गव्हाला मागील वर्षी मिळालेले चांगले भाव व यावर्षी मुबलक प्रमाणात झालेला पाऊस यामुळे गहू पिकाखालील क्षेत्रात वाढ होणे अपेक्षित आहे, परंतू महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती, हलक्या जमिनीत लागवड, उत्पादनक्षम जातींची मर्यादित उपलब्धता, हवामानातील प्रतिकूलता, संवेदनशील अवस्थेत पाण्याची अनुलब्धता, खतांचा असंतुलित वापर यामुळे सरासरी प्रतिहेक्टरी गव्हाची उत्पादकता भारताच्या तुलनेत खूप कमी राहते. त्यामुळे आपल्याला योग्य नियोजन करणे आवश्यक आहे
जेणकरून आपले उत्पादन वाढेल,गहू लागवडीत पुढील बाबींकडे योग्य लक्ष दिल्यास उत्पादकता वाढवणे शक्य आहे.If proper attention is given to the following aspects in wheat cultivation, it is possible to increase the productivity.
तुर पिकात कळ्या व फुले दिसू लागताच पहिल्या फवारणीसाठी करा याच औषधाचा वापर
जमीन निवड - मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा असणारी जमीन गहू पिकास मानवते. बागायती गव्हासाठी भारी व खोल जमीन निवडावी, भारी जमीन असेल तर जास्त उत्पादन मिळते बियाणे प्रमाण - गहू पिकाचे हेक्टरी 20 ते 22 लाख इतकी रोपांची संख्या शेतात असणे आवश्यक असते. रोपांचे हे प्रमाण राखण्यासाठी बागायती वेळेवर
पेरणी ः 100 ते 125 किलो, तर उशिरा पेरणी - 125 ते 150 किलो बियाणे घ्यावेजाती : HD २३८०, MACS-२४८६, Purna, HD २५०१, Lok -1, HD-२१८९तसेच गहू संशोधन केंद्र कर्नाल येथून विकसित झालेले वाण आपण निवड करू शकतो, तसेच खासगी कंपन्यानी विकसित केलेले वाण सुध्दा चांगले उत्पादन देणारे आहेत ते सुध्दा आपण घेऊ शकता परंतू मागील वर्षी च्या अनुभवानुसार घेणे.पेरणी - जमिनीत पुरेशी ओल असताना पेरणी करावी.
पेरणी शक्यतो दक्षिणोत्तर करावी. बागायत पिकाची वेळेवर पेरणी दोन ओळींत 22.5 सें.मी. व उशिरा पेरणी 18 सें.मी. अंतर ठेवून करावी. - गव्हाची पेरणी उथळ म्हणजे 5 ते 6 सें.मी. खोलीवर करावी. त्यामुळे उगवण चांगली होते.जिरायती गव्हाची पेरणी दोन ओळींत 20 सें.मी. अंतर ठेवून करावी. खत व्यवस्थापन - बागायती गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी हेक्टरी 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद व 40 किलो पालाश द्यावे. पेरणीच्या वेळी नत्राची अर्धी मात्रा आणि स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा
द्यावी. उरलेली नत्राची अर्धी मात्रा पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी झाल्यानंतर मुकुटमुळे फुटण्याच्या अवस्थेत द्यावी.बागायती गव्हाच्या उशिरा पेरणीसाठी हेक्टरी ८०-१०० किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 40 किलो पालाश द्यावे. पेरणीच्या वेळी नत्राची अर्धी मात्रा आणि स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा द्यावी. उरलेली नत्राची अर्धी मात्रा पेरणीनंतर तीन आठवड्यांनी द्यावी.लागवडीच्या वेळी एकरी ४५-५० किलो युरिया सोबत ६५-७० किलो १०:२६:२६ किंवा ७०-७५ किलो
९:२४:२४ याप्रमाणे देऊ शकता. उरलेली नत्राची मात्रा २०-२५ दिवसांनी द्यावी.जिरायती गव्हासाठी हेक्टरी 40 किलो नत्र व 20 किलो स्फुरद पेरून द्यावे. याशिवाय 2 टक्के युरियाच्या किंवा DAP च्या द्रावणाची फवारणी दाणे भरण्याच्या अवस्थेत म्हणजे 65 ते 70 दिवसांनी करावी. या फवारणीमुळे दाण्याचा आकार वाढतो, वजन वाढते व दाण्यास चकाकी प्राप्त होते.पाणी व्यस्थापन : साधारणपणे दर 18 ते 21 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात,
मध्यम ते भारी जमिनीत पीक तयार होण्यासाठी 4 ते 5 पाण्याच्या पाळ्या देण्याची गरज असते. गहू पिकाच्या पाण्याच्या पाळीसाठी संवदेनशील अवस्था. पेरणीनंतर दिवस ः 1) मुकुटमुळे फुटण्याची अवस्था - 18 ते 21 2) कांडी धरण्याची अवस्था - 40 ते 45 3) फुलोरा आणि चीक भरण्याची अवस्था - 60 ते 65 4) दाणे भरण्याची अवस्था - 80 ते 85 कीड व रोग व्यवस्थापन: तुडतुडे, मावा, खोडकिडा तसेच तांबेरा, काजळी किंवा कणी आणि करापा
यांचा प्रादुर्भाव गहू पिकावर होत असतो त्यासाठी एकात्मिक किड व रोग व्यवस्थापनाचा अवलंब करावा.गहू पिकाचे उंदिरामुळे खूप नुकसान होते त्यासाठी वेळीच बंदोबस्त करावा .गहू पीक आहे अन्नद्रव्ये व पाणी याला सेन्सिटिव्ह असल्याने आपल्याला अन्नद्रव्ये व पाणी व्यवस्थापन योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे, जेव्हढे चांगले आपण व्यवस्थापन करू तेव्हढे उत्पादन जास्त मिळते.वरीप्रमाणे नियोजन केल्यास गहू पिकाचे चांगले उत्पादन मिळू शकते.
Dr Anant Ingle
Vidarbha Agriculture Development Foundation
Published on: 10 October 2022, 08:09 IST