चिखली- अतिवृष्टिमुळे नुकसान झालेल्या शेतकर्याच्या खात्यावर पिक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.मात्र अद्यापर्यत याद्या प्रसिद्ध झाल्या नसल्याने विविध अडचणी शेतकर्याना उदभवत असल्याने शेतकरी कंपनी प्रतिनिधींना संपर्क साधत आहेत.परंतु त्यांना माहितीच दिली जात असल्याने शेतकर्यासह स्वाभिमानी चे विनायक सरनाईक यांन विमा प्रतिनीधी यांना चांगलेच धारेवर धरत दि08डीसेंबर रोजी घेराव घालीत कृषी कार्यालयात,विमा प्रतिनीधी कार्यालयात पिक विमा मंजुर शेतकर्याच्या याद्या प्रसिद्ध करण्यात याव्यात,तालुका पिक विमा काढलेल्या आॅनलाइन/आॅफलाइन अर्ज सादर केलेल्या शेतकर्याच्या समस्या सोडविण्यात याव्यात अशी मागणी तालुका कृषी अधिकारी व जिल्हा विमा प्रतिनीधी यांच्याकडे केली आहे.
मुसळधार व सततधार पावसामुळे चिखली तालुक्यातील शेतकर्याचे सोयाबीन,उडीद,मुंग यासह आदि पिकांचे नुकसान झाले होते.तर शेतकर्याचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेला होता.या शेतकर्याना सरसगट मदत देण्यात यावी,मागील वर्षीचा रखडलेला व या वर्षीचा पिक विमा मंजुर करण्यात यावा यासह शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी चे राज्याचे नेते तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी चार दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते.
याची दखल राज्य शासनाने घेऊन तुपकरांच्या उपस्थीतीत मंत्रालयात बैठक बोलवली होती.त्यानंतरही शेतकर्याना पिक विमा योजनेतुन डावलण्याचा घाट कंपनीकडुन होत असल्याने नदिकाठच्या नुकसानग्रस्तांसह जिल्हा प्रतिनीधीस कृषी कार्यालयात डांबुन ठेवत आक्रमक पावित्रा घेतला होता.दरम्याण कृषी आयुक्तांनी तेव्हा दिलेल्या अश्वासना प्रमाणे विमा रक्कम जिल्ह्यासाठी मंजुर करण्यात आली तर यामध्ये चिखली तालुक्याचाही समावेश असुन शेतकर्याच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.तालुक्यातील शेतकर्यानी मदत मिळेल या अपेक्षेने ७२तासाच्या आत नूकसानीचा अर्ज आॅनलाइन+आॅफलाइन सादर केला आहे.परंतु तालुका स्तरावर याबाबत कसल्याही याद्या पिक विमा कंपनीकडुन उपलब्ध झाल्या नसल्याने शेतकरी कृषी विभाग व विमा कंपनीच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवतांना दिसत आहे.विमा मंजुर होऊनही याद्याच उपलब्ध नसल्याने यात रीलायन्स पिक विमा कंपनीची यामुळे मनमानी दिसुन येत आहे.एकाच दिवसी एकाच तारखेस एकाच गटातील अर्ज केलेल्यास मदत मिळाली परंतु धुर्याकाठच्याला मिळाली नाही,
काहिंना तोकडी मदत मिळणे तर कृषी विभागाने नेमलेल्या कंपनी प्रतिनीधीस सांगुनही काहिंचे रॅनडमली पंचनामे केले गेले नसल्याच्या गंभीर बाबीसह आदि समस्या घेऊन शेतकरी विमा प्रतिनीधी यांना विचारणा करीत आहेत.परंतु त्यांना ,कृषी किवा तहसिल कार्यालयात जाण्याचा सल्ला दिला जात यामुळे शेतकर्याची तारंबळ उडाली असुन याबाबत शेतकर्यानी स्वाभिमानी चे विनायक सरनाईक यांना याबाबत माहिती दिली असता सरनाईक यांनी चिखली तालुका कृषी विभागाचे कार्यालय गाठत विमा कंपनीच्या प्रतिनीधींना शेतकर्यान समोर बोलवुन घेत धारेवर धरत जाब विचारला असता तालुक्यातील विमा कार्यालयातच याद्या प्राप्त नसल्याने माहिती शेतकर्याना देऊ शकत नसल्याची बाब समोर आली असल्याने सरनाईक यांनी जिल्हा प्रतिनीधी यांच्याशी संपर्क करीत तालुक्यातील विमा मंजुर असलेल्या शेतकर्याची यादि कृषी कार्यालय,विमा कंपनी कार्यालयात प्रसिद्ध करण्यात याव्यात,शेतकर्याच्या समस्या लेखी स्वरुपात स्विकारण्यात याव्यात व त्या समस्या प्राधन्यक्रमे सोडवण्यात याव्यात,
तातडीने पिक विमा मंजुर शेतकर्याच्या याद्या प्रसिद्ध करण्यात याव्यात,अशी मागणी स्वाभिमानीचे सरनाईक यांनी केली आहे.यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्री येवले,कृषी सहाय्यक श्री विजय चिंचोले,रविद्र वानखेडे,श्री वाघ,श्री भुसारी रविराज टाले,राजु कुटे,परमेश्वर गुंजकर,गजानन कुटे, ज्ञानेश्वर गोजरे,राम ठेंग यांच्यासह शेतकरी व कंपनी प्रतिनीधी उपस्थीत होते.
प्रतिनिधी- गोपाल उगले
Published on: 09 December 2021, 09:07 IST