Agripedia

शेतकरी कापूस पिकामध्ये चांगले उत्पादन घेत असतात. मात्र रोगराईमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठे नुकसान होते. त्यामुळे वेळीच खबरदारी घेण्याची गरज असते. आज आपण कापसावरील अळीचा कायमचा नायनाट कसा करावा याविषयी माहिती घेऊया.

Updated on 12 September, 2022 3:36 PM IST

शेतकरी कापूस पिकामध्ये चांगले उत्पादन घेत असतात. मात्र रोगराईमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठे नुकसान होते. त्यामुळे वेळीच खबरदारी घेण्याची गरज असते. आज आपण कापसावरील (cotton) अळीचा कायमचा नायनाट कसा करावा याविषयी माहिती घेऊया.

कायमची अळी संपवा

कापसावरील गुलाबी बोंड अळीचा (cotton farming tips) प्रादुर्भाव सर्वात घातक आहे. याचा प्रादुर्भाव तातडीने कमी करण्यासाठी प्रोफेनोफोस ५० ईसी २० मिली अधिक, ५ टक्के तीव्रतेचे निंबोळी अर्क हे २० मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी करा.

निंबोळी अर्कामुळे (benifits of nimboli ark) रस शोषण करणाऱ्या किडी, मावा, तुडतुडे, फुलकिडे यांचे नियंत्रण होण्यास मदत होते. अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांसाठी 'हे' खत ठरतंय वरदान; मिळतोय भरपूर नफा

अमावस्येला म्हणजेच काळाेख्या रात्री (dark night) किडींचे मिलन होऊन त्या पिकांवर अंडी घालतात. प्राथमिक अवस्थेतच उपाययोजना केली तर किडींच्या प्रादुर्भावापासून पिकाचे संरक्षण करता येते. तसेच सोयाबीनवरील येलो मोझॅक याबाबतही त्यांनी कृषी सल्ला दिला आहे.

शेतकऱ्यांनो पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर केला 'हा' मोठा बदल; जाणून घ्या सविस्तर

सोयाबीन पिकावर (soybeans farming tips marathi) काही ठिकाणी पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. यामुळे साेयाबीनची पाने पिवळी पडतात. या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीमार्फत होतो. त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रोगग्रस्त झाडे त्वरित उपटून नष्ट करा.

पांढऱ्या माशीच्या नियंत्रनासाठी थायमिथोक्झाम १२.६० टक्के अधिक लँबडा सायहॅलोथ्रीन ९.५० टक्के झेड सी (अलिका) प्रति १० लिटर पाण्यासाठी २.५ मिली किंवा बिटासायफ्लूथ्रीन ८.४९, इमीडाक्लोप्रीड १९.८१ (सोलोमोन) प्रति १० लिटर पाण्यासाठी ७ मिली या दोन्हीपैकी एका किटकनाशकाची फवारणी करा.

महत्वाच्या बातम्या 
राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव; खबरदारी घेण्याची गरज
आज बुधाची बदलणार चाल; पाहा तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस
घरबसल्या करा गुंतवणूक; पोस्ट ऑफिसच्या 'या' स्कीममध्ये दरमहा मिळतील 5000 रुपये

English Summary: Cotton Production farmers cotton worm forever income
Published on: 12 September 2022, 03:36 IST