Agripedia

पुर्वहंगामी कापुस सर्वसाधारण पणे 50 ते 55 दिवसाचा झाला आहे.

Updated on 07 July, 2022 7:49 PM IST

पुर्वहंगामी कापुस सर्वसाधारण पणे 50 ते 55 दिवसाचा झाला आहे. या कापुस पीकावर तुडतुडे व फुलकीडे यांचाकाही ठिकाणी अल्प प्रमानात प्रादुर्भाव दिसुन येत आहे . शेतकरी बांधव लगेच फवारनीची तयारी करीत आहे.असे न करता नुकसानीपातळी पाहुन साधारण 50 ते 60 दिवस फवारणी टाळली पाहीजे. असे केल्याने आपले शेतात ( कापुस पीकात ) मित्र किडची चांगला प्रमानात वाढ होते उदा . लेडी लिटील बर्ड यासारख्या मित्रकिडीची मोठया प्रमानात वाढ होते.तसेच क्रायसोपा गांधी ल माशी .शीरफीड माशी प्रार्थना किटक (मेन्टीस ) रॉबरमाशी कातीन मित्रकिड

सुद्धा वाढते हि किड तुडतुडे व बोडअळीची लहान अवस्थेवर आपली उपजीवीका करते यामुळे कापुस पिकाचे नैसर्गिक संरक्षण होते.आवश्यकता असल्यास ५ % निंबोळी अर्क व 0.५% तंबाखु अर्कची फवारणी करावी.तंबाखु अर्क तयार करण्याची पद्धत१ किलो वांग्या तंबाखु किंवा तंबाखु दुकानात तंबाखुचा चुरा ( भुगा ) मिळतो ( 40 ते 80 रुकिलो या भावाने तो 1 किलो घेवुन 10 लीटर पाण्यात 12 तास भिजवावे व नंतर मिश्रन अर्ध होईपर्यतं उकळावे ( 5 लीटर राहील ) व हे . मिश्र न 200 लीटर पाण्यात 2 % निंबोळी अर्काबरोबर फवारनीसाठी वापरावे.शेतकरी बांधव इमिडाक्लोप्रिड हे कीटकनाशक सतत वेगवेगळ्या स्वरूपात वापरतात पहिल्या फवारणी 1) इमिडाक्लोप्रिड%( साधे) 2( इमिडाक्लोप्रिड (सुपर) 3 ) इमिडा क्लोप्रिड

(दाणेदार ) हे एकच किटकनाशक 3 प्रकारात मिळते ते शेतकरी बांधव नियमीत वापरतात यामुळे किटकात (रस शोषक ) प्रतिकारशक्ती निर्मान होते यामुळे नियंत्रन करणे कठीण जाते यासाठी हे टालावेपिवळे व निळे चिकट सापळे शेतात लावावे टी आकाराचे बांबु पक्षी थांबे शेतात लावावे.आवश्यकताच असेल तरच रासायनिक किटकनाशके वापरावे.व त्यासाठी हि काळजी घ्यावी रासायनिक किटकनाशक हे निओनिकोटीन परत परत वापरू नये यांचा वापर अन्य कीटकनाशकांच्या पालटून पालटून करावा यामुळे कीटकांमध्ये विशेषता रसशोषक कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होत नाही यामुळे त्यांचे नियंत्रण करणे सोपे जाते गटातील सलग वापरु नये. 

निओ निकोटिन गटातील किटकनाशके1 )इमिडाकलोप्रीड 2)एसीटामा प्राईड )थायोनिथाक्याम 4 )क्लोथीयानीडिन हि किटकनाशके प्रत्येक फवारणीत वापर ल्या यामुळे किडींनमध्ये प्रतिकारशक्ती निर्मान होते यामुळे त्याचे पुढे नियंत्रन करणे कठीन जाते.रासायनिक किटकनाशक वापरायचे असेल 1 )बुप्राफेझीन 25 एससी 20मीली 2) फिप्रोनिल५एससी 30 मी ली3) अॅसीफेट 75 एस.पी 10 ग्रमतर यापैकी एक किटकनाशक 5 % निबोळी अर्क बरोवर वापरावे15 लीटर पंप साठी वापरावे या प्रकारे कमी खर्चात एकात्मीक किडनियंत्र दिर्ध कालीन करता येते.

 

भगवती सीड्स , चोपडा.

प्रा दिलीप शिंदे सर

9822308252

English Summary: Control of cotton sucking insects
Published on: 07 July 2022, 07:49 IST