पशुपालन व शेती हे एकमेकांना पूरक आहेत. खरं पाहिलं तर, पशुपालनाशिवाय शेतजमिनीची सुपीकता टिकविता येत नाही. रासायनिक खतांनी शेतजमिनी नापीक होत चालल्या आहेत. हेक्टरी उत्पन्न दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच, पिकांमध्ये रासायनिक पदार्थ जे मानवप्राण्यांना धोकादायक आहेत, ते वाढत चालले आहेत. तसेच वनस्पतींची रोगांविरुद्धची प्रतिकारकशक्ती कमी होत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची तणनाशके, कीडनाशके (बुरशी, जीवाणू, विषाणूरोधक रसायने) यांचा वापर वाढला आहे
भारतातील वेगवेगळ्या प्रदेशांत अनेक जातींच्या चार पायांचे पशू आहेत. या पशूंमध्ये रवंथ करणारे पशू- यात गायी, म्हशी, शेळ्या, मेंढय़ा, उंट तसेच १-२ पोटकप्पे असलेले गाढव, डुक्कर, मिथुन, याक इत्यादींचा समावेश होतो. या पशूंपासून मिळणारे मल, मूत्र, हाडे, पोटातील अन्न या सर्वाचा उपयोग सेंद्रिय खते म्हणजे वनस्पतींचे अन् न म्हणून होतो.
वनस्पती, झाडेझुडुपे, रोपे इत्यादींपासून मिळणारा पालापाचोळा हा सहजासहजी कुजत नाही.
त्याच्यापासून जर चांगले कसदार खत मिळवायचे असेल, तर त्याबरोबर काही जैविक पदार्थ असले पाहिजेत. त्यांचा या पालापाचोळ्याशी संबंध आला पाहिजे. जीवाणू, काही बुरशी, एकपेशीय जीव हे जैविक पदार्थ पशूंच्या मलमूत्रात भरपूर प्रमाणात असतात. हे जीव पालापाचोळ्याला चांगल्या प्रकारे कुजवितात.
पशूंच्या मलमूत्राचा दुहेरी उपयोग आहे. यापासून बायोगॅस (गोबरगॅस) तयार करता येतो. वायू मिळविल्यानंतर जो काही चोथा उरतो, तो कंपोस्ट खत तयार करायला उपयोगी पडतो.
प्रत्येक पशूच्या मलमूत्रात नत्र, पालाश, स्फुरद कमी-जास्त प्रमाणात असतात. मलमूत्रात असणाऱ्या विविध जीवाणूंमुळे ते जैविक खत म्हणूनही वापरता येते. म्हणूनच शेतजमिनीतून येणाऱ्या, मानवाला न पचणाऱ्या वनस्पतीजन्य बाबी पशूंच्या पोटात गेल्यावर त्यावर प्रक्रिया होते. तयार झालेले पदार्थ पुन्हा निसर्गाकडे जातात. त्याची व्यवस्थित विल्हेवाट लागते व वातावरण शुद्ध ठेवण्यास मदत होते. तसेच हवेतील दूषित वायू वनस्पती शोषून घेऊन ‘ग्लोबल वॉर्मिंग’ कमी करण्यास हातभार लावते.
शेतकरी हितार्थ
श्री. विनोद धोंगडे नैनपुर
ता सिंदेवाहि जिल्हा चंद्रपूर
९९२३१३२२३३
Published on: 19 April 2022, 09:43 IST