कापूस खरीप हंगामातील एक मुख्य पीक आहे. याची पेरणीची वेळ आता जवळ येतं आहे. अनेक राज्यांत कापसाची पेरणी सुरु देखील झाली आहे. याचा वापर कापड तयार करण्यासाठी केला जातो. यासोबतच कापसाच्या बियापासून तेलही बनवले जाते. त्यामुळेच बाजारात कापसाचे दर चांगले राहतात. गत खरीप हंगामात कापसाला कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव मिळाला आहे यामुळे आगामी खरीप हंगामात कापसाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाकडून व्यक्त केली गेली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी कापसाची शेती करून चांगला नफा मिळवू शकतात.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कापसाची लागवड करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कृषी तज्ञांच्या मते, याची पेरणी पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत केली तर या पिकातून चांगले उत्पादन मिळवले जाऊ शकते. काळी माती असलेल्या जमिनीत याची लागवड करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळेच काळ्यामातिला कापसाची काळी मृदा असे संबोधले जाते. याशिवाय पाण्याची चांगली सोय असलेल्या वालुकामय चिकणमाती असलेल्या जमिनीतही कपाशीची लागवड करता येते.
उत्तर भारतातील कापसाची लागवड सिंचनावर आधारित असते. मित्रांनो कपाशीचे शेत तयार करताना हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की शेताची पातळी योग्य आहे आणि जमिनीची पाणी धरून ठेवण्याची आणि निचरा करण्याची क्षमता दोन्ही चांगली आहे. याशिवाय वेळोवेळी शेतातील तण काढून टाकले पाहिजे, ज्यामुळे कपाशीची वाढ योग्य प्रकारे होऊ शकते.
दक्षिण आणि मध्य भारतात कापसाची शेती पावसावर अवलंबून असते. या प्रदेशात काळ्या जमिनीत कापूस पिकवला जातो. मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, पूर्वी महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये कापसाची लागवड केली जात होती. पण आता हळूहळू त्याची लागवड उत्तर भारतातील राज्यांमध्येही दिसू लागली आहे. शासनाकडून प्रोत्साहन मिळाल्यानंतरही अनेक शेतकरी त्याच्या लागवडीकडे वळले आहेत. आता येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात कापसाची शेती करून नफा कमवीत आहेत.
सेंद्रिय कापसाचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने 15 प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NFSM) अंतर्गत कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कापूस विकास कार्यक्रमावर काम करत आहे. याशिवाय ICAR-केंद्रीय कापूस संशोधन संस्था (CICR) देखील देशातील सेंद्रिय कापसाचे उत्पादन वाढविण्यासाठी तंत्रज्ञान विकास आणि संशोधनावर काम करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करत आहे.
Published on: 20 April 2022, 05:21 IST