भारतात कोथिंबीर लागवड हि मोठ्या प्रमाणात केली जाते आणि शेतकरी बांधव ह्यातून चांगले उत्पन्न प्राप्त करतात. कोथिंबीरचा वापर हा प्रत्येक भारतीय माणसाच्या स्वयंपाक घरात केला जातो. कोथिंबीर हि चव वाढवण्यासाठी भाजीत टाकली जाते त्यामुळे हिची मागणी हि चांगलीच बनलेली असते. ह्याची मुख्यता लागवड हि भाजी म्हणुन म्हणजे पानांसाठी केली जाते तसेच थोड्याबहू प्रमाणात ह्याच्यापासून 'धने' उत्पादन घेतले जाते.
कोथिंबीरची लागवड हि पूर्ण जगात होते भारतात ह्याची लागवड आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रात देखील कोथिंबीर लागवड हि लक्षणीय आहे आणि शेतकरी ह्यातून चांगली कमाई करत आहेत. कोथिंबीर लागवडीतून बक्कळ पैसा कमवण्यासाठी त्याच्या चांगल्या वाणांची पेरणी करणे चांगले असते. त्यामुळे कृषी जागरण आपल्या शेतकरी मित्रांसाठी कोथिंबीरच्या सुधारित जातींची माहिती घेऊन आले आहे. चला तर मग जाणुन घेऊया कोथिंबीर लागवडिविषयी.
कोथिंबीरच्या काही सुधारित जाती
स्वाती वाण
कोथिंबिरीची ही जात एपीएयू, गुंटूर यांनी विकसित केली आहे. या जातीच्या कोथिंबीरपासुन धने तयार होण्यास 80-90 दिवस लागतात. ह्या जातीपासून 400 किलो प्रति एकर उत्पादन देऊ शकते. ह्या जातीची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
राजेंद्र स्वाती वाण
कोथिंबीरची हि जात 110 दिवसांत उत्पादन देण्यासाठी तयार होते. कोथिंबिरीची ही जात आरएयूने विकसित केली आहे. हि वाण 1200-1400 किलो प्रति हेक्टर पर्यंत उत्पादन देते.
गुजरात कोरीएन्डर
गुजरात कोरीएन्डर या जातीच्या बिया अर्थात धने हे जाड आणि हिरव्या रंगाचे असते. ह्या जातीची कोथिंबीर हि 112 दिवसात तयार होते. ह्या कोथिंबीरच्या जाती मधून हेक्टरी 1100 किलो उत्पादन मिळू शकते.
गुजरात कोरीएन्डर-2
कोथिंबीरच्या ह्या जातीच्या कोथिंबीरला अधिक फांद्या आढळतात, शिवाय ह्या जातीची पाने हि मोठी आणि छत्रीच्या आकाराची असतात. या जातीची कोथिंबीर परिपक्व होण्यासाठी साधारण 110-115 दिवस लागतात. कोथिंबीरच्या ह्या जातीपासून 700 किलो एकरी पर्यंत उत्पादन हे मिळू शकते.
साधना वाण
कोथिंबिरीची ही वाण लवकर परिपक्व होते. हि वाण 110-112 दिवसात पूर्णपणे विकसित होते. कोथिंबीरच्या या जातीपासुन 450 किलो प्रति एकर पर्यंत उत्पादन हे मिळू शकते. ह्याची लागवड करून शेतकरी बांधव देखील चांगली कमाई करत आहेत.
Published on: 28 October 2021, 09:39 IST