Agripedia

शेवंती हे फुल गुलाब नंतर सगळ्यात महत्त्वाचे फुल आहे. शेवंती या फुलाला फुलांची राणी असे म्हणतात कारण या फुलाचा रंग,आकार आणि उमलण्याची पद्धतइतर फुलांपेक्षा फार वेगळी आहे.चीन के शेवंतीचे उगमस्थान असले तरी शेवंतीचा जगभर प्रसार जपानमधून झाला आहे. या लेखात आपण शेवंती लागवडीच्या तंत्रज्ञानाविषयी माहिती घेऊ.

Updated on 22 September, 2021 7:26 PM IST

 शेवंती हे फुल गुलाब नंतर सगळ्यात महत्त्वाचे फुल आहे. शेवंती या फुलाला फुलांची राणी असे म्हणतात कारण या फुलाचा रंग,आकार आणि उमलण्याची पद्धतइतर फुलांपेक्षा फार वेगळी आहे.चीन के शेवंतीचे उगमस्थान असले तरी शेवंतीचा जगभर प्रसार जपानमधून झाला आहे. या लेखात आपण शेवंती लागवडीच्या तंत्रज्ञानाविषयी माहिती घेऊ.

 शेवंतीची लागवड तंत्रज्ञान

  • शेवंती साठी जमिनीची निवड

या पिकासाठी योग्य जमिनीची निवड नेहमीच फायदेशीर ठरते.ज्या जमिनीचा सामू साडेसहा ते सात आहे,अशी जमीन लागवडीसाठी चांगली असते. मध्यम हलकी,पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तसेचभरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी. जर पावसाळ्यात जास्त काळ पाणी साठवून राहत असेलतर शेवंती पिकाचे नुकसान होऊ शकते.म्हणून पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी.

  • लागणारे हवामान

शेवंती हे लहान दिवसांचे पिक आहे.म्हणजे शेवंतीला फुले येण्यासाठी लहान दिवस व कमी तापमानाची आवश्‍यकता असते.सुरुवातीला भरपूर सूर्यप्रकाश व मोठा दिवस असणे आवश्यक आहे. शेवंतीच्या वाढीसाठी वीस ते तीसअंश सेंटिग्रेड तर फुले येण्यासाठी 10 ते 17 अंश सेंटिग्रेड तापमानाची आवश्‍यकता असते.हवामानात जास्त आद्रता व भरपूर पडणारा पाऊस या पिकाला मानवतनाही.

3-शेवंती लागवडीपूर्वी जमिनीची तयारी कशी करावी?

 लागवड करण्याआधी सर्वप्रथम जमीन उभी-आडवी नांगरूनव कुळवून भुसभुशीत करावी. जमीन तयार करताना हेक्‍टरी 25 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. जमिनीच्या उताराला आडव्या 60 सेंटिमीटर अंतरावर सऱ्या सोडून वाफे तयार करावेत.लागवडीसाठी मागील हंगामातील शेवंती पिकाच्याकाश्यावापराव्यात. लागवड ही सरीच्या दोन्ही बाजूस 30 सेंटिमीटर अंतरावरबगलेत करावी.लागवड शक्‍यतो दुपारचं ऊन कमी झाल्यावर करावी.म्हणजे रोपांची मर होत नाही.

4-शेवंती पिकाची जाति

 जगात शेवंतीच्या पंधरा ते वीस हजार जाती असूनभारतात सुमारे पाचशे जाती आढळतात.महाराष्ट्रात सोनाली तारा, बग्गी,झीप्री,राजा, पांढरी व पिवळी रेवडी, शरदमाला, बंगळुर, रतलाम त्याची जाती लागवडीखालील आहे.

5- आवश्यक खते

 शेवंतीच्या उत्तम वाढीसाठी आणि दर्जेदार उत्पादनासाठी लागवडीपूर्वी जमीन तयार करताना हेक्‍टरी 25 ते 30 टन शेणखत जमिनीत मिसळावे.लागवडीच्या वेळेस फॅक्टरी 150:200:200 किलो अनुक्रमे नत्र, स्फुरद, पालाश तर लागवडीनंतर एक ते दीड महिन्याने दीडशे किलो नत्र हेक्‍टरी याप्रमाणे द्यावे.

6- पाणी व्यवस्थापन

लागवड उन्हाळी हंगामात करावयाची असल्याने पिकास पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी लागते.लागवडीपासून पाऊस सुरू होईपर्यंतपाच ते सात दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.त्यानंतर गरजेप्रमाणे पाणी देत रहावे. फुले येण्याच्या व फुलण्याच्या काळात पाण्याचा ताण पडणार नाही याची अवश्य काळजी घ्यावी.

हिवाळी हंगामात 12 ते 15 दिवसांनी जमिनीच्या मगदुराप्रमाणेगरजेप्रमाणे पाणी द्यावे.गरजेपेक्षा जास्त पाणी देऊ नये.जास्त पाणी झाल्यास मूळकूज रोग होतो.

7- आंतरमशागत

वेळोवेळी निंदणी करून पीक तणमुक्त ठेवावे.निंदनी मुळे जमीन भुसभुशीत राहून पिकांची जोमदार वाढ होते. झाडांची वाढ मर्यादित राहण्यासाठी आणि अधिक उत्पादनासाठी शेवंतीच्या झाडाचे शेंडे खुडण्याचा प्रघात आहे. शेंगा खुडण्याचे काम लागवडीनंतर साधारण चौथ्या आठवड्यानंतर करावे. शेंडा खुडन्याने अधिक फुटवे फुटून फुलांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदतहोते.

 

English Summary: chrysanths cultivation management and techniqe
Published on: 22 September 2021, 07:26 IST