Agripedia

माती परीक्षणानुसार खत नियोजन करावे. मातीमध्ये ज्या अन्नद्रव्याची कमतरता असेल त्याच अन्नद्रव्यासाठी खत नियोजन करावे.

Updated on 18 June, 2022 7:45 PM IST

माती परीक्षणानुसार खत नियोजन करावे. मातीमध्ये ज्या अन्नद्रव्याची कमतरता असेल त्याच अन्नद्रव्यासाठी खत नियोजन करावे.नत्राचा पुरवठा करण्यासाठी निम कोटेड युरियाचा वापर करावा.मातीमध्ये स्फुरद कमतरता असल्यास, पाण्यात विरघळणार्‍या स्फुरद युक्त खतांचा वापर करावा.कमी कालावधीच्या पिकांना त्वरित अन्नद्रव्य उपलब्ध होण्यार्‍या खतांचा आणि जास्त कालावधीच्या पिकांना हळू-हळू अन्नद्रव्य उपलब्ध होतील अशा खतांचा वापर करावा. जास्त कालावधीच्या पिकांना साइट्रेट विरघळणारे तर कमी कालावधीच्या पिकांना फॉस्फेटिक खतांचा वापर करावा.

शेतात कोणते पिक घेणार आहेत, त्या आधी त्या शेतात कोणते पिक घेतले होते तसेच त्या पिकात कोणत्या खतांचा किती प्रमाणात वापर केला गेला होता. या गोष्टींचा विचार करून खतांचे नियोजन करावे.ओलसर कमी असणार्‍या जमिनीत नायट्रेटयुक्त किंवा नायट्रोजनधारी खतांचा तर सिंचन आणि उच्च पर्जन्य भागात अमोनिकल किंवा अमाईडयुक्त नायट्रोजनधारी खतांचा वापर करावा.ओलसर भागात कॅल्शियम तसेच मॅग्नेशियम युक्त खतांचा वापर करावा. कारण अशा भागात मातीत याची कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची कमतरता असते.

मातीमध्ये स्फुरद कमतरता असल्यास, पाण्यात विरघळणार्‍या स्फुरद युक्त खतांचा वापर करावा.कमी कालावधीच्या पिकांना त्वरित अन्नद्रव्य उपलब्ध होण्यार्‍या खतांचा आणि जास्त कालावधीच्या पिकांना हळू-हळू अन्नद्रव्य उपलब्ध होतील अशा खतांचा वापर करावा. जास्त कालावधीच्या पिकांना साइट्रेट विरघळणारे तर कमी कालावधीच्या पिकांना फॉस्फेटिक खतांचा वापर करावा.शेतात कोणते पिक घेणार आहेत, त्या आधी त्या शेतात कोणते पिक घेतले होते तसेच त्या पिकात कोणत्या खतांचा किती प्रमाणात वापर केला गेला होता. या गोष्टींचा विचार करून खतांचे नियोजन करावे.

आम्ल युक्त जमिनीत क्षार प्रभाव पसरवणारे नायट्रोजन युक्त खतांचा वापर करावा. तसेच फॉस्फरसच्या पुरवठ्यासाठी फॉस्फेटिकयुक्त मिश्रणाचा वापर करावा.वाळूयुक्त जमिनीत जैविक खतांचा अधिकाधिक वापर करा जेणेकरून अन्नद्रव्याचे पोषण होऊन कमीत कमी प्रमाणात नुकसान होईल तसेच अशा जमिनीत नायट्रोजनयुक्त खतांचा वापर करून फवारणी करावी.चिकणी जमिनीत जास्त प्रमाणात जैविक खतांचा वापर केला पाहिजे.

 

विष मुक्त शेतकरी

पवार विष्णु 8668573684

English Summary: Choose the right fertilizer and get a good yield
Published on: 18 June 2022, 07:45 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)