Agripedia

उन्हाळ्यामध्ये बऱ्याच प्रकारची पिके घेतली जातात.त्यामध्ये बऱ्याच भागात सूर्यफूल, बाजरी आणि भुईमूग ही पिके घेतली जातात. या तीनही पिकांचे योग्य व्यवस्थापन केलेतर चांगले उत्पादन हाती येते.या लेखात आपणवरील तीनही पिकांचे उन्हाळ्यात करावयाचे व्यवस्थापनाबद्दल माहिती घेणार आहोत.

Updated on 09 December, 2021 5:28 PM IST

उन्हाळ्यामध्ये बऱ्याच प्रकारची पिके घेतली जातात.त्यामध्ये बऱ्याच भागात सूर्यफूल, बाजरी आणि भुईमूग ही पिके घेतली जातात. या तीनही पिकांचे योग्य व्यवस्थापन केलेतर चांगले उत्पादन हाती येते.या लेखात आपणवरील तीनही पिकांचे उन्हाळ्यात करावयाचे व्यवस्थापनाबद्दल माहिती घेणार आहोत.

सूर्यफूल

  • पूरक परागीकरण- सूर्यफूल पिक परपराग सिंचित आहे.पराग कण जड असल्यामुळे वाऱ्यापासून पर परागीकरण अतिशय कमी प्रमाणात होते मधमाशा द्वारे सर्वात जास्त परागीकरण होते. परंतु जर नैसर्गिक मधमाशा कमी आढळल्यास कृत्रिम रीत्या परागीकरण घडवून आणल्यास उत्पादनात 20 ते 40 टक्के वाढ होते.
  • मधमाशा परागीकरण-मधमाशा मध गोळा करीत असताना त्यांचे पाय,अंगाला परागकण चिकटून एका फुलावरुन दुसऱ्या फुलावर टाकले जाते.त्यामुळेपरागी करण्यास मदत होऊनबीजधारणा प्रमाण वाढते. प्रति हेक्‍टरी किमान पाच मधमाश्यांच्या पेट्या पुरेशा ठरतात.
  • हस्त परागीकरण- ज्या ठिकाणी मधमाशांचे प्रमाण कमी असतेतसेच मधमाशा पाळणे शक्य नसते,अशा ठिकाणी हस्त परागीकरण करावे. हाताला तलम व मऊ कापड गुंडाळून फुलांवरून हलकासा हातफिरवावा. यामुळे एका फुला वरील परागकण दुसऱ्या फुलावर पडून परागीकरण होते.एक फुलोऱ्यात असताना सकाळी आठ ते अकरा या वेळेतएकाआड एक दिवशी हस्त परागीकरण करावा.

भुईमूग

 भुईमूग पेरणी वेळी व आर्या सुटताना प्रत्येकी 80 किलो जिप्सम हे सल्फर व कॅल्शियमची उपलब्धता कमी करण्यासाठीजमिनीतून द्यावे.जेणेकरून शेंगा लागण्याचे प्रमाण वाढते व एकूणच उत्पादन वाढते.भुईमूग पिकांमध्ये प्रामुख्याने लोह,जस्त आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येते.लोहाची कमतरता दिसून आल्यास फेरस सल्फेटची एक किलो प्रति एकरीया प्रमाणात फवारणी करावी. जस्ताची कमतरता दिसून आल्याचे झिंक सल्फेट एक किलो प्रति एकरीफवारणीद्वारे द्यावे. बोरान ची कमतरता असल्यास बोरॉन0.1 टक्के( एक ग्रॅम प्रति लिटर पाणी) द्रावणाची फवारणी करावी.

बाजरी

पीक फुलोऱ्यावर असताना हिरवट सोनेरी रंगाचा सोंड असलेला किडा फुलोर्यात आलेल्या कणसावर हमखास दिसून येतो.तोकणसा वरील  फुलोरा पूर्णपणे खाऊन टाकतो. त्यामुळे कणसात दाणे भरण्याची क्रिया थांबते व कणसात आजिबात दाणे भरत नाहीत. याची वाढ झपाट्याने होऊन दोन ते तीन दिवसात सर्व कणसावर पसरते.त्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट येते. एक फुलोऱ्यात असताना कणसावर या किडीचा प्रादुर्भाव दिसू लागताचक्लोरोपायरीफॉस(1.5डीपी) एकरी आठ किलो या प्रमाणात सकाळच्या वेळेस वारा शांत असताना धुरळणी करावी.

English Summary: crop management of millet,groundnut and sunflower in summer condition
Published on: 09 December 2021, 05:28 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)