Agripedia

भारतातील बरेच शेतकरी मका पिकाचे उत्पन्न घेत असतात.

Updated on 18 April, 2022 11:35 PM IST

भारतातील बरेच शेतकरी मका पिकाचे उत्पन्न घेत असतात. परंतु या पिकाचा जर अभ्यास केला तर अशी दिसून येते की चवीने गोड असलेली मक्का ला बाजारात जास्त भाव आहे असे दिसुन येते. त्यामूळे आज आपण जाणून घेऊया या बद्दल सविस्तर माहिती. 

गोड मक्याची जात-

a) गोल्डन स्वीट काँर्न (Golden Sweet Corn)

b) माधुरी (हिरव्या कणसासाठी)

मका लागवड व खते,काढणी माहिती –

1) मक्याच्या लागवडीच्या वेळी लागवड सरी वरंबा पद्धतीने करून दोन ओळीतील अंतर 75 से.मी. व दोन रोपातील अंतर 30 से.मी. राहील या पद्धतीने बियाणे एका जागेवर एकच या पद्धतीने टोपावे.

2) बियाणे टोपण्यापुर्वी त्यास 3 ग्रॅम थायरम प्रती किलो बियाणे किंवा 2 ग्रॅम बावीस्टीन प्रती किलो बियाणे याप्रमाणे बिजप्रक्रीया करावी. 

त्यानंतर पेरणीपुर्वी अर्धा ते एक तास 250 ग्रॅम अझोटोबॅक्टर + 250 ग्रॅम पी.एस.बी. प्रती 10 किलो बियाणे याप्रमाणात बियाणांना चोळावे (जीवाणूसंवर्धन)

3) पेरणीपूर्वी सरी पाडण्यापुर्वी एकरी 3 ते 3.5 टन शेणखत जमीनीमध्ये शेवटच्या कुळवाच्या पाळी वेळी द्यावे. पेरणीवेळी जमीनीतुन 5 सेमी खोलीवर व बियाणापासुन 5 सेमी बाजुला 50 किलो युरीया, 150 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 40 किलो म्युरेट आँफ पोटँश, 10 किलो फेरस सल्फेट, 10 किलो झिंक सल्फेट व 2 किलो बोरॅक्स द्यावे. पेरणीनंतर एक महीन्याने 50 किलो युरीया खत द्यावे.

4) पेरणीनंतर 25 ते 30 दिवसाने एक खुरपणी करून पिक तणमुक्त ठेवावे.

5) मक्याला पेरणीनंतर 50 ते 55 दिवसांनी कणीस लागते.

6) स्विटकॉर्न मक्याची तोडणी पहीली पेरणीनंतर 75 दिवसांनी व दुसरी पेरणीनंतर 90 दिवसांनी केली जाते.

7) ते परिपक्व झाल्यानंतर कणसावरील स्त्रीकेशर साधारण काळे होते व दाणे व दाणे पिवळे होतात.

मका , मधूमका (स्विटकॉर्न) व बेबीकॉर्न विविध जाती

मका सुधारित जाती –

1. लवकर पक्व होणाऱ्या जाती (80 ते 90 दिवस) कोरडवाहू तसेच बागायती क्षेत्रासाठी. संमिश्र जाती -अरुण, किरण, पारस, सूर्या, पुसा लवकर, महिकांचन, मांजरी. संकरित जाती – एफएच 3211, एफक्‍युएच 4567.

2. मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या जाती (90-100 दिवस) – कोरडवाहू, बागायती आणि थोड्याशा उशिरा पेरणीसाठी. संमिश्र जाती – नवज्योत, मांजरी. संकरित जाती- डीएमएच 107, केएच 9451, एमएचएच 69.

3. उशिरा पक्व होणाऱ्या जाती (100-110 दिवस)- वेळेवर पेरणी, निश्‍चित पाऊस किंवा बागायतीची सोय असलेल्या ठिकाणी. संमिश्र जाती – प्रभातस धवल, आफ्रिकन टॉल, शक्ती 1. संकरित जाती – डेक्कन 103, एनईसीएच 117, एचक्‍यूपीएम 1. स्विटकॉर्नचे उपलब्ध वाण मका पिकातील एस यु, एस ई, एस जे २, ए ई, डि यु, डब्ल्यु एक्स हे जीन्स साखर निर्मितीसाठी कार्य करतात. स्विटकॉर्न च्या दाण्यात कोणते जीन्स आहेत आणि कणासातील किती टक्के दाणे सदरिल जीन्स नुसार विकसित केलेले आहेत यानुसार स्विट कॉर्न च्या जाती विकसित केल्या गेल्यात.

१. स्टॅडर्ड स्विट – एस. यु , एस.यु.

२. अंशतः विकसित वाण अ. सिनर्जीस्टिक किंवा शुगरी सुपर स्विट (कणसातील कमीत कमी २५ टक्के दाणे विकसित – एस.यु, एस. ई. जीन्स) हनी कॉब्म, गोल्डन नेक्टर, शुगर लोफ, शुगर टाईम ब. शुगर एनहानस्ड किंवा ए एच (एस. यु, एस ई) प्लॅटिनम लेडी, सिल्व्हर प्रिन्स, कॅन्डी कॉर्न इएच, मेनलाईनर इएच, व्हाईट लाइचनिंग, अर्ली ग्रो इएच, गोल्डन स्विट इएच, सेनेकासेंट्री, टेंडरट्रिट इएच.

३. पुर्णतः विकसित वाण = (प्रत्येक दाण्यावर एस यु, एस इ) मिरॅकल, रिमार्केबल, डबल ट्रिट, डबल डिलिशियस, डेव्हीनिटी.

४. एस यु च्या ऐवजी बहुतांश एस एच २ हा जीन इलिनी चिफ एक्स्ट्रा स्विट, क्रिप्स अँड स्विट, कॅन्डीमॅन, अर्ली एक्स्ट्रा स्विट, नॉर्दन स्विट, कॅन्डी बार, बुर्पी शुगर स्विट, डिनर टाईम.

५. एस यु च्या ऐवजी ए ई, डि यु, डब्ल्यु एक्स हे जीन्स ए डी एक्स हायब्रिड आणि पेनफिक्स ए डी एक्स.

६. ट्रिपल स्विट = (एस यु आणि एस इ २ जीन्स प्रत्येक दाण्यावर) हनी सिल्केट बोन अँपेटाईट, आणि सेरेनडिपिटी स्विटकॉर्न लागवडीनंतर ज्यावेळेस रोप २० इंच वाढते त्यावेळेस एका ठिकाणी एकच रोप ठेवावे

English Summary: Cultivate these varieties of sweet corn and earn a lot of money
Published on: 18 April 2022, 11:33 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)