Agripedia

कमाल तापमानात घट होण्याची शक्यता असल्याने रस शोषण करणाऱ्या किडींच्या डीं संख्येत वाढ होण्याची शक्यता असते.

Updated on 25 January, 2022 10:31 PM IST

भारतीय हवामान खात्याने आज वर्तविलेल्या हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात दि. २५ व २६ जानेवारी रोजी तुरळक ठिकाणी शीत लहर येण्याची शक्यता आहे. तसेच दि. २७ ते २९ जानेवारी दरम्यान कोरडे हवामान

राहण्याची शक्यता आहे.

 

कृषि सल्ला:

कमाल तापमानात घट होण्याची शक्यता असल्याने रस शोषण करणाऱ्या किडींच्या डीं संख्येत वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे पिकांचे वाढीच्या अवस्थेमध्ये नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी बंधूंनी अशा वातावरणात प्रादुर्भाव

आढळून आल्यास योग्य त्या लेबल क्लेम शिफारसीत कीटकनाशकांचा/कीडनाशकांचा अचूक मात्रेत

फवारणीसाठी वापर करावा.

संक्षिप्त संदेश सल्ला:

किमान तापमानात घट होण्याची शक्यता असल्याने पिकांना हलके ओलीत संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी करावे. जेणेकरून थंडीमुळे पिकांना ईजा होणार नाही.

 

 पिक निहाय सल्ला

 

हरभरा

पिकामध्ये घाटे अळीचा नुकसानजन्य प्रादुर्भाव आढळून आल्यास शेतकरी बंधूंनी क्लोरँट्रॅनिलीप्रोल १८.५

एस.सी. २.५ मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ % एस.जी. ३ ग्रॅम किंवा क्विनॉल्फॉस २५ टक्के प्रवाही २०

मिली यापैकी एका कीटकनाशकाची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भुईमूग

उन्हाळी भुईमुंगाच्या पेरणीसाठी हेक्टरी १२५ किलो बियाणे वापरावे. तत्पूर्वी बियाण्याला बियाण्याला

ट्रा यकोडर्मा ५ ग्रॅम/ किलो बियाणे तसेच ऱ्हायझोबियम आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धकांची

प्रत्येकी २५० ग्रॅम १०-१५ किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. पेरणी रुंद वरंबा सरी (बी.बी.एफ.) पद्धतीने

पेरणी केल्यास फायदेशीर ठरते. भुईमुंगाची पेरणी शक्यतो २९ जानेवारी नंतर करावी, कारण येत्या पाच

दिवसांदरम्यान किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे बियाण्याच्या अंकुरणात बाधा येऊ

शकते.

ज्वारी

रब्बी ज्वारीचे पिक फुलोरावस्थेत असताना पिकाला पाण्याचा ताण बसू नये यासाठी ओलीत करावे. पाणी

देताना शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. ओलीत करताना शक्यतो संध्याकाळी किंवा

रात्रीच्या वेळी करावे , जेणेकरून थंडीमुळे पिकाला ईजा होणार नाही.

तूर

परिपक्व झालेल्या तूर पीकाची कापणी करून घ्यावी. मळणी केल्यानंतर तयार झालेल्या मालाची सुरक्षित

ठिकाणी साठवणूक करावी.

गहू

वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाला पिक फुलोरावस्थेत म्हणजेच ६५-७० दिवसांचे असताना ओलीत करणे

आवश्यक आहे. तसेच उशिरा पेरणी केलेल्या गव्हाला पीक कांडी धरण्याच्या अवस्थेत म्हणजेच ४५-५०

दिवसांचे असताना पाणी दिल्यास फायदेशीर ठरते. गहू पिकामध्ये मावा किडीच्या व्यवस्थापनासाठी

थायोमिथोक्झाम २५ टक्के डब्ल्यू.जी.१०-१५ ग्रॅम किंवा क्विनॉल्फॉस २५ टक्के प्रवाही ४० मिली प्रती १०

लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फळे आणि भाजीपाला पिक निहाय सल्ला:

कागदी लिंबू

जानेवारी महिन्यात लिंबूवर खैरया रोगाचा उपद्रव संभवतो. नियोजनाकरिता कॉपर ऑक्सिक्लोराईड

०.३ % (३० ग्रॅम) + स्ट्रेप्टोसायक्लीन १०० पिपिएम (१ ग्रॅम) १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

वांगे

वांगी या भाजीपाला पिकामध्ये फळे पोखरणाऱ्या अळ्यांच्या नियंत्रणासाठी एकरी ४-६ कामगंध सापळे

लावावेत. फळे पोखरणाऱ्या अळ्यांनी आर्थिक नुकसान पातळी गाठल्यास स्पिनोसॅड @ ३.० मिली प्रती

१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

मिरची

सध्याची हवामान परिस्थिती मिरची पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी फायदेकारक ठरू

शकते . म्हणून पिकावरील भुरी रोगाच्या नियंत्रणाकरिता मायक्लोब्यूटानील १० % डब्ल्यू.पी. @ १० ग्रॅम

प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पशुधन विषयक निहाय सल्ला:

गाय 

थंडीमुळे जनावरे आजारी पडू शकतात. विविध आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अशक्त जनावरांच्या

आहारात उर्जा निर्माण करण्यासाठी मक्याचा वापर करावा. तसेच जनावरांच्या आहारात प्रथिनांचा वापर

दोन टक्क्यांनी वाढवावा.

 

बकरा किंवा बकरी

 हिवाळ्यातील थंडीमुळे शेळ्यांना न्युमोनिया हा आजार होऊ शकतो.त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान

वाढते व त्यांचे खाणे –पिणे कमी होते. यासाठी शेळ्यांचे 

 

थंडीपासून संरक्षण करावे.

कुकुटपालन

विषयक कुकुटपालन विषयक निहाय सल्ला

पक्षी थंडीमध्ये अंडी देणाऱ्या कोंबकों ड्यांना निर्जंतुकीकरण केलेले स्वच्छ व कोमट पाणी प्यायला द्यावे.

यामुळे शरीरातील तापमान योग्य प्रमाणात ठेवण्यास मदत होते.

 

संकलन -मनेश पुंडलिकराव यदुलवार ,

कृषी हवामान तज्ञ

जिल्हा कृषी हवामान केंद्र

कृषी विज्ञान केंद्र ,बुलढाणा

डॉ.पं.दे.कृ.वि., अकोला.

English Summary: Comming five day's weather and crop advise
Published on: 25 January 2022, 10:31 IST