Agripedia

वर्षभर सातत्याने, दर्जेदार आणि जास्तीचे उत्पादन मिळवण्यासाठी हरितगृहामध्ये भाजीपाला किती घेतले जातात.महाराष्ट्रामध्ये रंगीत ढोबळी मिरची हरितगृहा मध्ये घेण्याचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. या लेखात आपण रंगीत ढोबळी मिरचीचे हरितगृहामध्ये लागवड व्यवस्थापन विषयी माहिती घेऊ. रंगीत ढोबळी मिरची साठी लागणारे वातावरण: रंगीत ढोबळी मिरची लागवडीसाठी हरितगृहामधील तापमान किमान 18 अंश सेल्सिअस व कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आवश्याक असते. सापेक्ष आद्रता 50 ते 75 टक्यांया पर्यंत असते फारच महत्वाचे आहे. हे सगळे प्रमाण हरितगृहामध्ये नियंत्रित करता येते.

Updated on 01 October, 2021 5:17 PM IST

वर्षभर सातत्याने, दर्जेदार आणि जास्तीचे उत्पादन मिळवण्यासाठी हरितगृहामध्ये भाजीपाला किती घेतले जातात.महाराष्ट्रामध्ये रंगीत ढोबळी मिरची हरितगृहा मध्ये घेण्याचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. या लेखात आपण रंगीत ढोबळी मिरचीचे हरितगृहामध्ये लागवड व्यवस्थापन विषयी माहिती घेऊ.

रंगीत ढोबळी मिरची साठी लागणारे वातावरण:

 रंगीत ढोबळी मिरची लागवडीसाठी हरितगृहामधील तापमान किमान 18 अंश सेल्सिअस व कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस  आवश्‍यक असते. सापेक्ष आद्रता 50 ते 75 टक्‍क्‍यांपर्यंत असते फारच महत्वाचे आहे. हे सगळे प्रमाण हरितगृहामध्ये नियंत्रित करता येते.

 ढोबळी मिरचीवर तापमानाचा परिणाम

  • जरतापमान 10 अंशसेल्सिअसपेक्षाकमीझालेवधुके पडले तर पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.
  • तापमान 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास फलधारणा होत नाही फळेपोसतनाहीत.
  • शेतामध्ये ढोबळी मिरची लागवड ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर महिन्यात करावी.

आवश्यक जमीन

 जमीन चांगली कसदार व सुपीक असावी. तसेच पाण्याचा उत्तम निचरा होणारी व सामू सहा ते सात च्या दरम्यान असावा. जमिनीची खोली एक ते दीड मीटर असावी. त्यासाठी मध्यम ते भारी काळी जमीन या पिकास चांगली राहते.

 रंगीत ढोबळी मिरचीचे रोप निवडीचे निकष

  • रंगीतढोबळीमिरचीचापर्यायनिवडल्यासलालवपिवळ्यारंगाचेप्रमाणसर्वसाधारणपणे65 टक्के लाल 35% पिवळा असे ठेवावे.
  • साधारणपणे लाल रंगाच्या मिरचीला अधिक मागणी असते.
  • स्वतः रोपे तयार करणार असल्यास लागवडीपूर्वी साधारणपणे एक महिना आधी योग्य त्या आकाराच्या शेडनेटमध्ये रंगानुसार बियांची रोपे ट्रेमध्ये तयार करावीत.

 रंगीत ढोबळी मिरचीची रोपे तयार करणे

  • रोपे तयार करण्यासाठी निवडलेली जागा चांगली स्वच्छ करावी. त्याचप्रमाणे जमीन चांगली नांगरून कुळवून भुसभुशीत करावी.तीन मीटर लांब, एक मीटर रुंद आणि 15 सेंटिमीटर उंचीचे गादीवाफे तयार करावेत. गादीवाफ्यावर चांगले कुजलेले शेणखत पसरावे व मातीत मिसळावे.
  • वाक्यावर दोन सेंटीमीटर खोलीच्या दहा सेंटीमीटर अंतरावर रुंदीला समांतर रेघा ओढून घ्याव्यात. त्यात प्रथम फोरेट 10 जी हे कीटकनाशक दहा ग्रॅम प्रति वाफेवर टाकून नंतर बियाणे पेरणी करावी.
  • प्रति वाफा दहा ग्रॅम बियाणे वापरावे. एक हेक्‍टर ढोबळी मिरची लागवडीसाठी सुमारे 400 ते 500 ग्रॅम बियाण्याची  गरज असते.
  • रोपे सहातेआठ आठवड्यांची झाल्यावर ती पुन्हा लागवडीस तयार होतात.

 लागवडीच्या वेळी रोपे अशी असावी.

  • रोपांचे य चार ते पाच आठवड्यांचे असावे.
  • रोपांची उंची 16 सेंटीमीटर 23 सेंटिमीटर असावी.
  • रोपांवर ती चार ते सहा पाने असावीत.

रंगीत ढोबळी मिरचीची लागवड

1-रंगीत ढोबळी मिरचीच्या लागवडीसाठी गादीवाफे यांचा वापर करावा.

2- गादीवाफा 90×40×50 सेंटिमीटर आकाराचा असावा. या वाक्यावर दोन ओळीत झिगझ्यागपद्धतीने लागवड करावी.

 लागवडीचे अंतर

  • दोनरोपांमधीलअंतर 45 सेंटिमीटरअसावे.
  • दोन ओळींमध्ये अंतर पडण्यासाठी मीटर असावी.
  • रोपांची घनता 2.5 रोपे प्रति चौरस मीटर असावी.

मशागतीच्या पद्धती

 रंगीत ढोबळी मिरचीचे पीक हे दहा महिन्यांचे असते त्यामुळे या कालावधीमध्ये विविध मशागतीच्या पद्धतींचा अवलंब केला जातो. ते आपण जाणून घेऊ.

झाडाला आधार देणे

 1-मिरची पिकाची उंची दहा फुटांपर्यंत जाते हे पीक आपले आणि फळांचे वजन पेलू शकत नाही. त्यामुळे झाडाला आधार देणे गरजेचे असते.

 

2- एका गादीवाफ्यावर साधारणपणे तीन मीटर उंचीवर तीन गॅलवनाईझआयर्न च्या तारा 12 गेज जाडीच्या वाफ्याला  समांतरपणे बांधून घ्याव्यात. तारा बांधल्यानंतर लागवड करावी.

  • लागवडझाल्यानंतरलवकरातलवकरएकाझाडासाठीचारयासंख्येतप्लॅस्टिकदोऱ्यातारेला बांधून खाली सोडाव्यात. नंतर त्या झाडाला बांधाव्यात.

रोपांचा शेंडा खुडणे

 लागवडीनंतर 21 दिवसांनी रोपाचा शेंडा खुडावा. खुडण्यासाठी धारदार कात्री चा वापर करावा. रोप आवर्ती चार-पाच पाने ठेवून शेंडा खुडला जातो. त्यामुळे मिरचीला तीन ते चार फुटवे फुटतात. त्यांना आधारासाठी सोडलेल्या दोऱ्या बांधून घ्यावेत.

रंगीत ढोबळी मिरचीची काढणी

 मिरचीचे काढणी प्रामुख्याने जाती व रंगानुसार वेगवेगळ्या वेळी सुरू होते. हा कालावधी 90 ते 100 दिवस असा असतो. काढणी करताना दूरच्या बाजारपेठेत पाठव त्यांना मिरचीला 5% रंग आल्यानंतरकाढणी करावी. तर जवळच्या बाजारपेठेसाठी रंग येण्याचे प्रमाण थोडे अधिक असले तरी चालू शकते

 

English Summary: colour chilli cultivation in shednet and management
Published on: 01 October 2021, 05:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)