Agripedia

शेतकरी मित्रांनो शेती हा एक व्यवसाय आहे आणि शास्त्रीय पद्धत्तीने हा व्यवसाय करून आपण लाखों रुपये कमवू शकता. आज आपण शास्त्रीय पद्धत्तीने काकडी कशी लागवड करायची हे जाणुन घेणार आहोत. भारतात नेहमीच भाजीपाला पिकाला मार्केट असते काकडी देखील अशा पिकापैकी एक आहे. काकडी हि कच्ची सलाद म्हणुन तसेच अनेक भाजीमध्ये वापरली जाते. तसेच काकडीचा रायता देखील बनवला जातो आणि खुप लोक ह्याचा अस्वाद घेतात.

Updated on 29 October, 2021 8:56 PM IST

शेतकरी मित्रांनो शेती हा एक व्यवसाय आहे आणि शास्त्रीय पद्धत्तीने हा व्यवसाय करून आपण लाखों रुपये कमवू शकता. आज आपण शास्त्रीय पद्धत्तीने काकडी कशी लागवड करायची हे जाणुन घेणार आहोत. भारतात नेहमीच भाजीपाला पिकाला मार्केट असते काकडी देखील अशा पिकापैकी एक आहे. काकडी हि कच्ची सलाद म्हणुन तसेच अनेक भाजीमध्ये वापरली जाते. तसेच काकडीचा रायता देखील बनवला जातो आणि खुप लोक ह्याचा अस्वाद घेतात.

त्यामुळे काकडी हि संपूर्ण वर्षभर मोठ्या प्रमाणात विकली जाते त्यामुळे ह्याची लागवड हि शेतकऱ्यांसाठी नेहमीच फायदेशीर ठरते. चला तर मग कृषी जागरणच्या वाचक मित्रांनो जाणुन घेऊया शास्त्रीय पद्धत्तीने काकडी लागवड कशी करायची ह्याविषयी.

 काकडी लागवड आहे फायद्याची (Cucumber cultivation is beneficial )

शेतकरी मित्रांनो काकडी हे एक उन्हाळी हंगामातील पिक आहे. असे असले तरी ह्या पिकाला बारमाही मार्केट असते. ह्याचा आहारात संपूर्ण वर्षभर वापर केला जातो. काकडीला मोठमोठल्या हॉटेल्स, रेस्टॉरंट मध्ये मागणी हि मोठ्या प्रमाणात असते. शिवाय काकडी हि आरोग्यासाठी फायदेशीर असल्यामुळे ह्याची बाजारात नेहमीच डिमांड असते. त्यामुळे काकडी लागवड हि शेतकऱ्यांसाठी एक फायद्याचा सौदा सिद्ध होत आहे. काकडी लागवडीतून महिन्याकाठी शेतकरी बांधव 4 ते 5 लाख रुपय कमवू शकता.

काकडी लागवडीसाठी आवश्यक जमीन (Land required for cucumber cultivation)

जर आपण काकडीच्या लागवडीचा विचार केला तर, ह्याची लागवड हि अशा जमिनीत करावी ज्या जमिनीचा मातीचा पीएच म्हणजेच सामू हा 5.5 ते 6.8 पर्यंत असायला पाहिजे त्यामुळे काकडी लागवड हि यशस्वी उत्पादन देते. तसे बघायला गेले तर काकडी हि सर्व प्रकारच्या जमिनीत लावता येते पण त्या जमिनीचा पीएच हा 5.5 ते 6.8 दरम्यान असावा.

 काकडी लागवडीसाठी योग्य हवामान (The right climate for cucumber cultivation)

काकडी लागवड हि अशा प्रदेशात केली जाते जिथे तापमान 24-25 अंशांच्या दरम्यान असते. अशा प्रदेशात काकडी लागवड केल्यास उत्पादन चांगले मिळते. काकडी लागवड हि भारतात जवळपास सर्वत्र केली जाऊ शकते.

पूर्वमशागत (Pre-cultivation for Cucumber Farming)

काकडीच्या लागवडीसाठी पूर्वमशागत चांगली करणे इतर पिकांप्रमाणे आवश्यक आहे. काकडी पिकाला चांगली तयार आणि स्वच्छ, तन, काडी कचरा पाला पाचोळा नसलेली जमीन आवश्यक असते. लागवडीपूर्वी 3-4 नांगरणी करून जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच जमिनीत पोषक घटकांची पूर्तता करण्यासाठी शेतात चांगल्या क्वालिटीचे कंपोस्ट अथवा शेणखत टाकावे.

पेरणी कशी करतात (How to sow)

काकडीच्या बियाण्याची पेरणी हि 'डिबलर' नावाच्या छोट्या यंत्राच्या साहाय्याने केली जाते.  हि एक खुंटी असलेली लाकडी किंवा लोखंडी चौकट असते. फ्रेम मातीत दाबली जाते आणि उचलली जाते आणि नंतर हाताने प्रत्येक छिद्रात एक किंवा दोन बिया टाकल्या जातात.  ओळीमधील अंतर 120 - 150 सेमी दरम्यान असावे. 30 ते 45 सें.मी.च्या अंतरावर बिया पेरल्या पाहिजेत. बियाने हे 2.0 ते 4.0 सें.मी.  खोल टोपल्या गेल्या पाहिजेत.

 काकडी पिकासाठी खत व्यवस्थापन (Fertilizer management for cucumber crop)

 

पूर्वमशागत आपटताच चांगले कुजलेले शेणखत टाकावे. पेरणी प्रक्रिया पूर्ण झाली की मग पोटॅश व स्फुरदची पूर्ण मात्रा आणि नायट्रोजनचा एक तृतीयांश डोस काकडी पिकाला द्यावा. उरलेल्या नायट्रोजनचे दोन समान भाग करावे. पहिली मात्रा पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी आणि दुसरी मात्रा पेरणीनंतर 40 ते 50 दिवसांनी द्यावी.

English Summary: cucumber cultivation method and management technology
Published on: 29 October 2021, 08:56 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)