यावर्षी सोयाबीनला चांगला बाजार भाव मिळाल्या कारणाने बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीला प्राधान्य दिले आहे. उत्पन्नातील जोखीम कमी करण्यासाठी अनेक शेतकरी सोयाबीनचे पिकामध्ये आंतरपीक घेतात.
या घेतल्या जाणाऱ्या अंतर पिकांमध्ये सोयाबीन सोबत तुरीची लागवड केली जाते किंवा सोयाबीन बरोबर दूसरे पिकास पसंती दिली जाते.
परंतु यामध्ये ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची मुबलक सोय आहे असे शेतकरी सोयाबीन पिकामध्ये आंतरपीक म्हणून एरंड पिकाची लागवड करू शकतात. एरंड पिकाची लागवड दर सोयाबीन मध्ये आंतरपीक म्हणून केली तर शेतकऱ्यांना निश्चितच आर्थिक फायदा जास्त मिळेल. बर्याचदा सोयाबीन पिकाला कीड आणि रोगांमुळे नुकसान पोहोचते व उत्पादनात घट येते अशावेळी सोयाबीन पिकात आंतरपीक म्हणून एरंडाचे लागवड केली तर उत्पन्नाचा चांगला पर्याय प्राप्त होऊ शकतो.
सोयाबीनची लागवड प्रत्येकी चार फुटांवर होते. जुलै महिन्याच्या दरम्यान मधल्या चार फुटी पट्ट्यात प्रत्येकी एक ओळ या पद्धतीने एरंडी लावावे. सोयाबीन काढणी झाल्यानंतर मग पुढे एरंडीचे झाड उंच वाढत राहते. सोयाबीन साठी त्यानंतर मुबलक प्रमाणात मोकळी आणि हवेशीर जागा मिळते व मशागतीचे कामे करणे देखील सोपे होते. कंपनीमार्फत घेतल्या जाणाऱ्या एरंडी ला प्रति क्विंटल साडे आठ हजार रुपये तर यंदा नऊ हजार रुपये दर मिळाला.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये एरंडी विकल्यास चार हजार ते पाच हजार रुपये दर मिळतो.एरंडी पिकास खर्चदेखील खूप कमी प्रमाणात लागतो. कमी खर्चा मध्ये आपण अधिक उत्पन्न मिळवूशकतो. याद्वारे एकरी सर्वसाधारणपणे एक लाख रुपये उत्पन्न उत्पन्न मिळू शकते.
Published on: 04 January 2022, 08:56 IST