Agripedia

कापूस हे देशातील महत्वाचे नगदी पीक आहे. कपाशीची लागवड सुमारे 4000 वर्षापासून होत असल्याचे प्राचीन ग्रंथामध्ये आढळते.

Updated on 23 June, 2022 5:40 PM IST

कापूस हे देशातील महत्वाचे नगदी पीक आहे. कपाशीची लागवड सुमारे 4000 वर्षापासून होत असल्याचे प्राचीन ग्रंथामध्ये आढळते. फाळणींच्या वेळी राज्यात देशी कपाशींखाली 90 टक्केंपेक्षा जास्त क्षेत्र होते व तत्कालीन गावरान वाण हे तलमपणा व धाग्याच्या मजबुतीसाठी प्रसिद्ध हांतें. भारतीय घरगुती कृषि उत्पादनात कापसाचा वाटा जवळपास 30 ट्क्के असून यामुळे जवळपास 6 कोटी लोकांच्या उपजीविकेचे साधन उपलब्ध झाले आहे. यापैकी जवळपास अर्ध्या लोकांना कापड उद्योगाने रोजगार पुरविला आहे.भारतात नोंदणीकृत असलेल्या अनेक सूतगिरण्या, 1500 स्पिनोंग मिल्स व अंदाजित 280 कापड़ कारखाने आहेत. कापड उद्योगाचा एकूण राष्ट्रीय उत्पज्ञात 35 ट्क्के, औद्योगिक उत्पज्ञात 14 टक्के तर निर्यातीत 27 टक्कें वाटा आहे. देशाचे आर्थिक स्थैर्य व शेतक-यांच्या उपजीविकेच्या दृष्टीने कापूस हे महत्वाचे पीक आहे. देशामध्ये *हरियाणा व गुजरात राज्यामध्ये सर्वाधिक उत्पादकता* मिळते कारण या राज्यांमध्यें लागवड बागायती खाली होते.देशातील कपाशींच्या क्षेत्रापैकी जवळपास एक तृतीयांश पेक्षा अधिक क्षेत्र महाराष्ट्रामध्ये लागवडीखाली आहे.

महाराष्ट्रामध्ये सन 2017-18 मध्ये 41.92 लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड केली गेली. परंतु अवर्षणग्रस्त परिस्थितीमुळे उत्पादकता 150 किंग्रॅ. रुई प्रतेि हेक्टर एवढी कमी मिळाली. *महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, विंदर्भ व खानदेश भागामध्ये कपाशींची लागवड* प्रामुख्याने केली जाते.जागतिक उत्पादकतेच्या (537 कि.ग्रॅ./हेक्टर) तुलनेत भारताची उत्पादकता (460 कि.ग्रॅ./हेक्टर) कमी तर महाराष्ट्राची सरासरी उत्पादकता अत्यंत कमी आहे.देशामध्ये कापड उद्योग व सूतगिरण्या यांची कापूस मागणी सातत्याने वाढून देखील लांब धाग्याचा कपाशीचे उत्पादन वाढल्यामुळे मागील दशकामध्ये सरासरी 80 लाख गाठींची निर्यात प्रति वर्षी होत आहे.कापूस संशोधनाचा मागोवाजगामध्ये कपाशींच्या एकूण 55 प्रजाती असून रानटी प्रजाती वगळता केवळ चार प्रजाती लागवडीमध्ये आहेत.त्यापैकी महाराष्ट्रामध्ये देशी प्रजातींचे क्षेत्र गेल्या सात दशकात 15 टक्के वरून कमी होऊन 3 ट्क्क्यांपर्यंत खाली आले आहे तर हिर्सुटम (अमेरिकन) प्रजातींच्याबीटी संकरित वाणांचे क्षेत्र 95 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.भारतामध्ये सन 1920 पासून केंद्रीय भारतीय कापूस समितीच्या माध्यमातून संशोधनास सुरुवात झाली व कृषी हवामानपरत्वे विविध सरळ वाण विकसित करण्यात आले. भारतीय कृषी संशोधन संस्थेने सन 1967 मध्ये अखिल भारतीय समन्वित कापूस सुधार प्रकल्पा च्या माध्यमातून आधुनिक कापूस संशोधनाची मुहूर्तमेढ रोवली. 

सन 1970 मध्ये कपाशीचा जगातील पहिला संकरित वाण एच- 4 डॉ. सी. टी. पटेल यांनी कापूस संशोधन केंद्र, सूरत येथून विकसित केला.त्यानंतर विविध राज्यांमध्ये अनेक अमेरिकन कपाशींचे संकरित वाण (एच 6.नेके संकर 1,पोंकेन्हीं संकर 2. संकर 3.संकर 4 'धनलक्ष्मी, वर्लक्ष्मी,जयलक्ष्मी, इत्यार्दी) विकसित केले गेले.त्यपैकीच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राद्वारे विकसित एन.एच.एच-44 हा एक प्रमुख संकरित वाण होय. या संकरिंत वाणाची देशामध्ये सन 1995 /2000 दरम्यान सर्वाधिक क्षेत्रावर लागवड करण्यात आली होती.संकरित कपाशीची लागवड करणारा भारत हा एकमेव देश असून मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड करणारे अमेरिका, चीन, ब्राझील, ऑस्ट्रेलैिया या देशात अमेरिकन कपाशींच्या सरळवाणांची लागवड केली जाते हे उल्लेखनीय आहे.बी.टी. तंत्रज्ञान आगमनानंतरची स्थितीकपाशीवरील बोंडअळ्यांच्या प्रादुर्भावामुळे होणारे नुकसान व पीकसंरक्षण खर्च यांचा साकल्याने विचार करता पिकामध्ये जनुकीय बदल करून उत्पादित केलेले बी.टी. वाण बोंडअळ्यांकरिता 90 दिवसांपर्यंत प्रतिकारक आहेत.या वाणांमध्ये बॅसिलस थुरिन्जिएंसीस या जिवाणूतील जनुक मोन्सॅटो या बहुराष्ट्रीय कंपनीद्वारे कपाशीच्या झाडामध्ये प्रत्यारोपीत करून त्यामध्ये तयार होणा-या काय प्रथिनामुळे कापूस पिकास बोंडअळ्यांविरुध्द प्रतिकारक्षमता तयार झाली.

सदरील बोलगार्ड-| तंत्रज्ञान सन 2002 पासून व्यापारी दृष्टिकोनातून शेतक-यांच्या शेतावर मोठ्या प्रमाणावर लागवडीसाठी उपलब्ध झाले.यामुळे योग्य वेळी बोंडअळी व्यवस्थापन, त्यासाठी पीकसंरक्षण खर्चात कपात होऊन परिणामी उत्पादनात वाढ झाली.कपाशीवरील बोंडअळ्या व पाने खाणा-या अळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून क्राय 2 ए.बी. जनुक प्रत्यारोपीत बोलगार्ड- हे तंत्रज्ञानयुक्त बियाणे मागील काही वर्षांपासून शेतक-यांना उपलब्ध झाले आहे.बोलगार्ड तंत्रज्ञानामुळे बोंडअळ्यांचे योग्य वेळेवर व्यवस्थापन झाल्यामुळे पाते, फुले व बोंडांचे नुकसान कमी झाले आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून येते.बोलगार्ड तंत्रज्ञानाचा मोठ्य़ा प्रमाणावर अवलंब होऊन राज्यातील 95 टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्र BT तंत्रज्ञानयुक्त वाणांच्या लागवडीखाली आहे. मॉन्सॅट व्यतिरिक्त मेटहेलीक्स, फ्युजन बीटी, जेके सीड्स इत्यादी कंपन्यांचे जनुक्युक्त वाण बाजारात आहेत.सन 2002-03 मध्ये बी.टी. तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यानंतर देशातील कपाशीच्या क्षेत्रांमध्ये जवळपास 40 टक्के वाढ झाली असून उत्पादकता 1.78 पट वाढल्यामुळे उत्पादनामध्ये 194 टक्के वाढ झाली आहे.बी.टी. कापूस लागवडीस परवानगी मिळाल्यापासून राज्यातील क्षेत्र 50 टक्क्यांनी वाढले असून उत्पादकता दुपटीपेक्षा अधिक वाढून उत्पादन जवळपास तिप्पट झाले आहे.

 

प्रा.दिलीप शिंदे(सर)

भगवती सिड्स चोपडा

9822308252

English Summary: Cotton production, history / background, research and BT technology
Published on: 23 June 2022, 05:40 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)