्वी हे जाणून घेतले पाहिजे की, भेंडी योग्य पद्धतीने पेरली तरच यापासून अधिक उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते.
ओळ ते ओळ अंतर किमान 40 ते 45 सेमी असावे. बियाणे 3 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोलवर पेरू नये. संपूर्ण फील्ड योग्य आकाराच्या पट्ट्यांमध्ये विभागली पाहिजे. त्यामुळे पाणी देणे सोयीचे होते. एका हेक्टरमध्ये सुमारे 15 ते 20 टन शेणखताचा वापर करावा. पिकाची वेळोवेळी खुरपणीही करावी. जेणेकरून जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल.
भेंडीची चांगल्या पद्धतीने लागवड केल्यास एक एकरातून 5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. यामध्ये खर्च काढला तर किमान साडेतीन लाख रुपयांची बचत होते. भिंडीला प्रत्येक बाजारपेठेत मागणी असून हंगामात त्याचे दरही चांगले असतात. यामुळे निश्चितच भेंडीची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
Published on: 05 April 2022, 12:17 IST