Agripedia

शेतकरी मित्रांनो शेतीतून अधिकचे उत्पन्न प्राप्त करण्यासाठी, पीक हे रोटेशन पद्धतीने घेणे महत्त्वाचे ठरते. तसेच आपल्या शेतात वेगवेगळ्या पिकांची शेती करणे गरजेचे आहे. मिश्र शेती केल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होताना दिसत आहे. डिमांड मध्ये असलेल्या पिकांची लागवड केली तर आपणास त्यातून बक्कळ पैसा प्राप्त होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो काकडीचे पीक नेहमी डिमांडमध्ये बनलेले असते. काकडीची लागवड करून अनेक शेतकरी लाखो रुपयांची कमाई करताना आपणास दिसत असतील. आपल्या राज्यात देखील काकडीची लागवड ही लक्षणीय बघायला मिळते. काकडी हे एक हंगामी पीक आहे आणि हे पिक अगदी कमी कालावधीत तयार होणारे पीक आहे त्यामुळे या पिकाची लागवड शेतकऱ्यांसाठी वरदान सिद्ध होत आहे. त्यामुळे आज आपण काकडीच्या एका वाणाची माहिती जाणून घेणार आहोत.

Updated on 29 December, 2021 3:21 PM IST

शेतकरी मित्रांनो काकडीची लागवड तसे बघायला गेले तर उन्हाळ्यात अधिक प्रमाणात बघायला मिळते, मात्र पावसाळ्यात याची लागवड केली तर उत्पादन अधिक प्राप्त होते. काकडीचे पीक हे जवळपास 80 दिवसांनी काढणीसाठी तयार होते. म्हणून कमी दिवसात निघणारे हे पीक शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरते. काकडी लागवडीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काकडीची लागवड ही कुठल्याही जमिनीत सहजरीत्या केली जाऊ शकते आणि या पिकातून चांगले मोठे उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. काकडीची लागवड जरी कोणत्याही जमिनीत करता येणे शक्य असले तरी याची लागवड ही अशा जमिनीत केली गेली पाहिजे ज्या जमिनीचा पीएच हा 5.5 ते 7 या दरम्यान असतो. काकडीची लागवड ही नदी किनारे देखील केली जाऊ शकते तसेच डोंगराळ भागात देखील काकडीची लागवड सहजरीत्या केली जाऊ शकते.

नेदरलँडची काकडी ठरली या शेतकऱ्यासाठी फायदेशीर

उत्तर प्रदेश राज्यातील एका शेतकऱ्याने काकडी लागवड करून अवघ्या चार महिन्यात आठ लाख रुपयांची कमाई केली. उत्तर प्रदेशचे दुर्गा प्रसाद यांनी आपल्या शेतीत नेदरलँडच्या काकडीची लागवड केली होती. दुर्गा प्रसाद यांच्या मते नेदरलँड होऊन काकडीचे हे बियाणे मागवून शेती करणारे ते उत्तर प्रदेश राज्यातील एकमेव शेतकरी आहेत. नेदरलँडच्या काकडीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या काकडीला बिया नसतात त्यामुळे याची मागणी रेस्टॉरंटमध्ये हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळते म्हणून याची लागवड दुर्गाप्रसाद यांच्यासाठी देखील खूप फायद्याची ठरली. 

दुर्गा प्रसाद यांनी या वाणाची काकडी पॉलिहाऊसमध्ये लावली होती, त्यांना बियाण्यासाठी 72 हजार रुपये खर्च आला होता. आणि या नेदरलँडच्या काकडीची लागवड केल्यापासून चार महिन्यानंतर त्याचे उत्पादन मिळाले आणि त्यांनी त्यातून जवळपास आठ लाख रुपये कमविले. या काकडी ची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या काकडी ची किंमत ही इतर काकडी पेक्षा दुपटीने जास्त असते.

English Summary: cucumbers nederland variety is more profitable
Published on: 29 December 2021, 03:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)