Agripedia

आपण बऱ्याचदा पाहतो की, जेव्हा कपाशी पिकाला भरपूर प्रमाणात पाते आणि बोंडे लगडलेली असतात, त्याच वेळेस पावसाचे प्रमाण देखील जास्त असते.या जास्त पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कपाशी पिकामध्ये पातेगळ होणे, बोंडांची सड तसेच कपाशी पिवळी किंवा लाल पडणे इत्यादी समस्या उद्भवतात. यामध्ये पातेगळ ही समस्या फारच गंभीर स्वरूपाचे असते.

Updated on 22 July, 2022 2:35 PM IST

आपण बऱ्याचदा पाहतो की, जेव्हा कपाशी पिकाला भरपूर प्रमाणात पाते आणि बोंडे लगडलेली असतात, त्याच वेळेस पावसाचे प्रमाण देखील जास्त असते.या जास्त पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कपाशी पिकामध्ये पातेगळ होणे, बोंडांची सड तसेच कपाशी पिवळी किंवा लाल पडणे इत्यादी समस्या उद्भवतात. यामध्ये पातेगळ ही समस्या फारच गंभीर स्वरूपाचे असते.

कारण कपाशीला पाते असतील तरच कापूस उत्पादन हातात येते. परंतु पातेगळ जर मोठ्या प्रमाणात झाले तर त्याचा थेट परिणाम हा कापूस उत्पादनावर होतो.

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप नुकसानकारक ठरणारी ही समस्या आहे. पाहायला गेले तर त्याचे अजूनही वेगवेगळी कारणे आहेत. ते आपण पाहू.

 अगोदर पाहू कपाशीची पातेगळ का होते?

 कपाशी पिकाच्या जेव्हा वाढीचा कालावधी असतो तेव्हा जर बोंडांची आणि पात्यांची संख्या झाडावर जास्त प्रमाणात झाली तर सहाजिकच  दोन झाडांमध्ये जमिनीमधील उपलब्ध अन्नसाठा प्राप्त करण्यासाठी चढाओढ निर्माण होते.

त्यामुळे अन्नद्रव्यांचा पुरवठा हवा तेवढा न झाल्यामुळे बहुतेक पाते आणि बोंडांची गळ मोठ्या प्रमाणात होते. हे एक प्रमुख कारण सांगता येईल. दुसरे कारण म्हणजे कपाशी पिकाच्या बोंडांवर हवामान, विविध प्रकारच्या किडींचा मोठ्या प्रमाणात झालेला प्रादुर्भाव व कपाशीच्या झाडाच्या अंतर्गत क्रिया इत्यादी घटकांचा परिणाम जास्त होतो.

नक्की वाचा:कापूस पिकातील आकस्मिक मर फुल गळ आणि सोप्पे उपाय

 हवामानामध्ये अचानक जास्त पाऊस होणे किंव्हा पावसाचा फार मोठा खंड पडणे इत्यादी कारणांमुळे झाडांमध्ये  जे काही अन्न घटक तयार होतात त्या घटकांचे पाते, फुले व बोंडे या भागांकडे आवश्यक तेवढे वहन न झाल्यामुळे पात्यांची व बोंडांची गळ होते.

तसेच वाढणारे तापमान  किंवा जे फुलं उमलतात त्यांच्यावर पाऊस जर पडला तर परागसिंचन आवश्यक त्या प्रमाणात न झाल्यामुळे सुद्धा पाते गळ होते. ज्या कपाशीची लागवड उशिरा केली जाते अशा कपाशीमध्ये पाते आणि बोंडे गळण्याचे प्रमाण अधिक असते. अजून बरीचशी कारणे सांगता येतील परंतु ही कारणे फार महत्त्वाची आहेत.

मग काय करावे यासाठी?

1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कपाशीची लागवड करतानाच मुळात पाण्याचा निचरा होणारी उत्तम जमिनीची निवड करावी.ही फार महत्त्वाची काळजी आहे.

2- तसेच कपाशी पिकाला जेव्हा फुलधारणा होण्याचा कालावधी असतो, त्यावेळेस  अधिक तापमान किंवा ढगाळ हवामान किंवा पावसाचा मोठा खंड पडणार नाही अशा अंदाजाने लागवड करणे आवश्‍यक असते.

3-तसेच झाडांना लागणाऱ्या आवश्‍यक अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. यासाठी फवारणीद्वारे विद्राव्य खतांचा योग्य वेळी वापर करावा.

नक्की वाचा:Crop Care: करा शेण आणि गुळाचा वापर आणि बनवा जीवामृत, वाढेल पिकाचा दर्जा आणि उत्पादन

4- कधीकधी कपाशी पिकातील शरीरक्रियात्मक कारणांमुळे देखील पाते गळ होते यासाठी 20 पीपीएम नॅपथ्यालीन ऍसिटिक ऍसिड ची फवारणी करणे कधीही चांगले.

दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे  कपाशी पिकाला पाते लागण्याचा व फुले लागण्याचा कालावधीच्या वेळेस दोन टक्के डीएपी 200 ग्रॅम प्रति 10 लिटर खताची एक ते दोन फवारण्या घेणे कधीही चांगले.

या दोघांची फवारणी शक्यतो सकाळी करावी.

5- कधीकधी नत्रयुक्त खतांचा तसेच संप्रेरकांचा वापर खूप जास्त प्रमाणात केला गेला तर अशा वेळीसुद्धा फुलांची गळ होते. झाडाची कायिक वाढ रोखण्यासाठी वाढ रोधकांचा फवारणीद्वारे पात्या लागताना वापर करावा.

6- तसेच पाण्यात विरघळणारे खतांचा पुरवठा केल्यास खूप फायदा होतो. पाते, बोंडे लागण्याच्या कालावधीमध्ये डीएपी किंवा युरिया खताचे 2% 200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामुळे देखील पातेगळ आणि बोंड गळ होऊ शकत नाही. वरील उपाय केले तर निश्चितच पातेगळ थांबण्यास मदत होते.

नक्की वाचा:Crop Care: करा शेण आणि गुळाचा वापर आणि बनवा जीवामृत, वाढेल पिकाचा दर्जा आणि उत्पादन

English Summary: cotton management is so important in growth perioed of cotton crop
Published on: 22 July 2022, 02:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)