भारतात मसाला पदार्थला कायम मागणी असते. भारतातील प्रत्येक स्वयंपाकगृहात लवंग हा असतोच लवंग शिवाय कुठलाच मसाला बनू शकत नाही. आज आपण ह्याच महत्वाच्या मसालाच्या लागवडिविषयी जाणुन घेणार आहोत. लवंग हे एक सदाबहार प्रकारची वनस्पती आहे. हिची लागवड वर्षभर केली जाते. शेतकरी लवंग लागवडीतून चांगली बक्कळ कमाई करू शकतात. लवंगची लागवड भारताच्या अनेक भागात केली जाते, महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात लवंग लागवड केली जाते.
महाराष्ट्रातील स्वर्ग म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या कोकणात विविध प्रकारच्या मसाला पदार्थांची लागवड केली जाते. ह्या मसाल्या पदार्थात लवंगचा देखील समावेश आहे. कोकण हे मसाला पदार्थांच्या लागवडीचे माहेरघर म्हणुन ओळखले जाते. शेतकरी मित्रांनो आज आपण लवंग लागवडिविषयी जाणुन घेणार आहोत.
लवंग लागवडीविषयी अल्पशी माहिती
लवंगची लागवड मसाला पदार्थ म्हणुन केली जाते. लवंगच्या वनस्पतीचे फळ म्हणजेच लवंग हे मसाला म्हणुन वापरले जाते. महाराष्ट्रातील कोकणचे हवामान हे लवंग पिकासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. कोकण कृषी विद्यापीठाने विद्यापीठाअंतर्गत विविध संशोधन केंद्रांवर लवंगाची लागवड केली आहे. आणि लवंग लागवड ही कोकणात समाधानकारक झाल्याचे दिसून आले आहे. लवंग लागवडीचे यश बघता कोकण कृषी विद्यापीठ तसेच कोकणातील जिल्हा परिषद शेतकऱ्यांना लवंग लागवडीसाठी अनेक प्रकल्प देत आहेत. आणि त्यासाठी शासनाकडून लवंगाची झाडे वितरीत केली जात आहेत. लवंग मसाले पदार्थात वापरला जातो तसेच लवंग पासुन बनवलेल्या तेलाचा वापर खाद्यपदार्थांना चव देण्यासाठी केला जातो.
लवंगचा वापर विविध प्रकारच्या औद्योगिक उत्पादनांमध्ये केला जातो. लवंगाचे तेल टूथपेस्ट, दातदुखीचे औषध, पोटाच्या आजारांवर औषध म्हणून वापरले जाते. लवंगच्या ह्या औषधी गुणधर्मामुळे तसेच औद्योगिक वापरामुळे ह्याची मागणी वर्षभर कायम असते आणि शेतकरी ह्याची लागवड करून चांगली कमाई देखील करू शकतात.
लवंग लागवडीसाठी उपयुक्त जमीन आणि हवामान
लवंगची लागवड ही भारतात बऱ्यापैकी केली जाते. लवंग लागवड भारताच्या त्या भागात केली जाऊ शकते जिथे हवामान उष्ण आणि अतिउष्ण आहे. लवंग पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि पिक चांगले स्वस्थ येण्यासाठी लवंगच्या झाडांना उष्णकटिबंधीय हवामान आवश्यक असते. अनेक कृषी वैज्ञानिक लवंग रोपाच्या वाढीसाठी 10 अंश सेंटीग्रेड तापमान योग्य असल्याचे सांगतात आणि लवंग झाडाच्या ऐन वाढीच्या अवस्थेत 30 ते 35 अंश सेंटीग्रेड तापमान योग्य असते. परंतु लवंग लागवड ही थंड आणि अतिवृष्टी असलेल्या ठिकाणी करता येणे शक्य नाही. थंड हवामान लवंग पिकास मानवत नाही, अशा हवामाणात लवंग लागवड करता येणे शक्य नाही.
लवंग पिकासाठी पाणी व्यवस्थापन
लवंग पिकाला पाणी व्यवस्थापन योग्य रीत्या करणे गरजेचे असते. जर आपणही लवंग लागवड करण्याच्या बेतात असाल तर लवंग लागवड केल्यापासून जवळपास 4 ते 5 वर्षे पाण्याची गरज असते.
सुरवातीच्या ह्या दिवसात लवंग पिकाला सतत पाणी भरावे लागते, कारण लवंग पिकाला ओलावा लागतो जमिनीत ओलावा चांगला असला की लवंगची वाढ चांगली होते आणि उत्पादनात वाढ होते. लवंग पिकाला उन्हाळी हंगामात सतत पाणी भरावे लागते कारण जमिनीत ओलावा टिकवून ठेवणे महत्वाचे ठरते.
पाणी भरताना घ्यावयाची काळजी
शेतकरी बांधवांनो लवंग पिकाला पहिल्या वर्षी सावली द्यावी लागते. लवंग पिकाला पाणी भरताना थोडी काळजी घेणे महत्वाचे आहे कारण लवंग पिकाला ओलावा तर लागतोच पण त्यासोबतच दलदल होणार नाही ह्याची देखील काळजी घ्यावी लागते. ह्यासाठी कृषी वैज्ञानिक शेतकऱ्यांना सल्ला देतात की, लवंग पिकाला एकदाच जास्त पाणी न भरता थोड्या थोड्या प्रमाणात अनेकदा पाणी द्यावे. ह्यामुळे जमिनीत दळदल होणार नाही आणि दलदल मुळे होणारे रोग टाळता येतील.
लवंग पिकाची काढणी आणि उत्पादन
लवंग लागवडीत सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे काढणीचाच आहे. जर समजा दोन वर्षांची रोपे लावणीसाठी वापरली तर लवंगाच्या झाडाला लागवडीनंतर 4 ते 5 वर्षांनी फुले येण्यास सुरवात होते.
लवंग पिकाला दोन हंगामात फुले येतात. पहिले आणि सर्वात महत्वाचे पीक फेब्रुवारी ते मार्च दरम्यान तयार होते. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात दुसरे पिक तयार होते आणि ह्यापासून थोडेच उत्पन्न मिळते. लवंगाच्या कळ्या नवीन पानांवर दिसतात. उगवल्यानंतर 5 ते 6 महिन्यांत कळ्या बनन्यास तयार होतात म्हणजे लवंगची फळे तयार होण्यास सुरवात होते. एका घड मधील सर्व कळ्या म्हणजेच लवंग एकाच वेळी काढण्यासाठी तयार होत नाहीत. त्या वेगवेगळ्या वेळी काढणीसाठी तयार होतात.
Published on: 13 October 2021, 04:24 IST