Agripedia

सुरुवातीपासूनच आपल्यातील शेतकरी शेतीला तोट्याची शेती म्हणून ओळखत आहेत कारण पारंपरिक पद्धतीने केलेली शेती मधून जास्त उत्पादन मिळत नाही. तसेच नवनवीन यंत्रसामग्रीचा वापर होत नसल्यामुळे शेतकरी शेतीला घाट्या चा धंदा सुद्धा म्हणतो जर नवीन तंत्रज्ञान वापरून कमी खर्चात आणि कमी पैशात आपण काकडीचीलागवडकरू शकतो. काकडी उत्पादनातून कमी वेळेत व कमी खर्चात लाख रुपयांचे उत्पन्न हातात येऊ शकते. या लेखात आपण काकडीच्या नेदरलँड प्रजाती विषयी माहिती घेणार आहोत.

Updated on 24 September, 2021 2:35 PM IST

काकडीची नेदरलँड नावाचे प्रजाती

 नेदरलँड प्रजातीच्या काकडीला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. कारण या काकडीमध्ये बी अजिबातच नसतात त्यामुळे अनेक मोठ्या हॉटेलमध्ये या काकडीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नेदरलँड प्रजातीच्या काकडीचे किंमत ही सामान्य काकडीच्या पेक्षा दुप्पट असते. जर दुसऱ्या प्रकारची काकडी 30 रुपये किलो गेली असेल तर नेदरलँड जातीच्या काकडे ला साठ रुपये एवढा भाव बाजारातमिळतो.

 या काकडी ची लागवड कशी करावी?

 काकडी हे एक उन्हाळ्याच्या हंगामातील पीक आहे.या पिकाला काढणीपर्यंत 60 ते 80 दिवस एवढा कालावधी लागतो.तसेच पावसाळ्याच्या ऋतूमध्ये काकडीचे पीक चांगले येत असते.काकडीची लागवड ही साधारणपणे फेब्रुवारीची आठवड्यात करावी. काकडी लागवडीसाठी कोणत्याही प्रकारची जमीन चालते.परंतु वालुकामय, चिकन आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन राहिली तर काकडी हे पीक उत्तम येते.  मातीचा सामू हा 5.5 ते 6.7 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. उत्तर प्रदेश राज्यातील काही शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की,  उच्च उत्पादनासाठी आणि बरोबर पाण्यासाठी नेदर्लंड जातीची काकडीआपल्या रानात लावावी. 

या जातीच्या काकडी मधून चार महिन्याच्या काळात कमीत कमी आठ लाख रुपये एवढी उत्पन्न मिळू शकते नेदरलँड प्रजातीच्या काकडीला प्रचंड मागणी असल्यामुळे या काकडीच्या मार्केटिंग तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील करू शकता. अनेक मोठ्या कंपन्या कोशिंबीर बनवण्यासाठी या काकडीचा  उपयोग करतात.

English Summary: cucumber cultivation netherlands veriety is benificial for farmer
Published on: 24 September 2021, 02:35 IST