ऊस पिकावर मर रोगांचा प्रादुर्भाव सध्या वाढत आहे. रोगांचा प्रादुर्भाव ओळखून नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात. जमिनीतील कांड्यास इजा झाल्यास तिथून बुरशीचा शिरकाव होऊन रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.
कोसी ६७१ आणि को ८६०३२ या ऊस जातीमध्ये महाराष्ट्रात या रोगाचे प्रमाण अत्यल्प आढळले आहे. मात्र एकेकाळी गुजरात राज्यामध्ये कोसी ६७१ या जातींमध्ये या रोगाच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. परिणामी तिथे या जातीच्या लागवडीस प्रतिबंध केला होता.
मर या रोगाचा प्रादुर्भाव जमिनीतील कांड्यामध्ये प्रथम होतो. रोगग्रस्त बेटातील उसाची शेंड्याकडील पाने निस्तेज दिसतात. हळूहळू पिवळी पडण्यास सुरुवात होते.
सुरुवातीला पानांच्या कडा करपतात. नंतर रोगाची तीव्रता वाढल्यानंतर रोगग्रस्त बेटातील पाने व ऊस वाळतात. ऊस शेंड्याकडून वाळत जातात.
शेतात जागोजागी अशी सुकलेली व वाळलेली बेटे दिसून येतात. वाळलेल्या उसाचा काप घेतल्यास पोकळ कांड्यात बुरशीची पांढरी वाढ आढळते. रोगामुळे ऊस पोकळ होऊन रसहीन बनतो. परिणामी उसाचे टनेज व साखरेच्या उताऱ्यातही घट येते.
महिंद्राचा हा ट्रॅक्टर सर्वात शक्तिशाली! आधुनिक आणि प्रगत सुविधांनी सुसज्ज
नवीन लागवडीपूर्वी ऊस बेण्यास बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. लागवड केलेल्या जमिनीतील पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था असावी. जमिनीतील कांड्या पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी क्लोरपायरिफॉस प्रति एकरी २ लिटर प्रति ४०० लिटर पाणी या प्रमाणे द्रावण करून आळवणी करावी.
शेतकऱ्यांनो बियाणे खरेदी करताना काळजी घ्या! कृषी विभागाकडून सव्वा कोटीचे बोगस बियाणे जप्त
अरबी समुद्रात मॉन्सून दाखल, लवकरच राज्यात दाखल होण्याची शक्यता..
ज्यादा दराने विक्री, बोगस खते विक्री करणे आले अंगलट, नगरमध्ये तीन कृषी केंद्रांचे परवाने निलंबित..
Published on: 05 June 2023, 02:29 IST