Agripedia

सर्वात महत्वाचे तन नाशक हे दुधारी शस्त्र आहे यात चुकीला माफी नाही यासाठी तणनाशक काळजी पुर्वक शेतकरी बांधवांनी शेतात समक्ष हजर राहुन वापर केला पाहीजे.

Updated on 06 July, 2022 1:07 PM IST

सर्वात महत्वाचे तन नाशक हे दुधारी शस्त्र आहे यात चुकीला माफी नाही यासाठी तणनाशक काळजी पुर्वक शेतकरी बांधवांनी शेतात समक्ष हजर राहुन वापर केला पाहीजे.यात चुकले तर चुकीला माफी नाही हे लक्षात असु दया.आता आपन तणनाशकाचे प्रकार पाहुया1) निवडक तणनाशक (सिलेक्टीव )हि तणनाशके ठरलेल्या पिकाचे नुकसान न करता फक्त तणे नष्ट करतात उदा .इमीडा थाईपर. परशुट ( सोयबीनसाठी ) गोल .( कांदासाठी ) अल्ट्राझीन ( मका बाजरी ज्वारी उस या पींकानसाठी )2)बिगर निवडक ( नॉन सिलेक्टीव )हि तणनाशके पीक व तण दोनही वर परीनामकरुन नष्ट करतात ( जे हिरवे असेल ते तणनाशक नष्ट करतात त्यामुळे यांचा वापर फार सावधानतेने करावा

उदा . ग्लायसेल (राउड अप )टेराकोट डायकलोराईट (ग्रामोकझोन)परत निवडक तणनाशकमध्ये 2 प्रकार आहेत1)उगवणी पुर्व (प्री इमरजन्स )2) उगवणीनंतर ( पोस्टइमर्जन्स तणनाशक वापरतांना द्यावयाची काळजी.1)तणनाशक वापरतांना शक्यतो स्प्रे.पंप . वेगळा वापरा2) तणनाशक फवारणी करतांना गढूळ पाणी वापरू नये यामुळे त्याचे योग्य परीनाम येत नाही3 )तणनाशकाचा वापर तज्ञांच्या सल्ला घेउन पुर्ण माहीती घेउनच वापर करावा चुकीला माफी नाही.4 )तणनाशक वापरतांना फ्लड जेटमोझल व पीकात हुडचा वापर करवा.कापुस तणनाशक नियोजन- 1)कापुस लागवड झाल्यानंतर जमीनीत असता 72 तासाच्या आता 3 दिवसा अगोदर चौथ्या दिवसी नाहीखालील प्रमाने तणनाशक वापरावे

पंपाला साधारण 30 मी ली (एकरी 300 मी ली ) हिटवीड व त्याबरोबर टर्गा सुपर किंवा व्हीप सुपर पंपाला 40 मी ली वापरावे(पण आता हे उगवनी पुर्वतंत्र शक्य नाही कारण जवळ जवळ कापुस लागवड होऊन उगवन झाली आहे )2) कापुस पीक 6ते 8 पानांचे वरती गेल्यावर व तण.2ते 3 पानांचे असतांनाहिट वीड 30 मी ली व 40 मी ली टरगा सुपर किंवा व्हीप सुपर 15 लीटर पाण्यात टाकुन फवारणी करावी एकरी 300 मीली .औषध फवारले गेले पाहीजे )3) कापुस मोठा झाल्यावर फक्त तणावर कापुस पिकावर पडून न देता हुडचा वापर करूनफवारणी करु शकत असाल तरगयागायफोसेट (राउंड अप ) पुर्ण काळजी घेउन वापरू शकतातकापसात तुरीचे पाटे/वखर/चाचे असल्यामते सोडावे लागतील म्हणजे त्यावर तणनाशक पडले नाही पाहीजे

सोयाबीन-सोयाबीन 12 ते 15 दिवसानंतर जमीनीत ओल असतांना1)इमझाथाईपर ( परशुट ) ची फवारणी करावी2) सोयाबीन 12 ते 25 दिवसाचे दरम्यान जमीनीत ओल असतांना.साकेद हे तणनाशक 80 मी ली प्रतीपंप ( 15 लीटर ) वापरावे3) सोयाबीन पीक 12 ते 25 दिवसांचे दरम्यान फक्त 4 ग्रॅम प्रतीपंप ओडीसी वापरावेमका- पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी 1)टिंजर 30 मी ली प्रती एकर व 500ग्रॉम ( अर्धा किलो ) अल्ट्राझीन प्रती एकर वापरावे2)पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी लॉडीस115 ग्रॅम व 500 ग्रॅम ( अर्धा कीलो ) अल्ट्राझीन प्रती एकर वापरावेतणनाशक वापरतांना काळजी घ्यावी ते दिलेल्या प्रमामातच वापरावे अन्यथा चुकिला माफी नाही फार मोठे नुकसान होते.

 

भगवती सीडस् चोपडा

श्री प्रा दिलीप शिंदे सर

9822308252

English Summary: Cotton Safe use of herbicides for maize and soybean crops
Published on: 06 July 2022, 01:07 IST