Agripedia

जमिनीची सुपीकता ही पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी महत्त्वाचे असते. जमिनीची सुपीकता तपासण्यासाठी प्रयोगशाळा लागते.अगदी मातीतील काही घटक तपासाच्या असतील तरीसुद्धा माती परीक्षण किटची आपल्याला गरज भासते.

Updated on 27 January, 2022 11:30 AM IST

जमिनीची सुपीकता ही पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी महत्त्वाचे असते. जमिनीची सुपीकता तपासण्यासाठी प्रयोगशाळा लागते.अगदी मातीतील काही घटक तपासाच्या असतील तरीसुद्धा माती परीक्षण किटची आपल्याला गरज भासते.

परंतु आपण या लेखांमध्ये एक सहज आणि सोपी पद्धत जाणून घेणार आहोत. ज्याद्वारे जमिनीची सुपीकता आणि त्यामधील उपयुक्त जिवाणू यांची माहिती आपल्याला मिळू शकते.

 सुती कपडा जमिनीत करून जमिनीची सुपीकता तपासणे……….

 मागील काही दिवसांमध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशात हा प्रकार वापरला जात आहे. येथे सिटीझन सायन्स नावाचा एका प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना सुती कपडे जमिनीत फोडण्यासाठी दिल्या जात आहेत आणि त्याद्वारे जमिनीची सुपीकता निर्देशांक तपासला जात आहे.

यामध्ये एक टी बॅग आणि सुती कपडा जमिनीत पुरला जातो. नंतर जमिनीत पुरलेला हा कपडा एक आठवडा किंवा महिन्यानंतर काढून पाहिला जातो. यामध्ये हा कपडा किती जुना आणि नष्ट झाला आहे त्यावरून जमिनीची सुपीकता लक्षात येते.

झालेल्या या  प्रयोगातील  महत्त्वाचे मुद्दे….

  • हा प्रयोग न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशात राष्ट्रीय पातळीवर स्वीकारण्यात आला आहे.
  • सूत किंवा कपाशी एक प्रकारच्या सेल्युलोज पासून तयार होते. त्यामुळे सुतीकपडा जमिनीतील जिवाणू साठी एक स्वादिष्ट भोजन ठरतो असे बोलले जाते.
  • जिवाणू हे या कपड्यावर हल्ला करतात.त्यामध्ये हा कपडा नष्ट होऊ लागतो. कपडा नष्ट झाल्यास अशा मातीत सर्व पोषक घटक अस्तित्वात असल्याची ती खूण असते.
  • तसेच हापुरलेला कपडा बाहेर काढल्या नंतर त्याचे डिजिटल विश्लेषणही केले जाते. यामधून मातीची गुणवत्ता कशी आहे, ती किती सुपीक आहे हे तपासले जाते.(स्रोत-कृषिवर्ल्ड)
English Summary: cotton cloth dig in land you can check fertility of land useful experiment
Published on: 27 January 2022, 11:30 IST