Agripedia

ग्रामीण भागात राहून जर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर काय हरकत नाही. शेतीला जोडधंधा म्हणून तुम्ही व्यवसाय करू शकता. आधुनिक युगात तुम्ही पारंपरिक शेती व्यतिरिक्त आरोग्याच्यादृष्टीने सुद्धा शेती करू शकता. बाजारपेठेत जास्तीत जास्त आता आरोग्यासाठी जे चांगले पदार्थ आहेत त्याला नागरिकांची मागणी आहे. तुम्ही या शेतीमधून महिन्याला लाखो रुपये कमवू शकता.

Updated on 27 October, 2021 1:35 PM IST

ग्रामीण भागात राहून जर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर  काय  हरकत  नाही. शेतीला  जोडधंधा म्हणून तुम्ही व्यवसाय करू शकता. आधुनिक युगात तुम्ही पारंपरिक शेती व्यतिरिक्त आरोग्याच्यादृष्टीने सुद्धा शेती करू शकता. बाजारपेठेत जास्तीत जास्त आता आरोग्यासाठी जे चांगले पदार्थ  आहेत  त्याला  नागरिकांची  मागणी आहे. तुम्ही  या शेतीमधून महिन्याला लाखो रुपये कमवू शकता.

चांगला फायदा मिळू शकतो:

तुम्हाला तमालपत्र तर माहीतच असेल जे की आहारामध्ये तमालपत्र वापरले जाते. तुम्ही जर तमालपत्रची शेती  करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला  हे खुप  फायदेशीर ठरू शकते. इंग्रजी मध्ये बे लिफ असे तमालपत्रला म्हणले जाते.पदार्थांची चव वाढवण्यासाठी तमालपत्र चा वापर केला जातो. तमालपत्रची निर्मिती अनेक वर्षांपासून केली जात आहे. भारत, अमेरिका, इटली, फ्रान्स, रशिया, उत्तर अमेरिका तसेच बेल्जियम या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात तमालपत्र चे उत्पादन केले जात आहे.

तमालपत्राची शेती कशी सुरु कराल?

तमालपत्र ची शेती करण्याच्या सुरुवातीस तुम्हाला थोडी फार मेहनत घ्यावी लागेल पण जसे जसे तमालपत्र चे झाड वाढत जाईल तसे तसे तुमच्या उत्पनामध्ये वाढ होत जाईल. तमालपत्र ची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाकडून ३० टक्के अनुदान दिले जाते.

किती उत्पन्न मिळणार?

तमालपत्र शेती मधून तुम्ही चांगल्या प्रकारे नफा काढू शकता. या शेतीच्या नफ्याबद्धल बोलायचे झाले तर जर एक तमालपत्र चे झाड असेल तर त्या एका झाडातून तुम्ही प्रति वर्ष पाच हजार रुपये कमवू शकता. जर तुमच्याकडे २५ तमालपत्र ची झाडे असतील तर त्यामधून वर्षाला तुम्ही ७५ हजार ते १ लाख २५ हजार रुपये वार्षिक उत्पन्न काढू शकता.

तमालपत्र ची शेती करण्यास तुम्हाला सुरुवातीला थोडे कष्ट करावे लागेल मात्र नंतर एकदा की झाड वाढायला सुरू झाले की उत्पन्न वाढायला सुरू होईल. तुम्ही शेतामध्ये जेवढे जास्त झाड लावाल तेवढे जास्त उत्पन्न तुम्हाला भेटेल.

English Summary: Cultivate bay leaves and become wealthy
Published on: 27 October 2021, 01:35 IST