Agripedia

गंगा नदीला लागून असलेल्या प्रदेशातील मैदानी भागातील शेतकरी आता गहू आणि भात कापणीच्या कालावधी दरम्यान बटाट्यांचे उत्पादन घेऊ शकतील. सेंट्रल बटाटा रिसर्च सेंटर अर्थात सीपीआरआय यांनी कुफरी सूर्या, कुफरी ख्याती आणि कुफरी सुख्याती या बटाट्याच्या तीन जाती विकसित केल्या आहेत.

Updated on 01 July, 2022 1:13 PM IST

गंगा नदीला लागून असलेल्या प्रदेशातील मैदानी भागातील शेतकरी आता गहू आणि भात कापणीच्या कालावधी दरम्यान बटाट्यांचे उत्पादन घेऊ शकतील. सेंट्रल बटाटा रिसर्च सेंटर अर्थात सीपीआरआय यांनी कुफरी सूर्या, कुफरी ख्याती आणि कुफरी सुख्याती या बटाट्याच्या तीन जाती विकसित केल्या आहेत.

या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे त्या 90 दिवसात काढणीला येऊ शकतात. मैदानी भागांमध्ये तापमान जास्त असल्याने या जाती अगदी कमी वेळेत काढणीस तयार होत आहेत.

 या वाणाची वैशिष्ट्ये

 या वानांमुळे शेतकऱ्यांना एकरी 40 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकेल. सध्या गहू आणि धान कापणीच्या दरम्यानच्या कालावधीत शेतकरी कोणते पीक घेत नाहीत.

नक्की वाचा:शेतकऱ्यांनी शेतीत या खतांचा वापर केला तरच शेतीची उत्पादकता वाढेल

साधारणपणे डोंगराळ भागात बटाट्याचे पीक 100 ते 120 दिवसांत तयार होते. सीपीआरआयच्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नाने आत्ता शेतकरी तीन जातीमधून कमी वेळात बटाट्याचे उत्पादन घेऊ शकणार आहेत.

बटाट्याच्या या जातींचे बियाणे वाढवून शेतकरी तुलनेने कमी कालावधीत पीक तयार करून नफा मिळवू शकतात.

याबाबतीत कुफरी पुखराज सीड इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ डॉ. विनय भारद्वाज म्हणाले की, या जातीला पूर्वी कुफरी पुखराज ने बटाट्याचे बियाणे वाढवून कमी कालावधीत तयार करण्याचे प्रयोग केले होते.

नक्की वाचा:Capsicum chilli:70 ते 80 दिवसांत शिमला मिरचीच्या 'या' जाती येथील बक्कळ उत्पादन आणि नफा, वाचा आणि घ्या माहिती

 यामध्ये या जातीचा बटाटा अगदी कमी वेळेत काढणीस तयार झाला होता परंतु त्याचा साठवण कालावधी कमी होता. कारण या बटाट्याची बाहेरील साल पातळ असल्यामुळे ही समस्या येत होती.

आता या नवीन जातींमध्ये ही समस्या नसून या जातीचा बटाटा अल्पावधीत तयार होत असून उत्पादन हे 40 क्विंटल प्रति हेक्‍टर पर्यंत मिळत आहे.

याबाबतीत सीपीआरआयचे संचालक एन के पांडे म्हणतात की, गंगा नदीला लागून असलेल्या मैदानी भागातील शेतकरी तिसरे पीक म्हणून गहू आणि धानाच्या दरम्यानच्या काळात बटाटे घेऊ शकतात.

त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार असून देशाची बटाट्याची गरज देखील पूर्ण होण्यास मदत होईल. भारताची 70 टक्के बटाट्याचे उत्पादन हे मैदानी भागात होते.

नक्की वाचा:10 हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकल्या जाणाऱ्या या पिकाची शेती करा, लवकरचं लाखों कमवणार

English Summary: cpri shimla developed new three veriety of potato crop give more profit
Published on: 01 July 2022, 01:13 IST