Agripedia

काकडीची लागवड ही शेतकऱ्यांसाठी फायदेची ठरू शकते जर त्यांनी ही लागवड ग्रीनहाऊस किंवा पॉलीहाउस मध्ये केली तर. ग्रीन हाऊस किंवा पॉलीहाउस मध्ये काकडीची लागवड खुप सोप्या पद्धतीने करता येते.काकडीचा उपयोग सलाद, लोणचे,रायता इत्यादी मध्ये केला जातो. काकडी हे एक थंड फळ आहे त्यामुळे ह्याचे सेवन उन्हाळ्यात करणे खुप फायदेशीर असते तसेच कावीळ, गॅस, इत्यादी मध्ये काकडी खाण्याची शिफारस केली जाते. काकडीच्या बिया ह्या आयुर्वेदिक औषधांसाठी वापरल्या जातात आणि बियांपासून मिळणारे तेल शरीर आणि मेंदूच्या आरोग्यासाठी गुणकारी सिद्ध होते.

Updated on 25 September, 2021 5:01 PM IST

काकडी एकवर्षीय पिक आहे. ह्याची पाने साधी, पिनेट आणि पेटीओलेट असतात.  मुळात काकडी ही एकरंगी असते ज्यात नर आणि मादी फुले एकाच वनस्पतीवर वेगवेगळ्या ठिकाणी आढळतात. नर फुले गुच्छांमध्ये आणि फुलांच्या देठावर लवकर तयार होतात, आणि मादी फुले उशिरा आणि लांब फुलांच्या देठावर तयार होतात.

 काकडी पिकासाठी लागणारे हवामान

काकडी हे उन्हाळ्यात वाढणार एकवर्षीय पीक आहे. त्यामुळे काकडीच्या वाढीसाठी 27 ते 35 अंश सेंटीग्रेड तापमान अनुकूल असते. काकडी पिकाला थंडी आणि दंव किंवा दड मानवत नाही आणि उच्च तापमान आणि आर्द्रतेमुळे, काकडी पिकावर पावडरी बुरशी रोग जास्त आक्रमन करतो आणि पॉली हाऊसमध्ये काकडी लागवडीसाठी आर्द्रता 65 ते 70 दरम्यान असली तर पिकाला ते मानवते.

कोणती वाण निवडणार?

शेतकऱ्यांना जर पॉली हाऊसमध्ये काकडी लागवड करायची असेल तर अधिक उत्पादन देणारी संकरित वाण निवडावी, जेणेकरून पॉली हाऊसमध्ये काकडीच्या पिकातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवता येईल.

तर चला जाणुन घेऊया पॉली हाऊससाठी प्रसिद्ध असलेल्या काही लोकप्रिय जाती:-  चायना, पॉइंटसेट, लौग ग्रीन, सुपर ग्रीन, स्ट्रेट 8, बालम काकडी, पूना काकडी, पुसा संयोग (संकर)) आणि पार्थेनोकार्पिक जाती -किआन, इसाटिस इ.

लागवडीचा कालावधी कोणता?

तस बघायला गेलं तर, पॉली हाऊसमध्ये काकडीची लागवड साधारणपणे वर्षभर केली जाते, परंतु मुख्य पेरणीची वेळ ही खालीलप्रमाणे आहे,

उन्हाळा हंगाम :- उन्हाळी काकडीच्या पेरणीची वेळ फेब्रुवारी ते मार्च दरम्यान योग्य मानली जाते, आणि ह्या कालावधीत लागवड केली तर उत्पादन चांगले राहते आणि मागणी पण चांगली असते.

पावसाळी हंगाम: जर पावसाळ्यात काकडीची लागवड करायची असेल तर मे ते जून हा कालावधी मैदानी भागासाठी योग्य मानला जातो आणि मार्च ते मे हा कालावधी डोंगराळ भागांसाठी योग्य आहे.

English Summary: cucumber cultivation in greenhouse techniqe
Published on: 25 September 2021, 05:01 IST