Agripedia

देशातील बहुतांश राज्यांमध्ये गव्हाची काढणी संपली असून पावसाळाही सुरू होण्याच्या मार्गावर आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यापासून देशात भाताची पेरणी सुरू होईल. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी भातशेतीबरोबरच मत्स्यशेती केल्यास आपले उत्पन्न दुप्पट होऊ शकते.

Updated on 05 May, 2023 5:09 PM IST

देशातील बहुतांश राज्यांमध्ये गव्हाची काढणी संपली असून पावसाळाही सुरू होण्याच्या मार्गावर आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यापासून देशात भाताची पेरणी सुरू होईल. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी भातशेतीबरोबरच मत्स्यशेती केल्यास आपले उत्पन्न दुप्पट होऊ शकते.

आपल्या देशात भातशेतीबरोबरच मत्स्यपालन अनेक वर्षांपासून होत आहे. भातशेतीत मत्स्य व्यवसाय केल्याने झाडांना सर्व आवश्यक पोषक तत्वे मिळतात. सोबतच यामुळे मासे भातशेतीतील किडे खातात. मत्स्यशेतीमुळे भातपिकांवर कीटकनाशक फवारणीची अजिबात गरज नाही. ज्यामुळे शेतकऱ्यांचा खर्चही कमी होतो.

भाताच्या शेतात माशांच्या संगोपनासाठी शेतात पाण्याची पुरेशी व्यवस्था असायला हवी. भातशेतीसाठी भरपूर पाणी लागते, अशा परिस्थितीत मासे पाळले तर शेतात सतत पाण्याची गरज भासते. यासोबतच भातासोबत चांगल्या प्रतीचे मासे पाळा हेही लक्षात ठेवा, जेणेकरून पिकाला कोणतीही हानी होणार नाही.

कारखान्यांच्या साखर विक्री दरात दोनशे रुपयांनी वाढ, कारखान्यांना दिलासा...

अन्यथा अनेक मासे भाताची झाडे उपटून टाकतात आणि बिया खाऊन पीक नष्ट करतात. शेतकरी बांधव भातशेतीमध्ये कॅटफिश, तिलापिया, कार्प आणि फिंगरलिंग्जचे उत्पादन करू शकतात. भातशेतीबरोबरच मत्स्यशेतीमुळे जमिनीची उत्पादकता वाढते, यासोबतच शेतकऱ्यांचे उत्पन्नही दुप्पट होते.

साखर उत्पादनात महाराष्ट्राला डंका! पटकवला जगात तिसरा क्रमांक..

एक हेक्टर शेतात भातासह मत्स्यशेती करून शेतकरी ६० ते ७० हजार रुपये सहज कमवू शकतो. यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी असा प्रयोग केल्यास त्यांना अधिकचे पैसे मिळणार आहेत. यासाठी वेगळा खर्च देखील येणार नाही.

ओमायक्रॉनपासून निर्माण झालेला नवीन कोरोना अत्यंत गंभीर, मोठी माहिती आली समोर
ब्रेकिंग! शरद पवार यांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला, मुंबईत मोठ्या घडामोडी..
पुण्यात चार दिवस पावसाची शक्यता, शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत

English Summary: Combine fish farming with paddy farming, get good income and get double income
Published on: 05 May 2023, 05:09 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)