Agripedia

शेती मालाच्या भावाचा आपण कधीच अंदाज लाऊ शकत नाही पण योग्य विचाराने आणि योग्य वेळेत योग्य काम करून खर्चात नकीच खूप बचत करू शकतो

Updated on 26 February, 2022 11:57 AM IST

कारण शेती मालाच्या भावाचा आपण कधीच अंदाज लाऊ शकत नाही पण योग्य विचाराने आणि योग्य वेळेत योग्य काम करून खर्चात नकीच खूप बचत करू शकतो

पण शेतकरी कुठं तरी बळी बडतो त्याच मुख्य कारण उत्पन्न मिळेल की नाही की काही आपत्ती ला सामोरे जावे लागेल अशी मनातील भीती आणि त्याचाच सर्व गैर फायदा घेतात.

कोणतरी म्हणत होत की दुकानदार लुटतात, पण एक लक्षात घ्या तोपण तिथे घर चालवण्यासाठी धरपडतोय आणि आपल्यातलाच एक आहे.

मी कायम बघत आलोय की जेंव्हा शेतकऱ्याला आम्ही फवारायला गरजे नुसार एक किंवा दोन गोष्टीच लिहून देतो तेंव्हा ते आणखीन काहीतरी सांगा म्हणतात दोन औषध फवारायला परवडत नाही पण जर त्याव्यतिरिक्त तिसऱ्याची गरज नसताना वापरायचं म्हणतात तेंव्हा खर्च वाढतो ,

आणि जर नाही ती दोनच औषध फवारा म्हणल्यावर दुकानात जातात आणि ती दोन औषध घेतात, तो पर्यंत शक्यतो दुकानदार पण काही बोलत नाही पण आपण त्याला विचारतो यात आणखीन काय घेऊ ?

मग. मग खरा खेळ होतो.

आणखीन एक अनुभव आहे

२०१६ मध्ये पण जेंव्हा नुकसान झालं होतं त्याच्या पुढच्या सिजन ला माझ्या एका शेतकरी मित्राला भेटायला गेलो आणि त्याला रु 16 प्रति किलो चे एक खत द्यायला सांगितलं ते पण 7 किलो 3 वेळा म्हणजे 21 किलो

त्याने लगेच गणित मांडलं 21 किलो × रु 16 = टोटल रु 336

आणि म्हणाला की सर या वर्षी खर्च कमी करायचा आहे मी चांगली गोष्ट आहे पण याची गरज आहे 

म्हणत जेंव्हा बागेतुन बाहेर येत होतो तेंव्हा तिथे मला एक बॉटल दिसली ती मी इचलून बघितली तर तोच मोलीक्युल असलेली रु १००० प्रति लिटर ची होती मी काही न बोलता फक्त हसलो तर ते खाली बघत इंपोर्टेड आहे म्हणुन आनलो म्हणे

आपल्याला इंपोर्टेड म्हणजे भारी आणि भारतीय म्हणजे लोकल तुच्छ ही जी सवय आहे आणि इंपोर्टेड च्या नावाखाली जो अतिरेक खर्च करतो तो कमी केला पाहिजे.

त्यामुळं जेवढं गरजेचं आहे ते वापरलाच गेलं पाहिजे आणि जे गरजेच नाही ते नाका वापरू.

 

वनिता ॲग्रो राहुल जाधव सर

English Summary: Cost of cultivation of farming needed today also practices management
Published on: 26 February 2022, 11:57 IST