Agripedia

शेवंती हे फूल गुलाब नंतर सगळ्यात महत्त्वाचे फुल आहे. शेवंती या फुलाला फुलांची राणी असे म्हणतात. कारण या फुलाचा रंग, आकार आणि उमलण्याची पद्धत इतर फुलांपेक्षा फार वेगळी आहे. चिनशेवंतीचे उगमस्थान असले तरी सेवन तिचा जगभर प्रसार जपानमधून झालेला आहे. या लेखात आपण शेवंतीचे लागवडीच्या तंत्रज्ञानाविषयी माहिती घेऊ.

Updated on 08 March, 2022 2:11 PM IST

शेवंती हे फूल गुलाब नंतर सगळ्यात महत्त्वाचे फुल आहे. शेवंती या फुलाला फुलांची राणी असे म्हणतात. कारण या फुलाचा रंग, आकार आणि उमलण्याची पद्धत इतर फुलांपेक्षा फार वेगळी आहे. चिनशेवंतीचे उगमस्थान असले तरी सेवन तिचा जगभर प्रसार जपानमधून झालेला आहे. या लेखात आपण शेवंतीचे लागवडीच्या तंत्रज्ञानाविषयी माहिती घेऊ.

  • शेवंतीची लागवड व तंत्रज्ञान :
  • शेवंती साठी जमिनीची निवड :- या पिकासाठी योग्य जमिनीची निवड नेहमीच फायदेशीर ठरते. ज्या जमिनीचा सामू साडेसहा ते सात आहे.अशी जमीन लागवडीसाठी चांगली असते. मध्यम हलकी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन तसेच भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी. जर पावसाळ्यात जास्त काळ पाणी साठवून राहत असेल तर शेवंती पिकाचे नुकसान होऊ शकते. म्हणून पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी.
  • लागणारे हवामान :- शेवंती हे लहान दिवसाचेपीक आहे. म्हणजे शेवंती ला फुले येण्यासाठी लहान दिवस व कमी तापमानाची गरज असते. सुरुवातीला भरपूर सूर्यप्रकाश व मोठा दिवस असणे आवश्यक आहे. शेवंतीच्या वाढीसाठी 20 ते 30 अंश  सेंटीग्रेड तर फुले येण्यासाठी 10 ते 17 अंश सेंटिग्रेड तापमानाची आवश्‍यकता असते. हवामानात जास्त आद्रता व भरपूर पडणारा पाऊस या पिकाला मानवत नाही.
  • शेवंती लागवडीपूर्वी जमिनीची तयारी कशी करावी ?

लागवड करण्याआधी  सर्वप्रथम जमीन उभी - आडवी नांगरून व कुळवून भुसभुशीत करावी. जमीन तयार करताना हेक्‍टरी 25 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. जमिनीच्या उताराला आडव्या 60 सेंटिमीटर अंतरावर सऱ्या सोडून वाफे तयार करावेत लागवडीसाठी मागील हंगामातील शेवंती पिकाच्या काश्यावापराव्यात. लागवडही सरीच्या दोन्ही बाजूस 30 सेंटीमीटर अंतरावर बगलेत करावी.लागवड शक्‍यतो दुपारचं ऊन कमी झाल्यावर करावी. म्हणजे रोपांची मर होत नाही.

  • शेवंती पिकाच्या जाती :- जगात शेवंतीच्या 15 ते 20 हजार जाती असून भारतात सुमारे 500 जाती आढळतात. महाराष्ट्रात सोनाली तारा, बग्गी, झिप्री, राजा, पांढरी व पिवळी रेवडी शरद माला,बंगळूर रतलाम त्यांच्या जाती लागवडीखाली आहे.
  • आवश्यक खते :- शेवंतीच्या उत्तम  वाढीसाठी आणि दर्जेदार उत्पन्नासाठी लागवडीपूर्वी जमीन तयार करतानाहेक्‍टरी 25 ते 30 टन शेणखत जमिनीत मिसळावे. लागवडीच्यावेळी फॅक्टरी 150:200:200 किलो अनुक्रमे नत्र स्फुरद व पालाशतर लागवडीनंतर एक ते दीड महिन्यांनी दीडशे किलो नत्र हेक्‍टरी याप्रमाणे द्यावे.
  • पाणी व्यवस्थापन :- लागवड उन्हाळी हंगामात करायची असल्यामुळे पिकास पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावीलागते. लागवडीपासून पाऊस सुरू होईपर्यंत पाच ते सात दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. त्यानंतर गरजेप्रमाणे पाणी देत राहावे. फुले येण्याच्या वफुलण्याच्याकाळातपाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.

हिवाळी हंगामात बारा ते पंधरा दिवसांनी जमिनीच्या मगदुराप्रमाणे गरजेप्रमाणे पाणी द्यावे. गरजेपेक्षा जास्त पाणी देऊ नये. जास्त पाणी झाल्यास मूळकूज रोग होतो.

  • आंतर मशागत :- वेळोवेळी निंदणी करूनपीक तणमुक्त ठेवावे. निंदनी मुळे जमीन भुसभुशीत राहून पिकांची जोमदार वाढ होते. झाडांची वाढ मर्यादित राहण्यासाठी आणि अधिक उत्पादनासाठी शेवंती च्या झाडाचे शेंडे खुडण्याचा प्रघात आहे. शेंगा खुडण्याचे काम लागवडीनंतर साधारण चौथ्या आठवड्यानंतर करावे. शेंडा खुडण्यानेआणि अधिक फुटवे फुटून फुलांच्या उत्पादनात वाढहोण्यास मदत होते.
English Summary: chrysanthemum cultivation os very profitable and crucial for farmer
Published on: 08 March 2022, 02:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)