Agripedia

खरीप हंगामात वातावरण पोषक असते, त्यामुळे पिकांमध्ये तणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवतो. अशावेळी वेळीच तणनियंत्रण करणे गरजेचे असते. तर कापूस आणि सोयाबीन पिकांमधील तणनियंत्रण कसे करावे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Updated on 16 August, 2022 6:09 PM IST

खरीप हंगामात वातावरण पोषक असते, त्यामुळे पिकांमध्ये तणाचा प्रादुर्भाव (Weed infestation) मोठ्या प्रमाणात जाणवतो. अशावेळी वेळीच तणनियंत्रण करणे गरजेचे असते. तर कापूस आणि सोयाबीन (Cotton and soybeans) पिकांमधील तणनियंत्रण कसे करावे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

शेतातील (agriculture) पाणी पाट, बांध, कंपोस्ट खड्डे या जवळ तणे उगवू देऊ नयेत. उगवल्यास फुलोऱ्यावर येण्यापूर्वी उपटून टाकावीत. त्यामुळे तणांचा प्रसार रोखला जातो. यांत्रिक शक्तीच्या वापरातून तणे शेतातून काढू शकता. उदा. खुरपणी, कोळपणी, खांदणी, तण उपटणे, छाटणे किंवा जाळणे इ.

Electric Scooters: Hero एलेक्ट्रिक स्कूटर फक्त 10 हजार रुपयात घरी घेऊन या; वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

कापूस पिकातील तणानियंत्रण

प्रमुख तणे: सावा घास, भगर, कुंद्रा, माका, केना, धोत्रा, हराळी, गोखरू, तांदूळकुंद्रा, आघाडा, चिलघोळ, लोणी गवत इ.

क्विझालोफॉप इथाईल (५ % ई.सी.) १००० मि.लि. प्रति ५०० लिटर पाणी पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी द्या.

पॅराक्वाट डायक्लोराइड (२४ % एस.एल.) १२५० ते २००० मि.लि. प्रति ५०० लिटर पाणी किंवा ५०० ते ८०० मि.लि. प्रति एकर. हे बिननिवडक व स्पर्शजन्य तणनाशक तणे उगवल्यानंतर दोन ओळींमध्ये तणे २ ते ३ पानांच्या अवस्थेत वापरा.

फिनोक्साप्रॉप पी इथाईल (९.३ % ईसी) ७५० मि.लि. प्रति ३७५ ते ५०० लिटर पाणी द्या.

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारने दिली 'ही' मोठी सवलत; जाणून घ्या

२) सोयाबीन पिकातील तण नियंत्रण

प्रमुख तणे: लव्हाळा, केना, क्रब ग्रास, राळा, चिमणचारा, वाघनखी इ.

बेंटॅझोन (४८० ग्रॅम / लि.) २००० मि.लि. प्रति ५०० लिटर पाणी किंवा १०० मि.लि. प्रति एकर - तणे २ ते ३ पानांवर असताना फवारणी करा.

क्लोरीम्यूरॉन इथाईल (२५ % डब्ल्यू.पी.) ३६ ग्रॅम प्रति ३०० लिटर पाणी अधिक सर्फेक्टंट किंवा १४ ग्रॅम प्रति एकर अधिक सर्फेक्टंट - पेरणीनंतर ३ ते १५ दिवसांनी फवारणी (Weed Control) करा.

फिनोक्साप्रॉप पी इथाईल (९.३ % ई.सी.) १११ मि.लि. प्रति २५० ते ३०० लिटर पाणी किंवा ४४४ मि.लि. प्रति एकर - पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी फवारणी करा.

इमॅजीथाइपर (१० % एस.एल.) १ लिटर प्रति ५०० ते ६०० लिटर पाणी किंवा ४०० मि.लि. प्रति एकर - तणे २ ते ३ पानांच्या अवस्थेत असताना फवारणी करा.

महत्वाच्या बातम्या 
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! सोयाबीन विकला जातोय 'या' दरात; जाणून घ्या आजचे बाजारभाव
'या' योजनेत फक्त 100 रुपयांची गुंतवणूक करा आणि मिळवा 75 हजार रुपयांचा लाभ; जाणून घ्या
Ration Card: आता 'या' योजनेअंतर्गत रेशन कार्ड सहज होणार उपलब्ध; जाणून घ्या प्रक्रिया

English Summary: Crop Management Timely control weeds cotton soybean crops
Published on: 16 August 2022, 05:56 IST