थोडं विश्लेषण करु शेणखतावर शेती साठी शेणखत का आहे महत्वाचे ? शेणखताची परीभाषा काय आहे? तत्पूर्वी शेती साठी शेणखत हा अन्न निर्माण करणारी यंत्रणा आहे.हे लक्षात आले कि सर्वच लक्षात येईल.मित्रहो नियमित शेणंखत वापरामुळे जमिनीच्या कणांच्या रचनेत बदल होऊन भौतिक गुणधर्मांमध्ये लक्षणीय बदल होतात. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. पांढऱ्या मुळीची चांगली वाढ झाल्यामुळे झाडातील संजीवकांची निर्मिती तसेच वहनदेखील चांगल्याप्रकारे होते.
बरेचसे शेतकरी शेतात शेणखत अगदी सहजपणे मिसळून निवांत राहतात. परंतु शेणखताबरोबरच इतर स्रोतांपासून मिळणाऱ्या अन्नद्रव्यांचा देखील वापर करावा लागतो. शेणखत हे जमिनीच्या आरोग्यासाठी एक प्रकारे पूरक म्हणून कार्य करते.
शेणखतामधून अन्नद्रव्यांचे मिळणारे प्रमाण रासायनिक खतांच्या तुलनेत फारच अत्यल्प असते. परंतु सेंद्रिय पदार्थांचा अंतर्भाव जास्त असल्यामुळे सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण जमिनीत तयार होते. परीनाम खुप चांगले दिसतात.त्यामुळे जमिनीत अन्नद्रव्ये उपलब्ध करण्यास मदत करणारे जिवाणू जसे ऍझोटोबॅक्टर, स्फुरद विरघळवण्यास मदत करणारे जिवाणू इ. इतर सूक्ष्मजीवांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते. गांडुळांचा जमिनीतील वावर वाढतो.जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
शेणखताच्या नियमित वापरामुळे जमिनीच्या कणांच्या रचनेत बदल होऊन भौतिक गुणधर्मांमध्ये लक्षणीय बदल होतात.
जमिनीतून वापरण्यात येणारे जैविक-कीड-रोगनाशके जसे ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, पॅसिलोमायसिस, बिव्हेरिया, मेटारायझियम आणि जैविक खते जसे ऍझोटोबॅक्टरसह इतर अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणाऱ्या जिवाणूंची वाढ नैसर्गिक पद्धतीने होण्यास मदत होते.
जमिनीतील मुळांच्या कार्यक्षेत्रातील श्वसन वाढून मुळांद्वारे संश्लेषित करण्यात येणाऱ्या संजीवकांची निर्मिती चांगल्या प्रकारे होते. पांढऱ्या मुळींची वाढ जोमदार होऊन पीक संपूर्ण हंगामात निरोगी असते.
पांढऱ्या मुळीची चांगली वाढ झाल्यामुळे झाडातील संजीवकांची निर्मिती आणि वहन चांगल्याप्रकारे होते.
जमिनीची पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेत वाढ होऊन जमिनीच्या सामूमध्येदेखील अपेक्षित बदल होतो.
कधीकधी आपली चुक आपल्याला महागात पडते जसे की शेतकरी आपल्या जे शेणंखताची जागा म्हणा की उकिरडे त्या खड्ड्यात वर्षभर साठवलेले शेण हे खत म्हणून शेतात मिसळतात. असे शेणं चांगले कुजलेले असावे लागते मित्रहो जर अशा शेणामध्ये हमखास हुमणी, भुंगे, भुंग्याच्या अळ्या इत्यादी किडींच्या अळी अवस्था आढळतात. ज्यास बरेचसे शेतकरी "शेणकिडे' म्हणून संबोधतात. अशा विविध भुंगेरावर्गीय किडींच्या अळ्या शेणखताद्वारे पसरून शेतातील मुख्य पिकास नुकसान पोचवितात. त्यांचे नियंत्रण करणे आवश्यक आहे जसे
त्या किडींची मादी मे-जून महिन्यांत शेणासारख्या कुजणाऱ्या पदार्थांमध्ये अंडी घालतात. त्यामुळे शेतातील शेणाचा खड्डा, ढिगारा, उकिरडा इत्यादी मे महिन्याच्या सुरवातीलाच रिकामा करून हे शेणखत शेतात मिसळून द्यावे. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर त्यामध्ये घातल्या जाणाऱ्या अंड्यानंतर होणारा प्रसार थांबविता येईल. शेणखत जमिनीत मिसळताना त्यात सापडणाऱ्या भुंगेऱ्यांच्या अळ्या वेचून नष्ट कराव्यात.
उन्हाळ्याच्या दिवसांत चाऱ्याची कमतरता असताना शेतकरी मोकळ्या शेतात जनावरे चरण्यास सोडतात. त्यांचे शेण शेतात विखुरलेल्या स्वरूपात पडते.जसे की मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या सुरवातीला पडणाऱ्या पावसाबरोबरच हुमणीच्या मादी भुंगेऱ्यांकडून अशा कुजणाऱ्या शेणात अंडी घातली जातात. त्यामुळे अशा शेतात पुढील हंगामात घेतले जाणारे पीक हे हुमणीच्या अळीद्वारे प्रादुर्भावग्रस्त होते.हे बाब आपल्या सर्वांच्या लक्षात असेलच दुसरे म्हणजे आपला काही शेतकरी वर्गाला उन्हाळ्यात शेतात बैठका बसवतो जसे की शेळ्या-मेंढ्या झाल्या गोलाकार कळप बसविल्या जातात, त्याच भागात पावसाळ्यात हुमणीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. हेच आपल्या पथ्यावर पडते. आपल्या कुजणाऱ्या शेणात पिकांस उपद्रवी ठरणारी बुरशी, मर रोग, मूळकूज, करपा, सड या रोग निर्माण करणाऱ्या बुरशी या शेणात नसाव्यात याकडे लक्ष द्यावे.बऱ्याच वेळा शेतातील निंदण्यात येणारे गवत जनावरांच्या गव्हाणीत चारा म्हणून वापरले जाते. अशा तणांच्या मुळाला शेतातील माती रोगकारक बीजाणूंसह शेणाबरोबर खड्ड्यात जाते. त्या ठिकाणी इतर सेंद्रिय पदार्थांबरोबर वाढते. अशा वेळेस शेणखतास जैविक प्रक्रिया करून घेणे आवश्यक ठरते.जसे कंपोस्ट व्यतिरिक्त s9कल्चर की इनाकुलम वापरून उत्कृष्ट दर्जाचे सेंद्रिय खत तयार होते. भाजीपाला पिकासाठी गादीवाफा तयार करण्यापूर्वीच हेक्टरी 20 टन शेणखत, निंबोळी पेंड, ट्रायकोडर्मा इ.सह शेतात मिसळावे. नंतर तयार झालेल्या गादीवाफ्यावर रोपांची लागवड करावी.
मिलिंद जि गोदे
Published on: 13 January 2022, 01:28 IST