भारतात भाजीपाला पिकाची मागणी हि मोठ्या प्रमाणात बनलेली असते, म्हणुन शेतकरी बांधव भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करतात आणि त्यापासून चांगली कमाई देखील करतात. अशाच भाजीपाला पिकापैकी एक आहे कारल्याचे पिक, कारल्याची लागवड हि संपूर्ण भारतात थोड्या मोठ्या प्रमाणात सर्वत्र केली जाते आणि शेतकरी बांधव कारल्याच्या पिकातून चांगले उत्पन्न देखील कामवितात. कारल्याची मागणी हि नेहमी बनलेली असते शिवाय कारल्यासाठी कमी जागेची आवश्यकता असते तसेच कमी वेळेत कारले काढणीसाठी तयार होते त्यामुळे याच्या लागवडीतून शेतकरी बांधव चांगली कमाई करू शकतात.
आज आपण कारल्याच्या लागवडिविषयी महत्वाची माहिती जाणुन घेणार आहोत. चला तर मग जाणुन घेऊया कारल्याच्या लागवडिविषयी.
कारले पिकाविषयीं अल्पशी माहिती
भारतात कारल्याची लागवड हि मोठया प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रात कारल्याची लागवड हि चांगली उल्लेखनीय आहे. महाराष्ट्रात जवळपास साडे चारशे हेक्टर क्षेत्रावर कारल्याची लागवड केली जाते. यावरून कारल्याच्या लागवडीत असलेले महाराष्ट्राचे महत्व आपल्याला समजलंच असेल. कारले हे एक वेलीवर्गीय पिक आहे याची मागणी हि विदेशात देखील मोठ्या प्रमाणात असते. कारले मध्ये अनेक औषधी तत्वे आढळतात त्यामुळे याचे सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर लोक नेहमी देत असतात.
कारल्याची लागवड हि खरीप हंगामात मोठया प्रमाणात केली जाते शिवाय उन्हाळी हंगामात देखील कारले हे लावले जातात. कारले पिकातून दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी याची लागवड उष्ण व दमट हवामान असलेल्या प्रदेशात करण्याचा सल्ला हा दिला जातो. या पिकाच्या चांगल्या विकासासाठी तापमान हे किमान 20 अंश सेंटीग्रेड आणि कमाल 35 ते 40 अंश सेंटीग्रेड दरम्यान योग्य असल्याचे सांगितले जाते.
कारल्याच्या सुधारित जाती
»कोईम्बतूर लॉग: कारल्याची हि एक सुधारित जात आहे. कारल्याच्या या जातीची कारले हि पांढरी आणि लांबट असतात. या जातीची लागवड हि आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जाते.
साधारणता या जातीच्या कारल्याची लागवड हि खरीप हंगामात केली जाते. या जातीच्या कारल्याची लागवड करून शेतकरी बांधव चांगली कमाई करू शकतात.
»अर्का हरित: हि देखील कारल्याची एक सुधारित जात आहे. कारल्याच्या या जातीची कारले हे आकर्षक, लहान, मध्यम, फुगीर, हिरव्या रंगाची असतात. या जातीच्या कारले हे चवीला चांगले असतात तसेच कारल्यामध्ये बिया ह्या कमी असतात. या जातीपासून देखील चांगले उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. महाराष्ट्रात या कारल्याची लागवड हि केली जाऊ शकते.
Published on: 13 November 2021, 03:35 IST