Agripedia

आपल्या निसर्गाने जमिनीमध्ये असंख्य सूक्ष्मजीव वास्तव्यास घातले. त्यामध्ये जिवाणू, विषाणू बुरशी आदींचा समावेश आहे.

Updated on 08 January, 2022 9:25 AM IST

आपल्या निसर्गाने जमिनीमध्ये असंख्य सूक्ष्मजीव वास्तव्यास घातले. त्यामध्ये जिवाणू, विषाणू बुरशी आदींचा समावेश आहे. जिवाणू जमिनीमध्ये अन्नद्रव्ये व अन्न घटक वितरणाचे व उपलब्ध करण्याचे कार्य करतात. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवायची असेल तर जमिनीतील फायदेशीर जिवाणूंची संख्या वाढविणे गरजेचे असते. फायदेशीर जिवाणूंमध्ये रायझोबियम, ऍझोटोबॅक्‍टर, निळे, हिरवे शेवाळे वातावरणातील निसर्गतः उपलब्ध असलेला नत्र स्थिर करतात. त्याच प्रमाणे स्फुरद विरघळविणारे जिवाणू जमिनीमध्ये नैसर्गिकता उपलब्ध असलेल्या घट्ट स्वरूपातील स्फुरदाचे विघटन करून द्राव्य स्वरूपातील स्फुरदात रूपांतर करतात. सध्याच्या काळात मायकोरायझा जिवाणूला बरेच महत्त्व आले आहे.

त्याच्या वापरामुळे पिकांना जास्तीत जास्त किंवा पुरेशा प्रमाणात स्फुरदाचा, तसेच पाण्याचा, अन्य सूक्ष्म अन्नघटकांचा पुरवठा होत असतो.

      जीवाणू संघ म्हणजे डोळ्यांना न दिसणाऱ्या सुक्ष्म व जिवंत सुक्ष्म जिवाणूंचे संघ होय. ते बियाण्यांना लावल्याने, मातीत वापरल्याने किंवा सेंद्रिय पदार्थात टाकल्यामुळे ठराविक ठिकाणी नत्र स्थिर करणाऱ्या, स्फुरद विरघळविणाऱ्या व सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणाऱ्या कार्यक्षम जीवाणूंच्या संख्येत खूप वाढ होते. आणि त्यामुळे उत्पादनात वाढ होऊन जमिनीचा पोत सुधारतो व काही प्रमाणात बुरशीरोधक द्रव्यांचा स्त्राव होत असल्याने रोगाचे पण नियंत्रण केले जाते. जैविक खतांच्या उपयुक्त क्रियेने जमिनीत असलेले जीवाणू पिकांना अन्नद्रवे पुरवण्याचे कार्य करतात

रायझोबीयम जैविक संवर्धक अॅझोटोबॅकटर जैविक संवर्धक

 स्फुरद विरघळविणारे जीवाणू यांना इंग्रजी मध्ये फॉस्परस सोलुबीलायझिंग बँक्टेरिया म्हणजेच पी.एस.बी असे संबोधले जाते. या जैविक संवर्धकाचा वापर सर्व पिकांकरता होतो.

 ट्रायकोडर्मा हि एक जैविक बुरशीनाशक बुरशी आहे. या जैविक संवर्धकाचा वापर सर्व पिकांकरता होतो.आपल्या उत्पादनातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे आपली जमीन.पुर्वी काळापासून शेतकरी जमीनीत विविध पीके घेत आला आहे. पूर्वीच्या काळात सेंद्रिय पदार्थ जमिनीत टाकण्याचे प्रमाण जास्त होते. सहाजिकच जमिनीचा पोत टिकण्यास आपोआप मदत होत असे. आता परीस्थिती उलट निर्माण झाली.अन्नधान्याची गरज जशी वाढू लागली, तसा जमिनीतून अधिकाधिक उत्पादन काढण्याकडे कल गेला.त्या मध्ये जिवाणू संवर्धनाचा अभाव दीसत आहे. परीणाम काय तर आपल्या शेतातील पिकांमधे मर चे व प्रमाण भरपूर वाढले ते म्हणजे जमिनीमधील उपयुक्त जीव कमी झाली.

आता वेळ आहे जिवाणूंची संवर्धन करणे म्हणजे जिवाणू चे अन्न तयार करून जिवाणुचे संगोपन करून शेती ला बळकट करण्यासाठी आवश्यक आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता रासायनिक, सेंद्रिय व जैविक खतांच्या वापरात समतोल राखून जमिनीचा कस कमी होऊ न देता उत्पादन वाढ करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी रासायनिक खताला पर्याय म्हणून जैविक खताचा किंवा जिवाणू संघाचा वापर करणे हे फायदेशीर ठरू शकते.

विचार बदला जिवन बदलेल

 

milindgode111@gmail.com

Agriculture development and technology group addmin

मिलिंद जि गोदे

युवा शेतकरी मित्र

English Summary: Crop conservation and microbs colony functions
Published on: 08 January 2022, 09:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)