Agripedia

सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यामधून शेतकऱ्यांना दिलासा मिळतो. आता कृषी विभागाने महत्वाची माहिती दिली आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसाठी यावर्षीच्या रब्बी हंगामासाठी 9 लाख 43 हजार 655 टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली आहे.

Updated on 11 October, 2022 3:19 PM IST

सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यामधून शेतकऱ्यांना (farmers) दिलासा मिळतो. आता कृषी विभागाने महत्वाची माहिती दिली आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसाठी यावर्षीच्या रब्बी हंगामासाठी 9 लाख 43 हजार 655 टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली आहे.

महत्वाचे म्हणजे याला अनुसरून 6 लाख 29, 961 टन युरिया, डीएपी, एमओपी, एनपीके, एसएसपी आदी खतांचे आवंटन (Fertilizer Allocation) मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून (Agriculture Department) देण्यात आली.

लातूर कृषी विभागाच्या माहितीनुसार या विभागाअंतर्गत लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यांसाठी 5 लाख 40 हजार 249 रासायनिक खताची मागणी करण्यात आली. तर 3 लाख 35 हजार 531 टन रासायनिक खताचे आवंटन पाचही जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले.

दिलासादायक! कांद्याच्या बाजारभावात सुधारणा, मिळतोय सर्वाधिक भाव; जाणून घ्या

30 सप्टेंबर 2022 अखेर विभागातील पाचही जिल्ह्यात एक लाख 72 हजार 601 टन रासायनिक खतांचा साठा शिल्लक होता ऑक्टोबर 2022 अखेर 50336 टन आवंटन मंजूर करण्यात आले. ऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसापर्यंत पाचही जिल्ह्यात 1 लाख 70,127 टन रासायनिक खतसाठा उपलब्ध होता.

खत प्रकार मागणी मंजूर टन

युरिया 153680, 108510 टन

डीएपी 104500, 49171 टन

एमओपी 46997, 14871 टन

एनपिके 173371, 105999 टन

एसएसपी 61700, 56988 टन

मिरची उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; प्रतिक्विंटलला मिळतोय तब्बल १८ हजार ५०० रुपये दर

औरंगाबाद विभाग खत, मागणी, मंजूर टन

युरिया 133432, 95720 टन

डीएपी 54122,  22890 टन

एमओपी 24141,  9250 टन

एनपिके 169974, 114840 टन

एसएसपी 21737, 51730 टन

महत्वाच्या बातम्या 
महत्वाची बातमी! LIC आयडीबीआय बँकेतील आपला 60.72 टक्के हिस्सा विकणार
धक्कादायक! गेल्या 9 महिन्यात 756 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
मासिक पाळी उशिरा का येते? जाणून घ्या नेमकं कारण...

English Summary: Comforting farmers Demand for 9 lakh tonnes fertilizers Rabi
Published on: 11 October 2022, 03:11 IST