Agripedia

अनेकांना कमीत कमी गुंतवणूक करून जास्तीत जास्त नफा कमावणाऱ्या व्यवसायात पडण्याची इच्छा असते. असे भरपूर व्यवसाय असतात परंतु कोणता करावा हे लवकर सुचत नाही. आज आम्ही या लेखात लेमन ग्रास बद्दल हो त्याच्या शेती तन्त्र बद्दल माहिती सांगणार आहोत. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या मन की बात कार्यक्रमात लेमन ग्रास च्या शेतीचे कौतुक केले आहे.

Updated on 21 December, 2020 12:22 PM IST

अनेकांना कमीत कमी गुंतवणूक करून जास्तीत जास्त नफा कमावणाऱ्या व्यवसायात पडण्याची इच्छा असते. असे भरपूर व्यवसाय असतात परंतु कोणता करावा हे लवकर सुचत नाही. आज आम्ही या लेखात लेमन ग्रास बद्दल हो त्याच्या शेती तन्त्र बद्दल माहिती सांगणार आहोत. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या मन की बात कार्यक्रमात लेमन ग्रास च्या शेतीचे कौतुक केले आहे.

     लेमन ग्रास ही एक औषधी वनस्पती आहे. लेमन ग्रास चा वापर कॉस्मेटिक, डिटर्जंट, आणि औषधांमध्ये केला जातो. लेमन ग्रास ची शेती करून तुम्ही चांगल्या प्रकारे नफा कमवू शकता. लेमन ग्रास हे लागवडीनंतर चार महिन्यांमध्ये तयार होते. त्यापासून बनवलेल्या तेलाला बाजारात चांगला भाव मिळतो. बाजारात यायला चांगल्या प्रकारे मागणी असते. विशेष म्हणजे लेमनग्रास ची शेती करताना कुठल्याही प्रकारच्या खताची ची गरज असत नाही. त्यामुळे लेमन क्लासची शेती ही खूप फायद्याचे असते. याचे वैशिष्ट्य म्हणजे लेमन ग्रास येतात पेरले की ते पाच ते सहा वर्षापर्यंत चालते.

लेमन ग्रास पेरण्याचा कालावधी

लेमन ग्रास भरण्याचा योग्य काळा फेब्रुवारी ते जुलै दरम्यान असतो. एकदा लेमन ग्रास पेरल्यानंतर कमीत कमी सहा ते सात वेळा यांची कापणी केली जाते. यातून तेल काढले जाते. एका एकरातून निघणाऱ्या तेलाचा विचार केला तर तीन ते पाच लिटर तेल एका एकरातून निघते. ह्या एका लिटर तेला  ची किंमत हजार ते दीड हजार रुपये आहे. लागवडीनंतर कमीतकमी तीन ते चार महिन्यांनी पहिली कापणी केली जाते. लेमन ग्रास तयार झाले की नाही हे ओळखण्यासाठी त्याचा गंध घ्यावा लागतो. जर गंध हा लिंबा सारखा आला तर लेमन ग्रास तयार झाले आहे असे समजले जाते. जमिनीपासून पाच ते आठ इंचाचा वर याची कापणी करतात. प्रत्येक कापणी मध्ये प्रति कट्टा दीड लिटर ते दोन लिटर तेल निघते.

एका हेक्टर मध्ये लेमन ग्रास ची शेती करण्यासाठी तीस ते चाळीस हजार रुपये लागतात. लेमन ग्रास लावल्यानंतर एका वर्षात तीन ते चार कापण्या होतात त्यामुळे लेमन ग्रास या शेतीतून एका वर्षात तब्बल 1 लाख ते दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. धन्यवाद नात्याचा विचार केला तर सत्तर हजार ते 1 लाखापर्यंतच्या नफा होऊ शकतो.

English Summary: Cultivate Lemon Grass and Make Lots of Profits
Published on: 21 December 2020, 12:21 IST